हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुंबई मधील लोकल प्रवास म्हंटलं कि धक्का बुक्कीचा एक भाग असतो . अनेक कामगारांना लोकलचा प्रवास करत वेळेवर कामावर पोहचावे लागते. त्यात लोकल मध्ये असलेली अफाट गर्दी यातून वाट काढत कसेबसे पोहचावे लागते. त्यामुळे अश्या गर्दीत अनेक चोरांना हात साफ करण्याची आयतीच संधी मिळते. असाच काहीसा प्रकार मुंबई मध्ये दररोज होत असतो. परंतु १४ वर्षांपूर्वी हरवलेलं पाकीट हे ज्या व्यक्तीचे होते त्यांना मिळाले आहे. हि सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे.
मुंबई च्या लोकल ट्रेन मध्ये असे लोकांचे गट च असतात. कि ते पाकीट मारण्याची संधीच शोधत असतात. कवचितच एखादे वेळी असं होत कि, मारलेलं पाकीट ज्याचं आहे त्याला मिळत. मुंबई पोलिसांनी १४ वर्षांपूर्वी हरवलेले पाकीट शोधून काढून ज्याचं होत त्याला दिल आहे. या पाकिटात ९०० रुपये होते . त्यामध्ये जुन्या ५०० ची नोट होती आणि १०० च्या तीन नोटा होत्या. जवळपास २००६ च्या दरम्यान मुंबईतील हेमंत पडळकर शिवाजी टर्मिनल्स वरून पनवेल लोकल मध्ये प्रवास करत होते. त्यावेळी त्यांचं अचानक पाकीट गायब झालं. त्यानंतर त्यांनी तक्रार केली आणि तब्ब्ल १४ वर्षानंतर त्याचे पाकीट मुंबई मधील जीआरपीच्या पथकाने शोधून दिले.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हेमंत याना जेआरपीच्या कार्यालयातून फोन आला होता. त्यानंतर मात्र सगळीकडे लॉकडाउन असल्याने ते जाऊ शकले नव्हते. पण काही दिवसांपूर्वी मुंबई मधील लॉक डाउन शिथिल झाल्यानंतर त्यांनी संपर्क साधला. आणि त्यांना आपले १४ वर्षापूर्वीचे पाकीट मिळाले. त्यांच्या पाकीट मध्ये ९०० रुपये होते त्यातील एक जुनी ५०० ची नोट असल्याने जेआरपीने त्यांना ३०० रुपये माघारी दिले आणि १०० रु स्टॅम्प चे घेतले तसेच नवीन नोट ५०० ची आल्यानंतर त्या बदल्यात घेऊन जाण्यास सांगितले. असे हेमंत पडळकर म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.