नवी दिल्ली । भारत चीन सीमेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताने लडाख सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यावर चीनने त्यांचे सीमेवरील सैन्य वाढविले होते. त्यामुळे भारताने देखील आपले सैन्य वाढविले. गेले दीड महिने सातत्याने हा तणाव मिटविण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या आहेत. भारताने काही अटी चीनसमोर मांडल्या होत्या. आज भारतीय सैन्याने एलएसी ओलांडली असल्याची माहिती मिळाली आहे.
भारताने चीनसमोर त्यांनी सैन्य कमी करण्याची मागणी केली होती. तरीही सीमेवरील तणाव कमी झाला नाही आहे. आज भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भारतातील २ सैनिक आणि एक अधिकारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधून अद्याप किती मृत्यू झाले याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
Indian troops again crossed the Line of Actual Control (LAC) in the Galwan Valley region and purposefully launched provocative attacks, leading to severe clashes and casualties: China’s Global Times quotes People’s Liberation Army (PLA) Western Theater Command Spokesperson pic.twitter.com/1Q120y3k86
— ANI (@ANI) June 16, 2020
दरम्यान गोळीबार झाला नाही असे भारतीय सैन्याचे म्हणणे आहे. त्यांनी केवळ मारहाण झाल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे. आता दोन्ही देशातील प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.