“भाजपचा पराभव व्हावा असे खरंच वाटत असेल तर एमआयएमने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे”; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपच्या पराभवात खरंच रस असेल तर एमआयएमने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे. आत्तापर्यंत एमआयएमचा अनुभव महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात पाहायला मिळाला आहे,” असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांची आज संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात आणि देशात एमआयएमचा छुप्या पद्धतीने भाजपला पाठींबा असल्याचे यापूर्वी जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलेले आहे. आत्तापर्यंत एमआयएमचा अनुभव महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात पाहायला मिळाला आहे. औरंगाबादमधली राजकीय परिस्थिती सगळ्यांना माहित आहे.

आमचे सहकारी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी इम्तियाज जलील यांची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. ये खरे आहे. पण युतीबाबत त्यांच्याशी चर्चा केली असेल असं वाटतं नाही. एमआयएम समविचारी आहे असं म्हणत असेल, तर त्यांनी ते कृतीतून दाखवून द्यावं प्रत्यक्षकृती दाखवावं. एका बाजूने विचार केला तर उत्तरप्रदेशात एमआयएमच्या मदतीमुळे भाजपाचा विजय झाला आहार हि खरी गोष्ट आहे. वास्तविक पाहता आम्ही देशाचा विचार करतो. जनतेचा त त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा त्यांच्या पक्षावरती असलेला विश्वास कमी झाला आहे, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.