धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील फार्महाउसवर राहतो आहे. मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या लाडक्या खेळाडूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट रांचीला पोहचला आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा रांची एअरपोर्टचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

हार्दिक पांड्या आपली गर्लफ्रेंड आणि भाऊ कृणाल पांड्यासोबत बडोद्यावरुन खासगी जेट विमानाने बडोद्यावरुन रांचीला पोहचला. हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीत धोनीचा महत्वाचा वाटा आहे. भारतीय संघात अनेक खडतर प्रसंगी धोनीने हार्दिकला आपला पाठींबा दर्शवला आहे. याच कारणासाठी पांड्या धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट रांचीला पोहचला. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यावरून त्याचे धोनीवर असणारे प्रेम देखील दिसून येते आहे.


View this post on Instagram

 

A post shared by MS Dhoni Fans Club (@dhoni.bhakt) on Jul 7, 2020 at 6:17am PDT

 

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीला मैदानात पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते, परंतु करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं आहे. आपल्या कारकिर्दीत धोनीने जवळपास सर्व ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.