हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला. “संजय राऊत चोर आहे. त्याला अटक हि होणारच. संजय राऊत स्वताला फार किंमत देत आहेत त्यांना तर कुत्रेही विचारत नाही,” अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.
संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर याबाबत निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत हे चोरच आहेत. मागे एकदा त्यांनी आयकर विभागाचे पैसे चोरले होते. 55 लाख परत द्यावे लागले. त्यावेळी वारीत पकडले होते काय? तेव्हा आयकर विभागाचे पैसे चोरले म्हणून त्याच्यावर कारवाई झाली आहे ना. यांना नोटीस देऊनही ते जर ईडीच्या कार्यालयात जात नसल्यामुळे केली कारवाई.
ईडीला काही तरी चौकशीमध्ये सापडले असावे म्हणूनच त्यांनी कारवाई केली आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे कि यातून आता राऊतांची सुटका नाही. कितीही जरी तड्फडले तसंच त्यांनी काळ्या मार्गातून जमा केलेले पैसे बाहेर येणार आणि संजय राऊतांना अटक होणार हे नक्की आहे, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे.