मुंबई प्रतिनिधी | माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीने राजकीय विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे स्वतःचे राजकीय पुनर्वसन व्य्वस्थितीत केले जावे यासाठी त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने
संजय शिंदे आणि बबन शिंदे यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याच्या रकमेचा चेक मुख्यमंत्र्यांना देण्याचा बहाणा करत मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय वाटाघाटीच्या चर्चा केल्या आहेत. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील आद्यप उघड झाला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय शिंदे यांनी ११ लाख आणि बबन शिंदे यांनी १० रुपयांचा चेक मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिला आहे. बबन शिंदे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे मागील काही दिवसापासून सारखे माध्यमात झळकत होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला पराभव बघून बबन शिंदे यांचे धाबे दणाणले असल्याने ते भाजपच्या वाटेवर आहेत असे बोलले जाते. तर भाजपकडून आपल्या पुत्राला म्हणजे रणजित शिंदे यांना उमेदवारी मिळवण्यास बबन शिंदे आग्रही असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे.
एमआयएम आमदार वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात?
दरम्यान संजय शिंदे आणि बबन शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने सोलापूर जिल्हयाच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. पूर्वी पासून भाजपमध्ये असणारे आणि आता नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले दोन्ही गटाचे भाजप नेते या भेटीने हादरले आहेत. त्यामुळे येत्या काळात नेमके काय होते हे बघण्यासारखे राहणार आहे.
म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी जमले २ दिवसामध्ये २० कोटी
विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या
म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ