Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 1670

रानडुकरांनी अशी केली बिबट्याची शिकार; पहा Video

wild boar Attack On Leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपण आजपर्यंत अनेक प्राण्याचे व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये काही मन हेलावून टाकणारे, कधी हसू आणणारे तर कधी मनाला धडकी भरवणारे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर बिबट्या (leopard) आणि रानडुक्कर यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बिबट्या (leopard) हा आपल्या शिकारीसाठी ओळखला जातो. तो सहसा आपली शिकार काही झाले तरी सोडत नाही. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चक्क बिबट्याचीच (leopard) शिकार होताना दिसत आहे.भररस्त्यात हि शिकार करण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ gir_forest_animals या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/CmmElTIK2om/?igshid=MDJmNzVkMjY%3D

बिबट्याचा गिरगाईच्या कळपावर हल्ला
मागच्या महिन्यात बिबट्याने (leopard) टाळगावात गाईच्या कळपावर हल्ला केला होता. अशोक कृष्णा सपकाळ यांच्या गीर गाईंच्या कळपावर बिबट्याने भरदुपारी हा हल्ला केला होता. यामध्ये गीर गाईंचे वासरू बिबट्याने ठार केले होते.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

“आत्महत्येपूर्वी तुनिशा डेटिंग ॲपवर ‘त्या’ व्यक्तीशी बोलत होती; शिझानच्या वकिलाचा खुलासा

tunisha and sheezan khan

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिझान खानच्या जामिनावर नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिझानच्या वकिलांनी एक धक्कादायक दावा केला. तुनिशा (tunisha sharma) ही एका डेटिंग ॲपवरील अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती, असे त्यांनी कोर्टामध्ये सांगितले आहे. आत्महत्येच्या काही दिवस आधी तुनिशा (tunisha sharma) अलीच्या कंपनीत होती, असेदेखील त्यांनी कोर्टात सांगितले आहे. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी 11 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. सध्या अभिनेता शिझान सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
24 डिसेंबर रोजी तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. यानंतर तुनिशाच्या (tunisha sharma) आईने केलेल्या आरोपावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी शिझानला अटक करण्यात आली. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

तुनिशाच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी शिझानचा काहीच दोष नाही असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय यांनी कोर्टात सांगितले. इतकंच नव्हे तर आत्महत्येच्या 15 मिनिटं आधी तुनिशा ही अलीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, असा दावादेखील त्यांनी केला आहे. तसेच या अँगलने तपास करण्याची मागणी त्यांनी न्यायाधीशांसमोर केली. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणतीच सुसाईड नोट सापडली नसल्याचेदेखील त्यांनी कोर्टात सांगितले आहे. त्यामुळे आता कोर्ट पुढील सुनावणीत काय निर्णय देते याकडे तुनिशाच्या आणि शिझानच्या कुटुंबियांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

अन्यथा कासच्या तलावात 26 जानेवारीला घेणार जलसमाधी : ग्रामस्थांचे उपोषण

Kas Lake People

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
कास तलावाची उंची वाढविण्याच्या कामामुळे शेतजमिनी पाण्याखाली जाणार असल्याच्या कारणाने कास ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले असून, यात पाणीसाठ्यानंतर बाधित होणाऱ्या स्थानिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कास येथील तलावाची उंची वाढविण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. परंतु कास ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे मागण्यांचा विचार न झाल्यास कासच्या धरणात तरूण 26 जानेवारी रोजी जलसमाधी घेणार असल्याचे यावेळी सांगितले.

या तलावासाठी 1860 मध्ये 255 एकर क्षेत्र संपादित करण्यात आले होते. यानंतर सांडव्याच्या कामासाठी पुन्हा 1981 रोजी पाच, तर 2014 मध्ये पुन्हा 35 एकर क्षेत्र संपादित करण्यात आले. याठिकाणच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम सध्या सुरू असून, यामुळे पाणीसाठ्यात 12 फुटाने वाढ होणार आहे. पाणीसाठा वाढल्यानंतर शिल्लक जमिनीत जाण्यासाठीची पायवाट देखील बंद होणार असून, शेतीसह रहिवासाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात शिल्लक जमिनीत जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, मुलकीपड जागेतील भूमापन क्रमांक 70 मधील जागा गावठाणासाठी देण्याची, पुनर्वसन कायदा लागू करण्याची, बाधितांना पालिकेत नोकरी देण्याची, काससाठी स्वतंत्र पाणी योजना करण्याची, तसेच पूर्णतः बाधित ग्रामस्थांचे गावठाणामध्ये पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार कार्यवाही न झाल्यास ता. 26 जानेवारी रोजी जलसमाधी घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी दिला.

बंधाऱ्यावरील चोरलेल्या 9 लाख 30 हजारांच्या प्लेटा जप्त : एकाला अटक, एक फरार

Dahiwadi Plats Stolen

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
जाधववस्ती (ता. दहिवडी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरल्यानंतर सातारा येथे विक्रीसाठी आणलेल्या असताना पाठलाग करून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. तर एकजण संशयित आरोपी पळून गेला आहे. अक्षय पोपट धस (वय- 26, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यास स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी जेरबंद केले. नितीन ऊर्फ अप्पा अशोक साळुंखे (वय- 33, रा. भादे, ता. खंडाळा) हा पळून गेला आहे. दोन्ही संशयित मोक्कातील गुन्हेगार आहेत. सातारा पोलिसांनी संशयितांकडून एकूण 9 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना काही जण कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बंधाऱ्यालगत काढून ठेवलेल्या चोरीच्या लोखंडी प्लेटापैकी काही प्लेटा गाडीतून (क्र. MH-11-DD-1187) विक्री करण्याकरिता बॉम्बे रेस्टॉरंट चौक साताऱ्याजवळ थांबला आहे. त्यांनी या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांना दिल्या. तासगावकर यांनी तपास पथकासह जाऊन शोध घेतला असता ही गाडी बॉम्बे रेस्टॉरंट चौक साताऱ्याकडे येताना दिसली. गाडी थांबविण्याचा इशारा केला असता संशयिताने गाडी भरधाव वेगात घेतली. पाठलाग करून गाडी थांबविली असता, त्यातील एक जण पळून गेला. गाडीच्या चालकास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्याने प्लेटा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण 9 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांना सापडलेला व पळून गेलेला दोन्ही संशयित नुकतेच मोक्कामधून जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलिस अंमलदार उत्तम दबडे, पोलिस नाईक तानाजी माने, अजित कर्णे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील दौंड, तसेच पोलिस हवालदार दीपाली यादव यांनी ही कारवाई केली.

कर्मचाऱ्याने मारली थोबाडीत अन् ग्राहक घुसला चाकू घेवून बॅंकेत

HDFC Bank Karad

कराड | बँकेतील कर्मचाऱ्याने थोबाडीत मारल्यामुळे संतप्त झालेला ग्राहक धारदार चाकू घेऊन बँकेत घुसला. आधार कार्ड लिंक करण्यावरून हा वाद झाला. त्यावेळी बँक व्यवस्थापकांसह इतर ग्राहकांनी संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सचिन रामा भिसे (रा. विजयनगर-मुंढे, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बँकेचे व्यवस्थापक अमित काशिनाथ मोती यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या कराड- मलकापूर एचडीएफसी बँकेच्या शाखेत अमित मोती हे व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहेत. सोमवारी बँकेचे दैनंदिन काम सुरू असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बँकेत आरडाओरडा सुरू असल्याचे व्यवस्थापक मोती यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता एक ग्राहक संदीप भस्मे या बँक कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत असल्याचे त्यांना दिसले. याचदरम्यान कर्मचारी संदीप भस्मे यांनी त्या ग्राहकाच्या थोबाडीत मारली. व्यवस्थापक मोती यांनी त्याठिकाणी धाव घेऊन संबंधित ग्राहकाला आपल्यासोबत केबिनमध्ये नेले. त्याच्याशी त्यांनी चर्चा केली असता संबंधित ग्राहक आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत आल्याचे त्यांना समजले. तसेच कर्मचारी भस्मे यांनी थोबाडीत मारल्यामुळे संतप्त झालेला तो ग्राहक भस्मे यांचा खून करणार असल्याचे म्हणत होता.

व्यवस्थापक मोती यांनी त्याला तसे न करण्याबाबत समज दिली. मात्र, त्यांचे काहीही न ऐकता तो ग्राहक बँकेतून निघून गेला. तसेच पाच मिनिटात हातामध्ये चाकू घेऊन तो बँकेमध्ये आला. त्यावेळी सुरक्षारक्षक तसेच इतर ग्राहकांनी त्याला पकडले. घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधिताला ताब्यात घेतले. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसात झाली आहे.

गुटखा पुड्यांमध्ये आढळले तब्बल 40 हजार अमेरिकन डॉलर; कोलकाता विमानतळावर केली कारवाई

kolkata customs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कोलकाता विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सीमाशुल्क विभागाने चक्क गुटखा पुड्यांमधून परदेशी चलन (dollars) जप्त केले आहे. कोलकाता विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकला जाणाऱ्या सामानाची तपासणी केली असता, गुटखाच्या पुड्यांमध्ये तब्बल 40 हजार अमेरिकन डॉलर (dollars) म्हणजे भारतीय चलनानुसार 32 लाख 78 हजार रुपये जप्त केले.

सीमाशुल्क विभागाने या कारवाईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे गुटखाच्या छोट्या पुड्यांमध्ये अमेरिकन डॉलर्सच्या (dollars) नोटा घडीकरून टाकण्यात आल्या आहेत. या पुड्या फोडून त्यातून ही रोकड जप्त करण्यात आली. एवढी मोठी रक्कम अशाप्रकारे नेली जात असल्याचे पाहून कस्टम अधिकारीसुद्धा हैराण झाले आहेत.

मागील काही दिवसांत कोलकातामध्ये परदेशी चलनाशी संबंधित अनेक कारवाया करण्यात आल्या. मात्र असे पहिल्यांदाच घडले आहे की, गुटखाच्या पुड्यांमधून परदेशी चलन (dollars) जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारावर सीमाशुल्क विभागाने हि कारवाई केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

31 डिसेंबरच्या पार्टीनंतर काजोलच्या लेकीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; आता तर काजोलसोबत…

Kajol Nysa Devgan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील ऍक्शन भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण व पत्नी काजोल यांची लाडकी लेक निसा हि 31 डिसेंबरच्या पार्टीतील फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यानंतर आता अटीचा आका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिने शॉर्ट टॉप न घालता चक्क फुल्ल ड्रेस घातला असून आई काजोलसोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.

नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या पार्टीत काजीलची लेक निसा आपल्या मित्रांसोबत सहभागी झाली होती. तिचे पार्टीतील ब्लॅक डिपनेक शॉर्ट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तिच्या या फोटोमुळे काजल व अजयला खूप काही वाटले असावे यात काय शंका नाही. मात्र, त्यानंतर काजोल आपली मुलगी निसा हिला घेऊन थेट सिद्धिविनायकाच्या चरणी गेल्याचे दिसून आले आहे.

https://www.instagram.com/p/CnJJMkcD7ll/

काजोलने आज रविवारच निमित्त साधून आपल्या लेकीसोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मंदिरात बाप्पांचे दर्शन घेऊन बाहेर पडताना या दोघी कॅमेऱ्यात कैद झाल्या. विशेष म्हणजे यावेळी काजोलच्या लेकीने न्यासाने पांढऱ्या रंगाचा चिकनकरीचा सलवार-सूट तर काजोलने फ्लोरल कुर्ता परिधान केला होता. या दोघींनी बाप्पाचे दर्शन घेत कपाळावर अष्टगंध लावला होता.

काजोल आणि अजय देवगणने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपट केलेले आहेत. त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक आजही त्यांचे येणारे चित्रपट आवडीने पाहतात. शिवाय आजच्या जमान्यात काजोलपेक्षा अजय देवगण सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो. त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या पोस्टही केल्या जातात.

Mumbai : अजय देवगणच्या मुलीचे 31 डिसेंबरचे फोटो व्हायरल; मित्रांसोबत रात्री पबमध्ये…

त्यांची लाडकी लेक असलेल्या निसा हिच्या बाबतीत काही दिवसापूर्वी ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आता पुन्हा एकदा आपल्या आई काजोलसोबत ती सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांचे दर्शन घेताना दिसून आली.

धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने साथीदाराची केली हत्या

killed

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच साथीदाराची गोळ्या घालून हत्या (killed) केली आहे. नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरात ही घटना घडली आहे. अविनाश अशोक घुमडे असे हत्या (killed) करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

काय घडले नेमके?
अविनाश घुमडे आणि दीपक घनचक्कर दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. दोघेही अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. दोघेही नेहमी सोबतच राहायचे. घटनेच्या दिवशीदेखील दोघेही एकत्र होते. यावेळी अविनाश दीपकच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि दीपकने आपल्या अन्य तीन ते चार साथीदारांच्या मदतीने अविनाशची हत्या (killed) केली.

याची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…

Stock Tips : नवीन वर्षात ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा

Stock Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : भारतीय शेअर बाजाराने 2023 या नवीन वर्षाची सुरुवात वाढीने केली. या आठवड्याच्या अखेरीस बाजारात घसरणीचे वर्चस्व राहिले. जर आपण या घसरणीमध्ये गुंतवणुकीची नवीन संधी शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण आजच्या या बातमीमध्ये ब्रोकरेज हाऊसने खरेदीचा सल्ला दिलेल्या काही निवडक शेअर्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. हे जाणून घ्या कि, सध्याच्या या घसरणीच्या काळातही विश्लेषकांना काही शेअर्स बाबत आशा आहे. कारण हे शेअर्स सध्याच्या किंमतींपेक्षा 56 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. चला तर मग या या टॉप-5 कंपन्यांच्या शेअर्स बाबतची माहिती जाणून घेऊयात …

Sonata Software to acquire US-based IBIS for $14M

Sonata Software : ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टने या कंपनीच्या शेअर्ससाठी 800.00 रुपयांच्या टार्गेट प्राईससहीत बाय रेटिंग दिले आहे. हे सध्याच्या बाजारभावापेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. सध्या हे शेअर्स 582.55 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. Stock Tips

Nuvoco Vistas IPO: Information analysis | Value Research

Nuvoco Vistas Corporoation : आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअर्ससाठी 490 रुपयांच्या टार्गेट प्राईससहीत बाय रेटिंग दिले आहे. सध्या शेअर्सची सध्याची किंमत 369.95 रुपये आहे. Stock Tips

When will Muthoot Finance stock regain its glitter? | Mint

Muthoot Finance Ltd : ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टर्सने या फायनान्स कंपनीसाठी 1,550 रुपयांच्या टार्गेट प्राईससहीत बाय रेटिंग दिले आहे. या शेअर्सची सध्याची किंमत 1,075.00 रुपये आहे. या शेअर्समध्ये येथून 40 टक्क्यांहून जास्त रिटर्न देण्याची क्षमता असल्याचे मत या फर्मने व्यक्त केले आहे. Stock Tips

Brigade Enterprises Ltd (BRIGADE) announces Q2 FY 18 Financial Results |  The Property Times | Real Estate News & Views Portal

Brigade Enterprises : ज्येष्ठ ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी रिअल इस्टेट कंपनी ब्रिगेड एंटरप्रायझेसच्या शेअर्ससाठी 720.00 रुपयांच्या टार्गेट प्राईससहीत बाय रेटिंग दिले आहे. या शेअर्सची सध्याची किंमत 456.00 रुपये आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा यामध्ये सुमारे 56.28% वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. Stock Tips

India's Nitin Spinners bags TEXPROCIL awards for export performance -  Fibre2Fashion

Nitin Spinners : आयसीआयसीआय डायरेक्टने या कंपनीच्या शेअर्ससाठी 290.00 रुपयांच्या टार्गेट प्राईससहीत बाय रेटिंग दिले आहे. या शेअरची सध्याची किंमत 221.55 रुपये आहे. Stock Tips

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/nitin-spinners-ltd/nitinspin/532698/

हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट
Car च्या डिक्कीत ठेवा ‘हे’ Device; पंक्चर टायर एका मिनिटांत होईल ठीक
‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ