रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली केली जात आहे फसवणूक! रेल्वे मंत्रालयाने केले सतर्क

Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्याच्या कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे लोकं वैतागले आहेत आणि त्या दरम्यान रेल्वेमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुण फसवणूकीला बळी पडत आहेत. आता भारतीय रेल्वेने नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकी बाबत इशारा दिला आहे. याशिवाय फसवणुक करणार्‍यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत.

हेल्पलाईन नंबर 182 वर तक्रार करा
रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले आहे की, फेक नोकरी देणाऱ्यांच्या तक्रारीसाठी 182 डायल करा. रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍यांना टाळा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी आकर्षक ऑफर देत असेल तर त्याबद्दल त्वरित तक्रार करा. तसेच, रेल्वेमधील नोकरीशी संबंधित अचूक माहितीसाठी आरआरबी http://rrcb.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

https://twitter.com/RailMinIndia/status/1321344365835423745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1321344365835423745%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_1&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Ffraud-alert-dial-182-for-fake-jobs-complain-says-railways-nodvkj-3314428.html

रेल्वे मंत्रालय आणि पीआयबीने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला अलर्ट जारी केला आहे आणि लोकांना पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बनावट जाहिरातींविषयी सतर्क केले आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले होते की, ‘रेल्वे मंत्रालयाने नमूद केलेल्या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या कामांना आऊटसोर्स केलेले नाही, त्यामध्ये देण्यात आलेली पात्रताही चुकीची आहे आणि रेल्वेमध्ये लिंगाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जात नाही.’

https://twitter.com/PIBFactCheck/status/1292412780524367872?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1292412780524367872%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_1&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Ffraud-alert-dial-182-for-fake-jobs-complain-says-railways-nodvkj-3314428.html

या जाहिरातीचा भारतीय रेल्वे किंवा पूर्व मध्य रेल्वेशी काही संबंध नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते. रेल्वेमधील रिक्त पदांविषयीची माहिती केवळ रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा रेल्वे भरती कक्षावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे विविध माध्यमांद्वारे देखील प्रसारित केले जाते. भारतीय रेल्वेच्या नावावर रोजगाराचा दावा करणारी कोणतीही जाहिरात फसवणूक करणारी आहे त्यामुळे अशा कोणत्याही जाहिरातींना बळी पडू नका, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.