मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र दहशतवादविरोधी (Terrorist) पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एका दहशतवाद्याला (Terrorist) अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी पंजाबचा असल्याचे समोर आले आहे. त्याची कसून चौकशी केली असता आपण कॅनडामध्ये असलेल्या वॉन्टेड दहशतवादी लखबिर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. यानंतर या दहशतवाद्याला मुंबई एटीएसने पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले.
चरतसिंग उर्फ इंद्रजीतसिंग कारीसिंग उर्फ करज सिंग असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं (Terrorist) नाव आहे. आरोपी चरतसिंग हा 30 वर्षांचा असून त्याच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च 2022 मध्ये पंजाबच्या कपुथरला जेलमधून तो पॅरोल रजेवर बाहेर आला होता. यादरम्यान त्याने आपल्या साथिदारांसोबत 9 मे रोजी पंजाबच्या इंटलीजन्स कार्यालयावर रॉकेट ग्रेनेडने हल्ला केला होता.
महाराष्ट्र दहशतवाद (Terrorist)विरोधी पथकाला या दहशतवाद्याची गोपनिय माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी सापळा रचून चरतसिंगला मालाडमधून अटक केली. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता कॅनडास्थित दहशतवादी लकबीरसिंग लांडा याच्या संपर्कात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यानंतर चरतसिंगला पुढील कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…