हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक मोठा ट्रक आणि एका वर्षाचा प्रवास ! या ट्रकने किती किलोमीटरचा प्रवास केला असेल याचा अंदाज लावू शकाल ? जर आपल्याला हे सांगितले की फक्त 1700 किलोमीटर, तर आपल्यालाही ते पचवणे थोडे अवघड जाईल, मात्र ते खरे आहे.
बरोबर एका वर्षापूर्वी एरोस्पेस ऑटोकॅलेव्ह नावाच्या मोठ्या मशीनने भरलेला एक ट्रक नाशिकहून महाराष्ट्रातून केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरकडे निघाला, जो आता आपल्या डेस्टिनेशन वर पोहोचणार आहे. या ट्रकला फक्त 1700 किमी अंतरावर पोहोचण्यास एक वर्ष लागला.
हा 74 चाकाचा एक मोठा ट्रक आहे जो दररोज सरासरी 5 किलोमीटर प्रवास करतो. हा ट्रक इतका मोठा आहे की रस्त्यावर चालत असताना तो संपूर्ण रस्ताच व्यापून टाकतो, त्यामुळे इतर वाहनांना जाण्यास जागाच नसते. हा एवढा मोठा ट्रक हाताळण्यास 32 तब्ब्ल लोकं लागतात.
या एरोस्पेस ऑटोक्लेव्हचे वजन सुमारे 70 टन आहे आणि त्याची उंची 7.5 मीटर तर रुंदी 6.65 मीटर आहे. हे मोठे यंत्र नाशिकमध्ये बनवले गेले आहे, येथे भारतीय अवकाश संशोधन प्रकल्पासाठी इतरही अनेक उपकरणे तयार केली जातात.
जेव्हा हा ट्रक रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याच्या आसपासची वाहनांच्या सुरक्षेसाठी त्यांना थांबवले जाते. हा ट्रक पायलट वाहन पोलिसांकडून विविध शहरांमधून उपलब्ध करून दिला जातो जेणेकरून त्याला सुरक्षितपणे शहराबाहेर जाता येईल.
बर्याच वेळा हा ट्रक बाहेर काढण्यासाठी वाटेवरील झाडे तोडावी लागली आणि इलेक्ट्रिक लाईनही काढावी लागली. या ट्रक बरोबर काम करणारे 32-सदस्य असलेली टीम त्याच्या पुढच्या दिवसाची योजना अगोदरच आखतात आणि अधिकाऱ्यांना त्याच्या येण्याविषयीची माहिती देतात, विशेषत: शहर किंवा नगरात पोहोचण्याच्या आधीच याच्या येण्याची माहिती दिली जाते.
सुमारे एक वर्ष प्रवास केल्यानंतर, हा ट्रक आता या महिन्यात केरळ राज्यात दाखल झाला आहे. या महिन्याच्या अखेरीस तो त्याच्या डेस्टिनेशन वर पोहोचेल असा अंदाज आहे. हा ट्रक व्होल्वो कंपनीचा आहे आणि तो ब्रँडच्या एफएम सिरीजचा आहे, तरी तो कोणत्या मॉडेलचा आहे हे अद्यापही कळू शकलेले नाही.
एफएम सिरीजचा हा ट्रक खूप जास्तीचे वजन वाहून नेण्यासाठी ओळखला जातो. व्होल्वोच्या या एफएम सिरीजच्या तर्क मध्ये सहा सिलेंडर 10,800 सीसी डिझेल इंजिन आहे जे 330 बीएचपी पॉवर आणि 1600 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते, तर त्याचे टॉप मॉडेलमध्ये 12,800 सीसीचे इंजिन वापरले जाते जे 500 बीएचपी पॉवर आणि 2500 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते. सर्व इंजिनमध्ये 12 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स वापरला जातो….
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.