जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चकमक! लष्कर ए तोयबाचे 3 अतिरेकी ठार

Terrorist
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मिरात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा (terrorist) खात्मा करण्यात आला. भारताच्या सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये (terrorist) पुलवामात हि चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय जवानांनी तीन अतिरेक्यांना (terrorist) कंठस्नान घातले आहे. याबरोबर अतिरेक्यांकडून (terrorist) मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. यात दोन एके 47 रायफल्स, एक पिस्तूल आणि मोठ्या संख्येनं दारुगोळा याचा समावेश आहे. या चकमकीनंतर आता जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. इरफान मलिक, फजिल नजीर भट्ट, जुनैद कादिर असे ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे आहेत. हे तिघेही लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेकी संघटनेचे सदस्य होते.

सर्व अतिरेकी स्थानिक होते
या चकमकीत भारतीय जवानांनी खात्मा केलेले सर्व अतिरेकी (terrorist)हे स्थानिक होते. त्यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध होते. अतिरेकी इरफानचं वय 25 वर्ष होतं, तो पुलवामाच्या हरिपोरा इथला होता. तर फाजिल नजीर भट्टचं वय 21 वर्ष होते तोदेखील पुलवामाचाच होता. तर पुलवामाच्या गुदौरच्या जुनैद कादिरचं वय अवघं 19 वर्ष होते.

पंधरा दिवसांतील दुसरी मोठी कारवाई
पंधरा दिवसांपूर्वीच काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक झाली होती. यात लष्कर-ए-तोयबाच्या एका डिप्युटी कमांडरसह तीन अतिरेक्यांचा (terrorist) खात्मा करण्यात आला होता. या अतिरेक्यांना (terrorist) मारण्याआधीचा एक व्हिडीओही समोर आलेला होता. ड्रोनच्या मदतीने अतिरेकी कुठे लपून बसलेत, याची माहिती समोर समोर आली होती. यानंतर आपल्या जवानांनी अतिरेक्यांची (terrorist) पोझिशन आणि त्यांच्याकडे असलेली हत्यारे यांची माहिती घेऊन त्यांचावर हल्ला केला.

हे पण वाचा :
काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका