हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण या योजनेंतर्गत प्रत्येक सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर ग्राहकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचा आधार हा आपल्या एलपीजी कनेक्शनसह लिंक करणे आवश्यक आहे. एलपीजी कनेक्शनला आधार लिंक करण्याचे अनेक मार्ग आहेत. ऑनलाईन, कॉल करून, आयव्हीआरएसद्वारे किंवा एसएमएस पाठवूनही हे लिंक करता येते. कोविड -१९ दरम्यान गर्दीला टाळायची प्रत्येकाची इच्छा आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला घरी बसूनच एलपीजी कनेक्शनला आधार कसा लिंक केला जाऊ शकतो हे सांगत आहोत.
आपला आधार लिंक करण्यासाठी, आपल्याला या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
>> आपला मोबाइल नंबर इंडेन गॅस कनेक्शनसह रजिस्टर करा.
>> त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: rasf.uidai.gov.in/seeding/User/ResidentSelfSeedingpds.aspx.
>> यानंतर एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल.
>> बेनिफिट टाइपमध्ये एलपीजी कनेक्शन, भारत गॅस कनेक्शनसाठी BPCL आणि इंडेन गॅस कनेक्शनसाठी IOCL भरा.
>> ड्रॉप-डाउन लिस्ट मधून ‘वितरकाचे नाव’ निवडा आणि आपला एलपीजी ग्राहक क्रमांक भरा.
>> मोबाइल नंबर, ईमेल, पत्ता आणि आधार क्रमांक भरा, त्यानंतर ‘सबमिट’ या बटणावर क्लिक करा.
>> रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी येईल, तो भरा.
संबंधित प्राधिकरणाकडून याची पडताळणी केल्यानंतर लिंक झाल्याची आपल्या माहिती रजिस्टर्ड नंबर आणि ईमेल आयडीवर देण्यात येईल.
SMS वर एलपीजी कनेक्शनसह आधार लिंक करायचा
>> जर तुम्हाला एसएमएसद्वारे एलपीजी कनेक्शनला आधार लिंक करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड आहे की नाही हे पाहावे लागेल.
>> एलपीजी वितरकाकडे आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड करा आणि नंतर रजिस्टर्ड क्रमांकावरून एसएमएस पाठवा.
>> आपल्या डीलरचा क्रमांक जाणून घेण्यासाठी, आपण आधीच्या प्रक्रियेत डीलरचा नंबर शोधू शकता.
एलपीजी कनेक्शनला आपले आधार लिंक करण्यासाठी इंटरअॅक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस) देखील वापरला जाऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र आयव्हीआरएस असतो आणि ग्राहक आपापल्या जिल्ह्याचा क्रमांक कंपनीने दिलेल्या यादीतून मिळवू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.