हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वात २००० मध्ये प्रथमच अंडर -१९विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंगही त्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. या अंडर -१९ वर्ल्ड कपनंतर वरिष्ठ भारतीय संघात युवराज आणि कैफला स्थान मिळवण्यात यश आले होते. अलीकडेच प्रियम गर्ग यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर- १९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. प्रियामला जेव्हा विचारण्यात आले की आजवरचा अंडर १९ मधला तुझा आवडता कर्णधार कोण ? तर त्याने विराट किंवा पृथ्वी नाव न घेता मोहम्मद कैफ हा भारताचा आजवरचा सर्वोत्कृष्ट अंडर-१९ कर्णधार असल्याते सांगितले.
सध्याच्या घडीला भारताचा अंडर १९ संघाचा कर्णधार प्रियम गर्गने HELO अॅपवर लाईव्ह येत अनेक गोष्टीचा उलगडा केला . या लाईव्हमध्ये प्रियमला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, अंडर १९ संघाचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे तर त्यावर त्याने भारताच्या माजी खेळाडू मोहम्मद कैफचे नाव घेतले. कैफच्या नेतृत्वाखाली भारताने २००० साली पहिल्यांदा अंडर १९ विश्वचषक आपल्या नावावर केला होता. या संघात युवराज सिंगचा ही समावेश होता. भारताने आतापर्यंत ४ वेळा अंडर १९ विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.