विक्रांतबाबत 11 वर्षांनी ब्रह्मज्ञान झाले का?; सोमय्यांचा राऊतांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर व भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला भाजप नेते सोमय्या यांनीही प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांनी पुन्हा राऊतांवर निशाणा साधला. “मी पैसे कुठे जमा केले हे राऊतांना माहिती आहे. त्यांनी तसे आरोपही लावले आहेत. 58 कोटींचा आरोप त्यांनी माझ्यावर केला आहे. विक्रांत बाबत 11 वर्षांनी ब्रह्म ज्ञान झाले का? असा सवाल सोमय्या यांनी राऊतांना विचारला आहे.

संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी सोमय्या म्हणाले की, संजय राऊत आरोप करतात आणि पोलीस गुन्हा दाखल करतात. पोलीस काय विकले गेले आहेत का? महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहे. माझ्यावर अनेक ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न झाले. मी जिथ जाईल तिथं गुंड पाठवत आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्या संजय राऊतांच्यात हिंमत नाही. एकही कागद नसताना विनाकामाचे आरोप होत आहेत. आता माझ्यावर राऊतांनी विक्रांतचा आरोप केला आहे. अकरा वर्षात त्यांना आता आठवलं आहे. ज्यावेळी विक्रांतचा विषय होता त्यावेळी राज्यपालांना आम्ही भेटलो. प्रणव मुखर्जीनाही भेटलो होतो यावेळी राऊतही उपस्थित होते, असे म्हंटले आहे.

उध्दव ठाकरेंसाठी महापालिका म्हणजे नोटा छापण्याची मशीन – सोमय्या

यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवरही निशाणा साधला. “उध्दव ठाकरे यांच्यासाठी महापालिका म्हणजे नोटा छापण्याची मशीन आहे. आपल्यासाठी एटीएम म्हणू, त्यांच्यासाठी ती रिझर्व्ह बँक आहे. यशवंत जााधवांच्या घरातील व्यक्तीने सांगितलंय की, १० टक्के पैसे राहतात आणि बाकीचे ९० टक्के रक्कम मातोश्रीवर जाते. तसेच विक्रांत प्रकरणी गोळा केलेले पैसे गेले त्याचे पुरावे द्यावेत अन्यथा मुख्यमंत्र्याना सोडणार नाही, असा इशारा यावेळी सोमय्या यांनी दिला.

संजय राऊतांनी काय केली आहे टीका?

“सोमय्या देशद्रोही असून देशाच्या नावावर त्याने चोरी केली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे सोमय्यांचे षड्यंत्र आहे. त्यामुळे सोमय्यांनी आता नौटंकी बंद करावी. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी काही व्यक्तींकडून पैसे गोळा केले जात आहेत. आणि त्याचे काम सोमय्यांकडून केले जात आहे.

Leave a Comment