हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, आपल्यातील बहुतेकजण घरूनच काम करत आहेत. या अगोदरही आम्ही बर्याच वेळा वर्क फ्रॉम होम चे नाव ऐकले आहे, कदाचित ते केले सुद्धा असेल, पण तुम्ही कधी स्टेजवरून वर्क फ्रॉम होम केल्याचे ऐकले आहे का ? नसेल,ऐकले तर, काही हरकत नाही. मात्र एका लग्नात एका वधूने चक्क तसे केले आहे.
सोशल मीडियावर लग्नाच्या स्टेजवर वधूचा लॅपटॉप घेऊन काम करण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही वधू आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना दिसत आहेत तर दुसऱ्या हाताने तिने मोबाइल धरला आहे. या व्हिडिओमध्ये त्या वधूला पाहून असे दिसते आहे की, जणू कोणीतरी तिला फोनवर सूचना देत आहे आणि ती लॅपटॉपवरुन फॉलो करते आहे. त्याचवेळी या व्हिडिओत शेजारी बसून नवरदेव काय करीत आहे ते पहा …
If you think you are under work pressure then watch this… via WA @hvgoenka pic.twitter.com/odbFTxNofh
— Dinesh Joshi. (@dineshjoshi70) July 3, 2020
स्टेजवर नववधूने अश्या प्रकारे काम केल्याचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युझर्स बरेच आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाले आहेत. हा व्हिडिओ ट्विटर यूजर्स दिनेश जोशी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,’ जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर कामाचा दबाव आहे, तर हे बघा. या व्हिडिओवर बर्याच प्रकारच्या कमेंट्सआलेल्या आहेत. एका युजरने असेही लिहिले आहे की, स्टेजवर वराशेजारी बसलेली वधू जास्त ऑफिसची कामे करत आहे, त्यामुळे तिला तिच्या लग्नाच्या दिवसाचा आनंद लुटता येत नाही.’
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ट्विटर यूजर कावई म्हणाले की, नातेवाईकांच्या बनावटी हास्याला दुर्लक्ष करून असे करणे कधीही चांगलेच आहे.
If you think you are under work pressure then watch this… via WA @hvgoenka pic.twitter.com/odbFTxNofh
— Dinesh Joshi. (@dineshjoshi70) July 3, 2020
त्याचबरोबर आणखी एक युझर आशादीपला वाटते की,ही वधू एक नाटक करत आहे. अशा गोंगाटाच्या वातावरणात फोन कसा काय ऐकू शकता.
If you think you are under work pressure then watch this… via WA @hvgoenka pic.twitter.com/odbFTxNofh
— Dinesh Joshi. (@dineshjoshi70) July 3, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.