मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार पार गेली आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक खास निर्णय घेतला आहे. एका परिपत्रकाद्वारे मुख्यमंत्रांनी सर्व घरमालकांना काही सूचना केल्या आहेत.
🚨राज्यातील घरमालकांना महत्त्वाची सूचना🚨 https://t.co/hXWG3ogNpJ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 17, 2020
घरभाडे वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी सूचना गृहनिर्माण विभागाने घरमालकांना केली आहे. यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे. घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये अशा सूचना गृहनिर्माण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण
सरकारकडून टाळेबंदीत शिथिलता? ‘या’ क्षेत्रांनाही मिळणार सूट, पहा यादी
२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे
सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in