हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतल्याच्या प्रकरणावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. होता. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला आहे. “पाकीटमारीत तर तुमची PHD असेल, इतके वर्ष त्यावरच तर घर चालू आहे,” असा टोला राणेंनी लगावला आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे असे म्हंटले आहे. त्यांना सांगतो कि जर कोणी शिवसैनिक पाकीटमार निघाला तर वांदे होतील. पाकीटमारीत तर तुमची PHD असेल, इतके वर्ष त्यावरच तर घर चालू आहे. विचार करून बोलावे.
त्यात पण कोण शिवसैनिक निघाला तर वांदे होतील. पाकीटमारीत तर तुमची PHD असेल, इतके वर्ष त्यावरच तर घर चालू आहे. विचार करून बोला… https://t.co/wmzTepEhyC
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 1, 2022
काय केली होती संजय राऊतांनी टीका?
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. यावेळी ते म्हणाले की, नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल तर महाराष्ट्रातील पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाही. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करतात. हा राज्यांतील पोलिसांचा सरळ सरळ अतिक्रमण आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती.