हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला. शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट राष्ट्रवादी कार्यालयच फोडले. शिंदे यांच्या पराभवावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्याच्या घरातल्या भांडणाबद्दल बोलायची माझी संस्कृती नाही. सातारा या ठिकाणी शिंदे यांचा पराभव होणे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेकी होणे हि घटना वाईट आहे, असे पाटील यांनी म्हंटले.
कोल्हापुरात आज भाजपच्यावतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निषेध आंदोलन केले. यावेळी त्यांनी मोर्चाही काढला. यावेळी त्यांनी सातारा येथील जिल्हा बॅंकेच्या दृष्टीने माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सातारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराने पराभव केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच कार्यालयावर दगडफेक केली. अशा प्रकारच्या भविष्यात घटना घडू नये. खूप वाईट झाले आहे.
वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जिल्हा बँकेची निवडणूक लढविली आहे. तसेच भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिला आहे. कोणत्या राजकीय पक्षाने विधानसभा आणि लोकसभा याच्यातून राज्याचे सरकार व केंद्र सरकारचे काम होत असते. यावर पक्ष म्हणून पाहिले पाहिजे. खालच्या पातळीवर असलेल्या दूध सोसायटी, विकास सेवा सोसायटीया सहा ठिकाणी कार्यकर्त्यांना स्वतंत्र दिले पाहिजे. कारण त्यांचे त्यांचे स्थानिक स्तरावरचे विकासाचे राजकारण असते, असे पाटील यांनी सांगितले.
हे पण वाचा –
शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले (Video)
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी
राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी
भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी
तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का
शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव
रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका
आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…
निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार
पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल सर्व अपडेट एका बुलेटिनमध्ये
सातार्यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं
सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा
गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…
शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर
राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil
कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण
शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा नेत्याचा ओ शेठ गाण्यावर भन्नाट डान्स