अमेरिकेत ८० हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही ८० हजारांच्या पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने नुकतीच याबाबत माहिती दिली. कोविड -१९ च्या या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत एकूण ८०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे, असे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगने (सीएसएसई) सोमवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीत म्हटले आहे.

वृत्तसंस्था शिन्हुआने सीएसएसईच्या हवाल्याने सांगितले की, “देशात आतापर्यंत एकूण १३ लाख ४४ हजार ५१२ लोकांना या साथीच्या आजाराने ग्रासले आहे. या सर्वांना कोविड -१९ चा संसर्ग झाला आहे. “अमेरिकेतील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम हा सर्वाधिक न्यूयॉर्क या राज्यात झालेला आहे.

कोविड -१९ संसर्गाची इथे एकूण ३ लाख ३७ हजार ५५ रुग्ण असल्याची नोंद झाली असून त्यात २६ हजार ६८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगने जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की न्यू जर्सीमध्ये ९ हजार ३४० मृत्यू, मॅसेच्युसेट्समध्ये ४ हजार ९७९ आणि मिशिगनमध्ये ४ हजार ५८४ मृत्यू झाले आहेत.

How Coronavirus Spread From Patient Zero in Seattle - Bloomberg

ब्रिटनमध्येही विनाश
ब्रिटनमध्येही कोरोनाचा कहर कायम आहे. गेल्या २४ तासात तिथे २५० हून अधिक लोक मरण पावले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे ३२ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे तसेच गेल्या २४ तासात यूकेमध्ये या संसर्गाची जवळपास ४००० प्रकरणे घडली आहेत. यासह येथे कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या सुमारे २ लाख १९ हजार इतकी झाली आहे.

ब्रिस्टल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ब्रिटनमध्ये अजूनही सुमारे सात लाख लोक या विषाणूमुळे आपला जीव गमावू शकतात. अभ्यासात असेही म्हटले आहे की मंदी, दारिद्र्य आणि दुर्लक्ष झाल्यास हा आकडा आणखीही वाढू शकतो.दुसरीकडे, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा लॉकडाऊन संपवण्यासाठी तीन फेजवाला अंतिम एक्झीट प्लॅन आखला आहे, त्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत.

Death toll from coronavirus up in Iran

इटली मध्ये काही प्रमाणात कमी झाली प्रकरणे
इटलीमध्ये नवीन प्रकरणांची संख्या कमी झाली आहे, परंतु अद्यापही तिथे परिस्थिती सामान्य झाली नाही आहे.कोरोनामुळे या देशात ३०,७३९ लोकांचा बळी गेला आहे. त्याचवेळी,२ लाख २० हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे.

रशियाची परिस्थिती बिकट आहे
रशियामध्येही कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. येथे कोरोनाची प्रकरणे ही २ लाखांपेक्षा अधिक झाली आहेत. तसेच २ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment