आता व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होणार नोकऱ्यांविषयीची माहिती, या क्रमांकावर लिहून पाठवा ‘Hi’; सरकारी चॅटबॉट करेल मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) लोकांच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एक नवीन सुविधा सुरू केली आहे. सरकारच्या या पुढाकाराने व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ ‘Hi’ पाठविल्यास त्या व्यक्तीला त्याच्या कौशल्यानुसार घरबसल्या नोकरीबद्दलची माहिती मिळेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) सुरू केलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉटच्या माध्यमातून हे काम केले जाईल.

तुम्हाला SAKSHAM नामक पोर्टलवरून माहिती मिळेल
सायन्स अँड टेक्नोलॉजी डिमार्टमेंटच्या टेक्नोलॉजी इनफॉर्मेशन फॉरकास्ट अँड इव्हॉल्युशन काउंसिल (TIFAC) ने श्रम शक्ती मंच (SAKSHAM) नावाचे एक पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून त्या भागातील मजुरांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी (MSME) जोडण्याचे काम व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून केले जाईल. यानंतर, लोकांना त्यांच्या क्षेत्रातील नोकरी आणि संधींबद्दलची माहिती मिळेल.

‘या’ क्रमांकावर Hi असे लिहून पाठवावे लागेल
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, 7208635370 या व्हॉट्सअ‍ॅप नंबर ‘Hi’ असे लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर, त्यांच्या कामाच्या अनुभवाची आणि कौशल्याची माहिती त्या व्यक्तीकडून चॅटबॉटद्वारे घेतली जाईल. मिळालेल्या माहितीच्या आधारे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सिस्टीम युझरला त्याच्या सभोवतालच्या उपलब्ध नोकऱ्यांबद्दल माहिती देते.

हे चॅटबॉट कसे काम करते
या पोर्टलमध्ये देशभरातील MSME ना त्या त्या प्रदेशाच्या नकाशाद्वारे जोडले जाईल. यानंतर, कौशल्य उपलब्धता आणि आवश्यक कौशल्यांचा डेटा वापरुन, हे पोर्टल कामगारांना त्यांच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संभाव्य संधींविषयीची माहिती देईल.

दोन भाषांमध्ये उपलब्ध
TIFAC चे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, चॅटबॉट्स सध्या केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्येच उपलब्ध आहेत. ते इतर भाषांमध्ये विस्तारित करण्याचे काम चालू आहे.

आपल्याकडे स्मार्टफोन नसल्यास या नंबरवर मिस कॉल द्या
अशी अनेक लोकं आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. असे लोक 022-67380800 वर मिस कॉल देऊन ऑफलाइन आवृत्तीमध्ये प्रवेश करू शकतात. हे पोर्टल इलेक्ट्रिशियन, प्लंबर, शेती कामगार आणि इतरांद्वारे वापरले जाऊ शकते.

TIFAC चे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांच्या मते, SAKSHAM ची सुरवात कोरोना साथीच्या वेळी झाली. या साथीच्या आजारामुळे लादलेल्या लॉकडाऊनमध्ये देशभरातून लाखो प्रवासी कामगार आपाआपल्या गावी परतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment