हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे २०२० पर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशाला दिलेल्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आतापर्यंत जसे करत आहोत,त्याच पद्धतीने ३ मे पर्यंत सर्वानी लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. पंतप्रधानांनी काही आवश्यक गोष्टींना परवानगी देता येईल असे म्हटले असले तरी या परवानग्या सशर्त असतील आणि घराबाहेर पडणे हि अट अतिशय कठीण असेल. सोशल मीडियावर पीएम मोदी यांच्या नावाचा एक मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे.तो मेसेज काय आहे आणि त्यामागील सत्य काय आहे ते जाणून घेऊयात.
हा मेसेज होतोय व्हायरल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद केल्या गेल्या तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व भारतीयांना १५,००० रुपये देत असल्याचा मेसेज देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त,या मेसेजला जोडलेली एक लिंक आहे ज्यावर असा दावा केला जात आहे की एकदा आपण लिंकवर आलात की आपले नाव, फोन नंबर, पत्ता आणि पिन कोड असलेला फॉर्म भरावा अशी विनंती केली जाईल.
असा दावाही केला जात आहे
या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की हा फॉर्म भरा आणि आपले १५,००० रुपये मिळवा.या मेसेजला एक टिकर देखील आहे, ज्यामध्ये असेही म्हटले आहे की एक लाखाहून अधिक लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे.ही लिंक pm15000rs.blogspot.com नावाच्या वेबसाइटवर सक्रिय केली गेली आहे.
सत्य काय आहे ते जाणून घ्या
हे लक्षात घ्या की सरकारने हा दावा पूर्णपणे बनावट आहे आणि सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही आहे. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.त्यांनी केवळ लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविला.सर्व स्त्रोतांनी सांगितले की ही बनावट बातमी आहे आणि ज्या संकेतस्थळावर हि लिंक सक्रिय केली गेली ती संशयास्पद आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव
भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…