मुंबई । चेंबूर भागात आज पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चेंबूर मध्ये बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची आणि जम्मू काश्मीरमधील काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. असे स्पाय नेटवर्क इथे चालविले जात असल्याची माहिती मिळाली आहे. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. जम्मू काश्मीरमधील माहिती तसेच सैन्य दलाच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सूर होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या छाप्यामध्ये पोलिसांना अनेक गोष्टी सापडल्या आहेत. ३ चालू असणारी चायनीज सिमकार्ड आणि इतर १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मॉडम, अँटीना, आणि कनेक्टर असा माल पोलिसांना सापडला आहे. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आवाज बदलून ही व्यक्ती भारतीय लष्कराची माहिती मिळवत होती. तसेच पाकिस्तान वरून आलेले कॉल तंत्रज्ञाच्या साहाय्याने स्थानिक नंबरवर डायव्हर्ट करून भारतीय लष्कराची गोपनीय माहिती मिळवण्याचा या व्यक्तीचा प्रयत्न सुरु आहे.
भारत आणि चीनमध्ये सीमेवर सुरु असणारा वाद तसेच काही दिवसांपूर्वी काश्मीर मध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा उधळलेला कट या पार्श्वभूमीवर या व्यक्तीच्या अटकेमुळे काहीतरी मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. सीमेवरचा तणाव पाहता या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. या व्यक्तीकडून आणखी काही ठिकाणी असे नेटवर्क आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.