कोरोना व्हायरस वरील वॅक्सिनबाबत जगाला भारताकडून आशा! ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरात २ लाखाहून अधिक लोकांचा जीव गेलेला आहे तसेच सुमारे ३ दशलक्ष लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे. जगातील सर्व देश या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी लसी किंवा औषधे तयार करण्यात गुंतले आहेत परंतु असे असूनही कोणालाही अजून यामध्ये यश आलेले नाही आहे. अशा परिस्थितीत आता कोविड -१९ लससाठी जग आशेने भारताकडे पहात आहे.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीयो असे म्हणाले होते की कोरोना विषाणूपासून मुक्त होण्यासाठी भारत आणि अमेरिका एक लस विकसित करीत आहेत.पोम्पीयो असे काही बोलत नव्हते,ज्यामुळे आश्चर्य वाटेल.वास्तविक पाहता लस बनवण्यासाठी हे दोन देश एकत्रितपणे तीन दशकांपासून कामी करत आहेत. दोन्ही देश मिळून जॉईंट वॅक्सिन डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम राबवित आहेत.यामध्ये डेंग्यू, आतड्यांचा आजार, इन्फ्लूएन्झा आणि टीबीपासून बचाव करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने एकत्र काम केलेले आहे.आता नजीकच्या काळात डेंग्यू लसीच्या चाचणीवर काम सुरू आहे.

भारत जगातील सर्वात मोठी जेनेरिक औषधे आणि लस उत्पादक देश आहे. हा अर्धा डझन प्रमुख लस उत्पादक देशांचा देश आहे. येथे पोलिओ, मेनिंजायटीस, न्यूमोनिया, रोटाव्हायरस, बीसीजी, गोवर, गलगंड आणि रुबेला लस किंवा औषधी पूरक बनवले जातात. आता कोविड -१९ थांबविण्यासाठीही जवळपास अर्धा डझन भारतीय कंपन्या लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Russian Coronavirus Vaccine to Be Tested on Lab Animals

‘बीबीसी’ च्या म्हणण्यानुसार अशा कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा समावेश आहे. हे जगातील एक सर्वात मोठे लस आणि त्याचे डोस यांचे उत्पादक आहेत.हि ५३ वर्षीय कंपनी दर वर्षी सुमारे १.५ अब्ज डोसची निर्मिती करते.या कंपनीत सुमारे ७,००० लोक काम करतात.ही कंपनी १६५ देशांमध्ये २० हून अधिक रोगांवरच्या लस पुरवते. आता या फर्मने अमेरिकन बायोटेक कंपनी कोडगेनिक्सशी करार केला आहे की यासाठी लाइव अ‍ॅटेन्यूएटेड वॅक्सिन तयार केली जाऊ शकेल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला म्हणाले, “आम्ही एप्रिल महिन्यातच या लसीची चाचणी घेण्याची योजना आखत आहोत.सप्टेंबरपर्यंत आपण मानवांवर चाचणी घेण्याच्या स्थितीत येऊ.ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लस निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला आहे.गुरुवारी ऑक्सफोर्डमध्ये त्याची मानवी चाचणी सुरू होईल.ऑक्सफोर्डमधील जेनर संस्था चालवणारे प्रो. अ‍ॅड्रियन हिल म्हणाले,’वर्षाच्या अखेरीस जगाला कोट्यावधी डोसची आवश्यकता असेल.भारतीय फर्मकडे ४०० ते ५०० दशलक्ष डोस बनवण्याची अतिरिक्त क्षमता आहे. ‘

हैदराबादस्थित भारत बायोटेकने विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठ आणि अमेरिकेतील फर्मूझन कंपनीशी करार केला आहे आणि या लसच्या सुमारे ३०० दशलक्ष डोसचे उत्पादन केले आहे.झायडस कॅडिला दोन लसांवर काम करत आहे तर बायोलॉजिकल ई, इंडियन इम्युनोलॉजिकल आणि मिन्वॅक्सही लस विकसित करण्यात गुंतलेले आहेत. आणखी चार-पाच कंपन्या देखील यावरील लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Russia Starts Testing Potential Coronavirus Vaccine - The Moscow Times

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या प्रमुख वैज्ञानिक सौम्य स्वामीनाथन म्हणाल्या, “याचे श्रेय दर्जेदार उत्पादनात गुंतवणूक केलेल्या उद्योजक आणि औषध कंपन्यांना दिले पाहिजे.या कंपन्यांच्या मालकांनी व्यवसायाबरोबरच चांगले काम करण्यावरही लक्ष्य ठेवले आहे, जे संपूर्ण जगासाठी चांगले आहे.”

तथापि,तज्ञांनी चेतावणी दिली की यावरील लस फार लवकर येण्याची लोकांनी अपेक्षा करू नये.लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील जागतिक आरोग्याचे प्राध्यापक डेव्हिड नाबरो म्हणतात की नजीकच्या काळात लोकांना कोरोनो विषाणूच्या धोक्यासह जगावे लागेल कारण यावरील लस यशस्वीरित्या विकसित केली जाईल याची सध्या कुठलीच शाश्वती नाही आहे.

The Universal Flu Vaccine Could Be Here in 2 Years: Study

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment