कोरोना रूग्णांवर उपचार करणारा भारतीय वंशाचा डॉक्टर युकेच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर उपचार करणारे भारतीय वंशाचे एक डॉक्टर युकेच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान डॉक्टर त्यांच्या घरापासून वेगळे हॉटेलमध्ये आइसोलेशन मध्ये रहात होते.

डॉ. राजेश गुप्ता नावाचे हे डॉक्टर ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये कार्यरत होते. ते दक्षिण पूर्व इंग्लंडच्या बर्कशायरमधील वेक्सहॅम हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. या आठवड्यातच ते हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

एनएचएसने दु: ख व्यक्त करणारे निवेदन जारी केले
एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की,’ आम्हांला सांगताना दुःख होत आहे कि,आमचे एक सहकारी डॉक्टर राजेश गुप्ता यांना आम्ही गमावले आहे. अलीकडेच त्यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील एक निवेदन शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले.

डॉ. राजेश गुप्ता वेक्सहॅम रुग्णालयात सल्लागार म्हणून काम करत असल्याची माहिती एनएचएस ट्रस्टने दिली आहे. ते सोमवारी दुपारी त्यांच्या हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. आपल्या कुटूंबाला कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ते हॉटेलमध्ये आइसोलेशन मध्ये रहात होते. कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी त्यांनी आपल्या महत्त्वपूर्ण सेवा दिल्या.

डॉ. राजेश गुप्ता यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत
डॉ. राजेश गुप्ता हे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. ते एक उत्कृष्ट डॉक्टर मानले जात असे. सहाय्यकांनी सांगितले आहे की, डॉक्टरकी व्यतिरिक्त ते एक कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार देखील होते.

ते दयाळू आणि नम्रतेसाठी ओळखले जायचे. त्यांनी बरीच पुस्तके लिहिलेली आहेत आणि बर्‍याच प्रकाशनांवर देखील काम केले आहे. ट्रस्टने त्यांच्या मृत्यूबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. डॉ. राजेश गुप्ता यांनी जम्मूमधून शिक्षण घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.