देशातील ‘या’ ४ राज्यांत अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने गेल्या काही दिवसात भारतातही चांगलेच थैमान घातले आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सव्वा लाख पार करून गेली आहे. तसेच रोज नव्याने संख्येत वाढ होते आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये या विषाणूचे संक्रमण झाले आहे. मात्र देशातील ४ राज्यांमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. यामध्ये दमन आणि दिव, लक्षद्वीप, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे. इथे अजून एकही रुग्ण सापडलेला नाही.

देशात सर्वाधिक रुग्णसंख्या ही महारष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आजपर्यँत एकूण ४४५८२ रुग्ण सापडले आहेत. तर दादरा आणि नगर हवेली आणि अरुणाचल प्रदेश इथे सर्वात कमी म्हणजे केवळ एकाच रुग्णाची नोंद झाली आहे. तामिळनाडू, गुजरात, दिल्ली येथे रुग्णसंख्या १० हजार पार झाली आहे. या राज्यांमध्ये अनुक्रमे १४७५३, १३२६८, १२३१९अशी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश राज्यांमध्ये १० हजारांच्या आत म्हणजे अनुक्रमे ६४९४, ६१७०, ५७३५ इतके रुग्ण सापडले आहेत. पश्चिम बंगाल – ३३३२, आंध्रप्रदेश- २७०९, बिहार- २१७७, पंजाब- २०२९, तेलंगणा- १७६१, कर्नाटक-१७४३, जम्मू आणि काश्मीर- १४८९, ओडिसा-११८९, हरियाणा-१०६७ या राज्यांमधील संख्या १ हजार ते ५ हजार च्या दरम्यान आहे.

 

केरळ- ७३२, झारखंड- ३०८, आसाम- २५९, चंदीगड-२१८, त्रिपुरा- १७५, छत्तीसगड-१७२, हिमाचल प्रदेश- १६८, उत्तराखंड-१५३ राज्यातील रुग्ण तुलनेने कमी आहेत. गोवा-५४, लदाख-४४, अंदमान आणि निकोबार-३३, मणिपूर-२६, पाँडिचेरी-२६, मेघालय १४ या राज्यांमध्ये अजून कशंभरी पार झालेली नाही. देशभरात संचारबंदी लागू आहे. केरळ राज्याने उत्तम उपाययोजना राबविल्याचे सांगितले जात आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील धोका वाढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment