मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी मार्केट यार्ड कराड), विकी (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही), अश्पाक दस्तगीर नायकवडी (रा. शाहु चौक शनिवार पेठ कराड), चालक दिपक सदाशिव जावीर (रा. कामोडी, मुंबई) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राज्यात जिल्हा बंदी असताना ऑनलाईन बुकींग करून ज्यादा दराने विना पासचे प्रवाशी वाहतुक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.कॉ. विनोद माने व तानाजी शिंदे यांनी प्रवासी म्हणून समर्थ ट्रॅव्हर्ल्स चे मालक अनंता उर्फ निलेश यांच्या प्राप्त मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आपणाला कराड येथून मुंबईला जाणेकरीता पासची आवश्यकता नाही. परंतु आपणास तिकीट दर म्हणून 500 रुपयाचे ठिकाणी 2000 रुपये लागतील. बाकी आम्ही सर्व मॅनेज करत आहेात.

यानुसार पोलीसांनी साफळा रचून समर्थ टँव्हल्स कराड यांचेकडे ऑनलाईन दोन शिटची बुकींग केली. त्यांच्या सांगण्यानुसार गुगल पे वर 1000 रुपये डिपॉझिट केले. समर्थ ट्रॅव्हल्स यांनी प्रवासी पोलीसांना दि.23 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर नाका कराड येथ हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार प्रवासी पोलीस सदरठिकाणी प्रवासी म्हणून हजर राहिले. त्यानंतर मात्र समर्थ ट्रॅव्हल्स या नावाखाली सुरू असलेले रॅकेट सद्स्य म्हणून विकी नावाच्या एजंटने फोन करून आपणास घेण्याकरीता माझा चालक दिपक म्हणून विट्यावरून फोर व्हिलर गाडी घेवून येत असल्याचे सांगितले.

पोलीस प्रवासी कोल्हापूर नाका येथे उभा असताना चैनमधील स्थानिक एजंट अश्पाक हा प्रवाश्या जवळ आला व आपली ओळख देवून उभ्या असलेल्या प्रवाश्यांना इनोव्हा गाडी क्रमांक एम एच 43 डी 8877 मध्ये बसवून दिले. त्याचवेळी कोल्हापूर नाका येथे चेकींग करता असलेले पोलीस पथक सपोनि विजय गोडसे , पोलीस नाईक संजय जाधव , सचिन साळुंखे या पथकाने ट्रॅप करून कोरोणा अनुषंगाने विना पास प्रवास करुन प्रवासी घेवून मुंबई येथे जाणार्‍या समर्थ ट्रॅव्हल्स ऑनलाईन रॅकेट करणार्‍या चार इसमांना ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि सराटे हे करत आहेत.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, वरिष्ठ पेालीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी शिंदेे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, मारुती लाटणे यांच्या पथकाने केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.