हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीने (Navi) आपल्या ग्राहकांना इन्स्टंट पर्सनल लोन उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या नवी लेन्डिंग अॅपची अधिकृत घोषणा केली. हे अॅप मध्यम उत्पन्न असणार्या भारतीयांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे जे स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाचा सहज वापर करणारे आहेत. हे नवी अॅप ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस प्रक्रियेद्वारे 36 महिन्यांसाठी 5 लाखांपर्यंतचे इन्स्टंट लोन देते.
गूगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध
हे नवी लेन्डिंग अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आपल्या बँक अकांऊटमध्ये या लोनची रक्कम अवघ्या काही मिनिटांत मिळवण्यासाठी ग्राहक आपली पात्रता तपासू शकतात. या अॅपमध्ये लोनची रक्कम आणि ईएमआयही निवडू शकता तसेच आपला पॅन आणि आधार नंबरही भरू शकता. ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे आणि यासाठी पे स्लिप किंवा बँक स्टेटमेन्टसारखे कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
10 मिनिटांत लोन अकाउंटवर जमा होते
लॉकडाऊन दरम्यान एप्रिलमध्येच हे अॅप बीटा मोडमध्ये लाँच केले गेले होते. या लॉकडाऊन दरम्यान बहुतेक लोक घर बाहेरही पडू शकलेले नाहीत किंवा बाहेरही जाऊ इच्छित नाहीत आणि बँका या केवळ मूलभूत सेवाच देत आहेत. अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकांना वैद्यकीय / कौटुंबिक तसेच आपत्कालीन परिस्थिती, शैक्षणिक फी किंवा इतर तातडीच्या कारणामुळे कर्जाची आवश्यकता होती, ते लोक या अॅप-आधारित लोनकडे वळले. हे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्णपणे ऑनलाइन काम करते. या टप्प्यात, नवीचे बरेच लोन हे केवळ 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात ग्राहकांच्या बँक खात्यांत जमा झालेले आहेत, तर काही ग्राहकांनी अॅप इन्स्टॉल केल्यानंतर 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात लोन मिळवले. नवी अॅप आता बीटा मोडच्या बाहेर आहे आणि अधिकृतपणे लाँच केले गेले आहे.
नवीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समित शेट्टी म्हणतात की, गेल्या काही महिन्यांपासून अधिकाधिक लोक हे फायनान्शियल सेवा आणि त्यांच्या ऑनलाईन सेवांसह विविध सेवांसाठी या अॅप्सची निवड करत आहेत. यामुळे बीटाच्या टप्प्यात नवी लेन्डिंग अॅपला टायर 1, 2 आणि 3 शहरांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या प्रतिसादामुळे आम्हाला थोड्याच वेळात हे अॅप अधिकृतपणे सुरू करण्यासाठी आवश्यक अंतर्दृष्टी आणि आत्मविश्वास मिळाला. नवी चे टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात सेवा पुरवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि मशीन लर्निंग (ML) वर लाभ देण्यावर जोर देते, जेणेकरून आम्ही आमच्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या निवडी आणि अनुभव यांना सतत सुधारू शकू. आता आम्ही या अॅपची व्याप्ती भारतभरातील 150 शहरांमध्ये विस्तारित करीत आहोत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.