Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 1669

आ. बाळासाहेब पाटील यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन

Anganwadi workers

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत, प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. तेव्हा वेतनवाढ करावी अशी, मागणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी केली आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना निवदेन देण्यात आले. यावेळी अध्यक्षा नुरजहा शिकलगार, सचिव सुकेशनी गाडे, उपसचिव संगीता गुरव यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

निवेदनात म्हटले आहे की, सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. कामांचा बोजा मात्र दररोज वाढत चालला आहे. आम्ही वेळोवेळी प्रकल्पापासून विधानसभेपर्यंत मोर्चे काढतो, आश्वासनांपलिकडे सरकार काहीच करत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी असतांना महिला व बालविकास विभागाने पोषण ट्रॅकर नावाचा अॅप इंग्लिशमध्ये अंगणवाडीला सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये अपलोड करायला सांगितला आहे. 2018 ला आम्हांला निकृष्ट दर्जाचे मोबाईल सरकारने दिले होते. त्यापैकी जादातर मोबाईल बिघडले आहेत. काहींवर ते अॅप डाऊनलोड होत नाहीत. आम्हांला इंग्लिश लिहीणे जमत नाही. परंतु स्थानिक अधिकारी मात्र खाजगी मोबाईल वापरा म्हणतात, धमक्या देतात आम्ही मानसेवी असतांना अपमानकारक बोलतात.

15 नोव्हेंबरला मुंबई विधानसभेवर अंगणवाडी कृती समितीने मोर्चा नेला. दिवाळीपूर्वी मानधनवाढ करणार असे सांगणरे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोर्चासमोर येऊन एक महिन्याची मुदत द्या, मी मानधनवाढ देणार सांगितले. पुढे काहीच झाले नाही, म्हणून नागपूर विधानसभेवर 27 डिसेंबरला मोर्चा गेला. तिथे मी सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांना भेटा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.

अंगणवाडी सेविकाच्या मागण्या पुढीलप्रमाणे-
१) अंगणवाडी कर्मचा-यांना वेतनश्रेणी, बोनस, ग्रॅज्युईटी द्या. दरम्यानच्या कालावधीत किमानवेतन सेविकांना व मिनी सेविकांना 18 हजार रुपये, मदतनीसना 15 हजार रुपये दरमहा द्यावेत.
२) सेविकांना नवीन मोबाईल शासनाने द्यावेत.
३) पोषण ट्रॅकर पूर्ण मराठीत द्यावे.
४) कुपोषण रोखण्यासाठी आहाराचे आत्ताचे दर तिप्पट करा.
५) अंगणवाडी कर्मचा-यांची सध्या भरती प्रक्रीया बंद केली आहे, तातडीने रिक्त जागा भरा.

ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट व शिंदे गटात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता हि सुनावणी पुढील महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, घटनापीठाने हि सुनावणी पुढे ढकलली. शिवसेनेत पडलेली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आदींसह महत्वाच्या मुद्यांवर दोन्ही गटाकडून याचिका करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज घटनापीठाने दिलेल्या निर्णयावर सात सदस्यीय घटनापीठाने या मुद्द्यांचा फेरविचार करावा तसेच सुनावणी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. आता 14 फेब्रुवारीला सलग सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निकाल आता पुढील महिन्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर पडला आहे.

निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मित्राने केली मित्राचीच हत्या

Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीवरून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या (killed) केली आहे. निवडणुकीच्या विरोधात काम केल्याच्या रागातून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या दरम्यान तिघांमधील एकाला गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू (killed) झाला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना बीडमधील आष्टी या ठिकाणी घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून दोन भाऊ आणि अन्य एकास घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना बीडच्या आष्टी शहरात घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान काल रात्री मृत्यू (killed) झाला.

तात्या बबन सुरवसे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाना बबन सुरवसे आणि अमोल मुरकुटे हे दोघे या हाणामारीत गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आष्टी पोलिसात नगरसेवकांसह ईतर आरोपी विरोधात गुन्हा (killed) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे अद्याप फरार आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

आनंदराव चव्हाण पंतसंस्थेकडून धनादेश व ठेव पावतीचे वितरण

Anandrao Chavan Pantsanstha

कराड | मंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पाटण शाखेतील कर्जदार सभासद अपघातात मृत्यू पावले. त्याच्या कर्जाला विमा संरक्षण असल्याने कर्ज भरून उर्वरित रक्कम वारसांना देण्यात आली. आनंदराव चव्हाण पंतसंस्थेचचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

पाटण शाखेतील सभासद मुबारक चांद शेख (रा. पाटण) यांचे मुंबई येथे अपघाती निधन झाले. त्यांनी संस्थेतून कर्ज घेतले होते. त्या कर्जास संस्थेने विमा संरक्षण दिले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर संस्थेने त्यांच्या विमा रकमेचा क्लेम करून कर्ज रक्कम भरणा केली. तसेच शिल्लक राहिलेल्या विमा रकमेचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना वितरण करण्यात आला. मुबारक शेख यांचे कर्ज 50 हजार रूपये होते. तर विमा संरक्षण 1 लाख 50 हजार रूपये होते. यावेळी पाटण सल्लागार समितीचे सदस्य महिपती जाधव, तुषार पवार, शाखाप्रमुख नंदकुमार पाटील, कॅशिअर भूषण घाडगे, लिपिक अनिता घाडगे, स्वाती मोळावडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

उंब्रज शाखेत ठेव पावतीचे वितरण
मुंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पंतसंस्थेच्या उंब्रज शाखेच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त साजरा झाला. संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी सभासद सत्यवान मोहिते, शाखा उंब्रज शाखाप्रमुख रोहित सुनील माने, कॅशिअर सुनिल कदम, जयश्री शितोळे, उमेश पालकर यांच्यासह कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

तीनदिवसीय सुरजागड यात्रा महोत्सव संपन्न; सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण, विविध समस्यांवर मंथन

एटापल्ली : तालुक्यातील प्रशिद्ध सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरात आदिवासींचे दैवत ओअदाल पेन, ठाकुर देव यात्रा महोत्सव पाच जानेवारी ते सात जानेवारी अशा तीन दिवसांत यात्रा सांस्कृतिक, कला, नृत्यांचे सादरीकरण व विविध सामाजिक समस्यांवर विचार मंथन करून उत्साहात संपन्न झाला आहे.

आदिवासी थोर योद्धा स्वातंत्र्य सेनानी विर बाबूराव सेडमाके यांचे वास्तवाने पावन व आदिवासी समाजाचे दैवत ओअदाल पेन, ठाकुर देवाचे श्रद्धा स्थान, मौलीक व जागतिक दर्जाचे लोहखनीज युक्त सुरजागड पहाड़ी परिसरात गेली शेकडो वर्षापासून यात्रा महोत्सवाचे आयोजन सुरजागड हलका पारंपरिक पट्टीच्या वतीने केले जाते.

सुरजागड लोहखनीज गड हा आदिवासींच्या रूढ़ी, पारंपारिक, कला, सांकृतिक, सामाजिक उद्बोधनाचे केंद्र असून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील तथा लगतचे छत्तीसगड़, तेलंगाना व आंध्रप्रदेश राज्यातील आदिवासी बांधव मोठया संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. तीन दिवस होणाऱ्या यात्रा महोत्सवात रूढ़ीपरंपरागत निसर्ग, देवी दैवतांचे पूजन, सांस्कृतिक कला महोत्सव व इलाका पट्टीच्या नागरिकांचे महाचर्चा सत्र घेण्यात आले.

यावेळी सामाजिक समस्या, नागरिकांच्या भौतिक सोयी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा समस्यांच्या उपाययोजनावर तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व रक्षण अशा विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शनातून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, बिरसा ब्रिगेट संयोजक इंजिनिअर सतीश पेंदाम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ग्रामसभांचे प्रतिनिधी तथा जिल्हा परिषद माजी सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, मंगेश नरोटी, अमोल मारकवार, सैनू हिचामी, व आदी मान्यवरांकडून मत व्यक्त करण्यात आले. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

शिंदे- फडणवीस सरकारचा मृत्यू ठरलेला, पुढचा महिना बघणार नाही : खा. संजय राऊत

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

दिल्ली | या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे. जिवंत सरकार नाही. निकाल वेळेत लागला आणि कोणीही अडथळे आणले नाहीत. तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा हल्लाबोल शिंदे- फडणवीस सरकारवर खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दिल्ली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी श्री. राऊत म्हणाले, एक घटनाबाह्य सरकार राज्य करतय, निर्णय घेतयं आणि भ्रष्टाचार करत आहे. या देशात लोकशाही व न्याय व्यवस्था आहे की नाही ही आजच्या खटल्यावरून सिध्द होईल. सत्यमेव जयते तेजाने तळपत असेल तर आम्हाला न्याय मिळेल. एक पक्ष फोडण्यासाठी पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला. गेल्या चार महिन्यापासून निवडणूक आयोग, न्यायालयात आम्ही समोर जात आहोत. तारखावर तारखा पडत असून निष्क्रीय सरकार हसत आहे. महाशक्ती पाठीशी असल्याने घटनाबाह्य सरकार चालत राहील असे त्यांना वाटत आहे. महाशक्ती असेल किंवा अन्य काही असले तरी आमचा देशाच्या न्यायशक्तीवर आमचा विश्वास आहे.

राहूल गांधीच्या यात्रेचा विरोधकांनी धसका घेतला
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा भूमिका स्पष्ट आहे. काश्मीर आणि पंजाब या दोन्ही राज्यातून शेवटचा टप्पा पार करणार आहेत. हा राजकीय इव्हेंट नाही. राहूल गांधीच्या कपड्यावरून कसला वाद करत आहात. एका तपस्वी व्यक्तीप्रमाणे प्रवास करत असल्याची लोकांची भावना आहे. कपड्यावरून व खाण्यावरून वाद निर्माण करणारे लोक देशात द्वेष पसरवत आहेत. राहूल गांधीची भारत जोडो यात्रा ही विरोधकांनी धसका घ्यावा, अशी असल्याची खा. संजय राऊत म्हणाले.

देशात सर्वात असुरक्षित राज्य महाराष्ट्र
महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या आड शिवसेना येवू शकते. त्यामुळे भाजपाने पहिल्यांदा शिवसेनेचे तुकडे केले. उद्या आमच्यावर देशद्रोहीचे गुन्हे दाखल होवू शकतात. सरकारच्या नेतृत्वात देशात महाराष्ट्र राज्य असुरक्षित आहे. पोलिसांचा वापर भांडोत्री गुंडाप्रमाणे करू नका. महाराष्ट्रातील पोलिसांची प्रतिमा जगात होती. ती मलीन करू नका, असेही खा. संजय राऊत म्हणले.

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

bomb threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब (bomb) असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानामध्ये एकूण 236 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते. यानंतर बॉम्बशोधक (bomb) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती गुजरात पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रशियाच्या दूतावासाला मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब (bomb) असल्याची धमकी मिळाली होती. त्यांनी लगेच याची माहिती गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास या विमानाचे जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.

यानंतर या विमानातील 236 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स या सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच गुजरात पोलीस, बॉम्ब (bomb) शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच एनएसजी कमांडोही दाखल झाले असल्याची माहिती जामनगरचे जिल्हा दंडाधिकारी सौरभ पारघी यांच्याकडून देण्यात आली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

सातारा- पाथर्डी महामार्गाचे काम रखडल्याने राष्ट्रवादीचे आंदोलन

Satara-Pathardi highway

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा- पाथर्डी महामार्गाचे काम कोरेगाव शहरात रखडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रचंड प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. पादचाऱ्यांची चालताना होत असलेल्या कसरतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येथील जुना मोटार स्टँडवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करून प्रांताधिकारी, तहसीलदारांना निवेदन देऊन काम तातडीने पूर्णत्वास न्यावे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा संजना जगदाळे, शिवाजीराव महाडिक, प्रतिभा बर्गे, श्रीमंत स. सावंत झांजुर्णे, श्रीमंत नि. झांजुर्णे, अरुण माने, ॲड. प्रभाकर निवेदन बर्गे, संजय पिसाळ, डॉ. गणेश होळ, संजीवनी बर्गे, हेमंत बर्गे, मंदाकिनी बर्गे, संगीता बर्गे, माधुरी चव्हाण, अॅड. पांडुरंग भोसले, प्रतापराव निकम, नाना भिलारे, अजय कदम, किशोर बर्गे, सचिन बर्गे, अजित बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, फरदीन मुजावर, सनी शिर्के, अमरसिंह बर्गे, नितीन लवंगारे, नवनाथ बर्गे, विवेक चव्हाण, वैभव जगदाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी 11 च्या सुमारास जुना मोटार स्टँडवर तेजस शिंदे हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. त्यानंतर सातारा ते पंढरपूर रस्त्याचे काम झाले पाहिजे, पन्नास खोकी एकदम ओके, भ्रष्टाचारी सरकारचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय आदी घोषणा देत ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलन सुरू होताच दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लावून रस्त्याची वाहतूक बंद पडली. बराच काळ घोषणाबाजी झाल्यावर पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना मागणीचे निवेदन देण्यासाठी तहसीलदार कचेरीकडे नेले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते तहसील कचेरी, तेथून प्रांताधिकारी कार्यालयात गेले. दोन्ही ठिकाणी निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

रानडुकरांनी अशी केली बिबट्याची शिकार; पहा Video

wild boar Attack On Leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपण आजपर्यंत अनेक प्राण्याचे व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये काही मन हेलावून टाकणारे, कधी हसू आणणारे तर कधी मनाला धडकी भरवणारे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर बिबट्या (leopard) आणि रानडुक्कर यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बिबट्या (leopard) हा आपल्या शिकारीसाठी ओळखला जातो. तो सहसा आपली शिकार काही झाले तरी सोडत नाही. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चक्क बिबट्याचीच (leopard) शिकार होताना दिसत आहे.भररस्त्यात हि शिकार करण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ gir_forest_animals या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/CmmElTIK2om/?igshid=MDJmNzVkMjY%3D

बिबट्याचा गिरगाईच्या कळपावर हल्ला
मागच्या महिन्यात बिबट्याने (leopard) टाळगावात गाईच्या कळपावर हल्ला केला होता. अशोक कृष्णा सपकाळ यांच्या गीर गाईंच्या कळपावर बिबट्याने भरदुपारी हा हल्ला केला होता. यामध्ये गीर गाईंचे वासरू बिबट्याने ठार केले होते.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

“आत्महत्येपूर्वी तुनिशा डेटिंग ॲपवर ‘त्या’ व्यक्तीशी बोलत होती; शिझानच्या वकिलाचा खुलासा

tunisha and sheezan khan

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिझान खानच्या जामिनावर नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिझानच्या वकिलांनी एक धक्कादायक दावा केला. तुनिशा (tunisha sharma) ही एका डेटिंग ॲपवरील अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती, असे त्यांनी कोर्टामध्ये सांगितले आहे. आत्महत्येच्या काही दिवस आधी तुनिशा (tunisha sharma) अलीच्या कंपनीत होती, असेदेखील त्यांनी कोर्टात सांगितले आहे. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी 11 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. सध्या अभिनेता शिझान सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
24 डिसेंबर रोजी तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. यानंतर तुनिशाच्या (tunisha sharma) आईने केलेल्या आरोपावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी शिझानला अटक करण्यात आली. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

तुनिशाच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी शिझानचा काहीच दोष नाही असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय यांनी कोर्टात सांगितले. इतकंच नव्हे तर आत्महत्येच्या 15 मिनिटं आधी तुनिशा ही अलीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, असा दावादेखील त्यांनी केला आहे. तसेच या अँगलने तपास करण्याची मागणी त्यांनी न्यायाधीशांसमोर केली. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणतीच सुसाईड नोट सापडली नसल्याचेदेखील त्यांनी कोर्टात सांगितले आहे. त्यामुळे आता कोर्ट पुढील सुनावणीत काय निर्णय देते याकडे तुनिशाच्या आणि शिझानच्या कुटुंबियांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय