“धनंजय मुंडेला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11”; निलेश राणेंचा टोला

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता भाजप नेत्यांकडून मुंडे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी “धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11,” असे ट्विट करीत टोला लगावला आहे.

निलेश राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी “धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11. हिंदूचे कायदे धनंजय मुंडे ला लागू होत नाही का?? ह्याची आमदारकी पण रद्द होते कारण याने निवडणुक आयोगाला खोटी माहिती दिली, त्यांनी स्वतः मान्य केले आहे. याला जंगलात पाठवा, पिसळलाय, असे म्हंटले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर नेमके काय केले आहेत आरोप?

करुणा शर्मा यांनी आज आरोप करताना म्हंटले आहे की, करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली आहेत. त्यांनी स्वतःच्या अनेक बायका लपवल्या आहेत. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. कारण माझ्याकडे सारे कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे मला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे करुणा यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here