मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध? ; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Kirit Somaiya Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असून अध्यापही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून नवाब मलिक यांचे मंत्रिपद वाचवण्यासाठी ठाकरेंची भागीदारी आहे. मलिकांचे दाऊद गँगशी संबंध उघड झाले आहेतच. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध निर्माण झाले आहेत का? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुरुवातीपासून पाहत आहे कि जेव्हा नवाब मलिक यांना अटक झाली. तेव्हा त्यांच्या उद्धव ठाकरेंपासून सगळे मंत्रिमंडळ मलिकांसाठी मैदानात आले होते. आता न्यायालयच सांगत आहे की, नवाब मलिक म्हणजे दाऊद. माझे उद्धव ठाकरेंना आवाहन आहे की, आता उद्धव ठाकरे साहेब, या रस्त्यावर शरद पवारांसोबत आणि न्यायालयाविरुद्ध परत काढा मोर्चा. नाहीतरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालयाविरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंनी जर सुरुवात केली की, न्यायालय देखील पाकिस्तानच आहे, न्यायाधीशही मोदींचे आहेत तर आश्चर्य नाही वाटणार.

खरे म्हणजे नवाब मलिक यांचे सर्व आर्थिक व्यवहार चौकशी न करताही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना चांगले माहिती होते. मातोश्रीपासून फक्त चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना एफएसआयचा रेट वगैरे सगळे माहिती होते, अशा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

उद्धव ठाकरे आता उत्तर द्या…

उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत अशा अनेक जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या. आणि नवाब मलिकांनीही अवघ्या काही लाखांत 100 कोटी बिझनेस टर्नओव्हरचा प्लॉट विकत घेतात. दाऊदचे पार्टनर नवाब मलिक, नवाब मलिकचे पार्टनर उद्धव ठाकरे. आता याबाबत ठाकरेंनी सविस्तरपणे उत्तर द्यावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.