‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ८३८ गावांचे प्रस्ताव पाठविले आहे.

दारूमुळे आदिवासींचे, मजुरांचे होणारे शोषण व महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी व विविध गावांनी एकत्र येऊन दारूमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दारूबंदीसाठी १९८७-९३ या कालावधीत जिल्हाव्यापी आंदोलन झाले. आंदोलनाची दखल घेऊन शासनाने १९९३ मध्ये शासकीय दारूबंदी लागू केली. १९९३ पासून २०१५ पर्यंत गावा-गावात दारूबंदी लागू झाली. आताच्या घडीला ही ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे कळताच पुन्हा एकदा शेकडो गावांनी आंदोलन उभारण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभय बंग यांच्या पत्रासह ८३८ गावांची निवेदने संघटनेचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते देवाजी तोफा, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांच्या उपस्थितीत जिल्ह्याधिकारी यांना सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातील १ हजार २ एवढ्या गावांनी ठराव घेऊन दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.

https://t.co/OEFg4qv4br?amp=1

जिल्ह्यात २७ वर्षांपासून टिकून असलेली दारूबंदी उठविल्यास व्यसनामुळे संसाराची धूळधाण होईल. घरात वाद-विवाद वाढतील. दारिद्रयपणा येईल, शांतता भंग होईल, सुखी संपन्नता नष्ट होईल. आर्थिक बाजू कमकुवत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी मुळीच हटवू नये. दारूबंदीची अंमलबजावणी अधिक प्रबळ करून नियम भंग करणा-यास देण्यात येणाऱ्या शिक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करीत जिल्ह्यातील तब्बल १ हजार २ गावे दारूबंदी कायम ठेवण्यासाठी पुढे आली आहेत. गावा-गावात ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून दारूबंदीची अंमलबजावणी करा, अशी विनंती केली जात आहे.

https://t.co/YqnnKLtL8z?amp=1

दारूबंदी कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गावांमध्ये अहेरी तालुक्यातील ६२, आरमोरी ४९, भामरागड ८२, चामोर्शी ९६, देसाईगंज २८, धानोरा १२२, एटापल्ली ११८, गडचिरोली १०१, कोरची ९२, कुरखेडा ८९, मुलचेरा ६२, सिरोंचा १०१. या गावांचा समावेश आहे. असे एकूण १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत.

https://t.co/u35WG1SpIO?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.