हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटाशी सामना करताना आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधन केलं. गेल्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी मोदींनी लोकांना थाळीनादचे आवाहन केलं होत. याही वेळी त्यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे जाळून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे करोनाशी लढणाऱ्या देशातील जनतेला केले आहे. मात्र, यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागण्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही दिवे तर लावून, मात्र तुम्ही साथीच्या आजाराचे तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ काय म्हणतात ते ऐकावे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींना चिदंबरम यांनी प्रतिआवाहन केले आहे.प्रतिकवाद महत्त्वाचा आहे, मात्र संकटावर मात करण्यासाठी उपायांवर गंभीर विचारकरणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असा टोलाही पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.
पी. चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. आज देशाने पुन्हा प्रधान शोमॅनना ऐकले असे थरूर म्हणाले. त्यांनी लोकांची दु:ख आर्थिक संकटाबाबत काहीही म्हटले नाही. भविष्यासाठी काय योजना आहेत, तसेच लॉकडाऊननंतर काय होईल, अशा मुद्द्यांवर काहीही म्हटले नाही. फक्त एक फिलगुड स्थिती निर्माण केली, असे थरूर म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता