परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |
परभणी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी उशिरा आलेल्या अहवालामध्ये दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यातील एक रुग्ण आतापर्यंत निरंक असणाऱ्या पाथरी तालुक्यातून असल्यामुळे आता हा तालुका कोरोनाग्रस्तांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. परभणीतील मिलिंद नगर एक व पाथरी तालुक्यातील रामपुरी रत्नेश्वर येथील एक महिला कोरोनाबाधीत रुग्ण असल्याचा अहवाल आला असुन दोन्ही ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. दरम्यान पात्री येथील महिला हिचा पहिला तपासणी अहवाल निर्णयाक राहिल्यानंतर काल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे याच महिलेचा 26 मे रोजी घेण्यात आलेला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता त्यानंतर या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
पाथरी तालुक्यातील रामपुरी (रत्नेश्वर) येथील मुळची तीस वर्षीय महिला धारावी मुंबई येथून २० मे रोजी एका खाजगी वाहनातून आली होती. यावेळी ग्रामस्थांनी तीला गावातील शाळेत विलगीकरण केले होते. दरम्यान २१ मे रोजी ग्रामस्थांनी तिला मुंबईहून आल्यामुळे पाथरी रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी सायंकाळी ७ .३० वाजताच्या दरम्यान आणले होते. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ .पंकज दरक यांनी दिली.सदरील महिलेचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी परभणी व नंतर नांदेड येथे पाठवण्यात आला होता. हा अहवाल अनिर्णायक आला होता त्यामुळे २४ मे रोजी दुसरा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर तो २६ मे रोजी निगेटिव्ह आला असेही डॉ . दरक यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान सदरील महिलेत कुठलेही कोरोना संसर्गाची लक्षणे न आढळल्याने व दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने २८ मे रोजी सकाळी ११ .४५ वाजता या महिलेस रामपुरी येथे होम क्वारंटाईन राहण्यास सांगत सुट्टी देण्यात आली असेही डॉ .पंकज दरक यांनी सांगितले. दरम्यान ३ जून रोजी २१ मे चा अनिर्णायक अहवाल पॉझीटिव्ह आल्याने हादगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी फुरखान चिस्ती यांनी ४ जुनच्या पहाटे पुन्हा या महिलेस पाथरी ग्रामीण रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. यावेळी सदरील महिलेच्या संपर्कात राहिलेला भावासही आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.