कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध FIR दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधात सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी बँकेकडून ज्या कामासाठी पैसे घेतले होते ते त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा आरोप मोहित कंबोज यांच्यावर आहे.

मोहित कंबोज यांनी आरोप फेटाळले
मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा गुन्हा दाखल होताच स्वत: मोहित कंबोज यांनी ट्विट करत आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये “आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर करुन जर वाटत असेल की मी घाबरून जाईल तर तसं नाहीये. मी तथ्यांसह न्यायालयात जाईन.”असे म्हंटले आहे.

तसेच मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओ असून त्यात त्यांनी म्हटलं कि मिळालेल्या माहितीनुसार, माझ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी एक एफआयआर नोंदवला आहे. जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आणि त्यात काही बँक इश्यूज काढत माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार माझा आवाज दाबेल किंवा मला कुठल्याही प्रकारे शांत करेल पण तसे होणार नाही. नवाब मलिक असो किंवा संजय राऊत असोत… आम्ही या सर्वांना घाबरणार नाही आणि कोर्टात जाऊन सत्य समोर आणणार असे म्हंटले आहे.

यापूर्वी तलवार नाचवल्या प्रकरणी गुन्हा दाखल
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी आपल्या निवासस्थानाजवळ फटाके फोडून जल्लोष केला तसेच तलवार सुद्धा नाचवली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

हे पण वाचा :
वयाच्या 40 नंतर भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या

पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याचा संशय

35 रुपयांसाठी दिला 5 वर्षे लढा, आता रेल्वेकडून मिळणार अडीच कोटी रुपयांची भरपाई !!!

‘मुळशी पॅटर्न’ पाहिलाय का? बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही… : देवेंद्र फडणवीस

होम लोनपासून ते इन्शुरन्सपर्यंत जूनमध्ये ‘या’ गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे !!!

Leave a Comment