मुंबई महापालिकेतले बोके कोण? उद्योग मंत्र्यांचा ‘या’ नेत्यावर गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई महापालिकेतील 2 हजार कोटी रुपयांची कामे संशयाच्या घेऱ्यात सापडल्यामुळे राज्य सरकारतर्फे या कामांची कॅग मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या सगळ्यांवरून उद्योग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले उदय सामंत ?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन खोटे बोलतात असा आरोप उदय सामंत (uday samant) यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातून जे जे प्रकल्प बाहेर जात आहेत त्याच्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या आरोपांना आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी (uday samant) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासह आता टाटा एअरबसचा प्रकल्प आणि इतर दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले हे एकनाथ शिंदे सरकारचं अपयश असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र शिंदे गटाकडून हा आरोप फेटाळण्यात आला. तसेच महाविकास आघाडी सरकारने हे प्रकल्प आणले म्हणतायत तर यासाठीची कोणती महत्त्वाची बैठक घेतली, कोणता एमओयू साइन केला, असा सवालदेखील उदय सामंत (uday samant) यांनी यावेळी उपस्थित केला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती