Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2811

संविधानाने दिलेला हा ‘गॅरंटीड’अधिकार; हिजाब वादावर प्रियंका गांधींचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हा प्रकार घडला. दरम्यान, त्याबाबत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानाने दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे. त्यामुळे महिलांचं शोषण करणं थांबवा, असे प्रियंका गांधी वाड्रा यांनी म्हंटले आहे.

कर्नाटकातील हिजाबवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला असल्याने याबाबत आज प्रियंका गांधी यांनीही ट्वीट करत मुलींच्या सुरु असलेल्या शोषणावरुन आवाज उठवला आहे. दरम्यान, त्यांनी आज ट्विट करीत “महिलांनी तसेच स्त्रियांनी काय काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानाने दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे, असे म्हंटले आहे.

वादाचे मूळ कारण काय आहे?

जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितले गेले. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली आहे.

पहिल्यांदाच लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Life Insurance

नवी दिल्ली । साथीच्या रोगानंतरच्या अनिश्चित वातावरणात लोकं लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यावर अधिक भर देत आहेत. तरुणांमध्येही त्याकडे कल वाढला आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी मुलांच्या शिक्षणाबरोबरच रिटायरमेंटसारखी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदी करताना, भविष्यातील प्लॅनिंगची ब्लू प्रिंट निश्चितपणे काढा आणि त्याची किंमत किती असू शकते याचा अंदाज देखील घ्या. हे तुम्हाला योग्य पॉलिसी खरेदी करण्यात मदत करेल.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, एक पॉलिसी आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करू शकणार नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी फंड तयार करायचा असेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे कव्हर घेण्याव्यतिरिक्त तुमच्या जोडीदारासाठीही एमर्जन्सी फंड तयार करायचा असेल तर एकच लाइफ इन्शुरन्स प्लॅन ही सर्व उद्दिष्टे साध्य करू शकणार नाही. तुम्ही पहिल्यांदाच लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

उत्पन्नाच्या किमान 10% पर्यंत कव्हर घ्या
पहिल्यांदा पॉलिसी खरेदी करताना, किती कव्हर घ्यायचे याबद्दल बहुतेक लोकं गोंधळलेले असतात. यासाठी बहुतेक आर्थिक तज्ञ शिफारस करतात की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या किमान 10 पट लाइफ कव्हर घ्यावे. हा सल्ला चांगला आहे मात्र प्रत्येकाने आपल्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन कव्हर ठरवावे. त्यासाठी उत्पन्न, कर्ज, बचत आणि जीवनशैली इत्यादींच्या आधारे निर्णय घेता येतील.

आर्थिक गरजांचे पुनरावलोकन आवश्यक आहे
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक गरजा वेगवेगळ्या असतात. तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आर्थिक गरजा वेगळ्या असतील आणि जेव्हा तुम्हाला मुले होतील तेव्हा तुमच्या आर्थिक गरजा वेगळ्या असतील. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या आर्थिक पोर्टफोलिओचे वार्षिक किंवा नियमित अंतराने पुनरावलोकन करत राहणे महत्त्वाचे आहे. मात्र, दरवर्षी असे करणे अवघड ठरू शकते, त्यामुळे लग्न, नवीन घर, मुलाचा जन्म इ. यांसारख्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आपल्या कव्हर आवश्यकतांचे पुनरावलोकन करा.

आवश्यक माहिती उघड करणे आवश्यक आहे
तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत असताना, सर्व आवश्यक माहिती उघड करण्याचे सुनिश्चित करा. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा मुख्य उद्देश कुटुंबाला आपल्या अनुपस्थितीत आर्थिक आधार देणे हा आहे. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदी करताना, आपल्याबद्दलची सर्व माहिती उघड करा जेणेकरून क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, तुम्ही कोणती पॉलिसी खरेदी करावी याबद्दल तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. सल्लामसलत केल्यानंतर स्वतः रिसर्च करा.

इन्शुरन्स कंपनी कशी निवडावी ?
इन्शुरन्स कंपनी हे प्रसिद्ध नाव असो वा नसो, ती का चर्चेत असते हे शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधू शकता. तुम्ही कंपनीच्या क्लेम सेटलमेंट सारखा महत्त्वाचा डेटा पाहू शकता. पॉलिसी खरेदी करण्यासाठी इन्शुरन्स कंपनी निवडण्यात हे तुम्हाला मदत करेल.

हभप बंडातात्या सातारा शहर पोलिस ठाण्यात आले आणि गेले

सातारा | सातारा येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून दंडुका, दंडवत आंदोलन करणे व खा. सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. याविषयी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी ह. भ. प बंडातात्या कराडकर आज बुधवारी दि. 9 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. सातारा पोलिस ठाण्यात आले आणि केवळ अर्धा तासात गेले.

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी व्यसन मुक्त युवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वारकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सातारा शहर पोलिसांनी जमावबंदी आदेशाच्या भंगाचा गुन्हा बंडातात्यासह 125 जणांवर दाखल केला होता. तसेच महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांनी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशीसाठी सातारा पोलिसांनी बंडातात्यांना आज बोलावले होते. त्यानुसार बंडातात्या आज सातारा शहर पोलिसात दाखल झाले आहेत. या दोन गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपासी अधिकाऱ्यांने चौकशी केली. त्यानंतर अर्ध्या तासातच बंडातात्या निघूनही गेले.

“सिंह कधी गिधाडाच्या धमक्यांना घाबरत नाही”; फडणवीसांचा राऊतांच्या ट्विटवर पलटवार

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’,असे ट्विट केले. त्यांच्या ट्विटला भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत पलटवार केला आहे. सिह कधी गिधाडाला घाबरत नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज गोवा येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, सिंह कधी गिधाडाच्या धमक्यांना भीत नाही. त्यांना ज्या काही समस्या आहेत, त्यांनी त्या कोर्टात मांडव्यात, असे फडणवीस यांनी म्हंटले.

ईडी काय आणि का कारवाई करत आहे हे ते सांगेल. राऊत यांना ‘ईडी’ बद्दल ज्या काही तक्रारी आहे, त्यांनी त्या कोर्टात मांडाव्यात. संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन सर्वांचे मनोरंजन करतात. यापेक्षा त्यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व देता येणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

स्वस्त कर्जासाठी ग्राहकांनी अवलंबली ‘ही’ पद्धत, याचा फायदा कसा घेता येईल जाणून घ्या

home

नवी दिल्ली । RBI च्या कृपेमुळे देशातील कर्जाचे व्याजदर ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाले आहेत. कॉर्पोरेट कर्जदारांसोबतच होम लोन आणि इतर प्रकारचे रिटेल लोन घेणारे ग्राहकही याचा फायदा घेत आहेत. यासाठी कर्जदार आपले कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करून घेत आहेत.

स्वस्त कर्जाचा फायदा घेण्यासाठी ग्राहक इतर बँकांकडे धाव घेत असल्याचे अनेक बड्या बँकांच्या प्रमुखांचे म्हणणे आहे. मायनिंग सेक्टर मधील प्रमुख वेदांता ने 31 जानेवारी रोजी सांगितले होते की,” ते आपले 8,000 कोटी रुपयांचे लोन युनियन बँक ऑफ इंडियाकडे ट्रान्सफर करू इच्छित आहे.” कंपनीने 2020 मध्ये SBIच्या नेतृत्वाखालील बँकेच्या ग्रुपकडून 10.5 टक्के व्याजदराने 10 हजार कोटींचे लोन घेतले होते. कंपनी ट्रान्सफर करून व्याजदर 2 टक्क्यांनी कमी करू शकते.

मजबूत बॅलन्सशीट असलेले कर्जदारही स्वस्त कर्जाच्या शोधात आहेत
PNB, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे की,’ पुरेशी तरलता आणि मजबूत बॅलन्सशीट असलेले कॉर्पोरेट कर्जदार बँकांवर व्याज कमी करण्यासाठी दबाव आणत आहेत आणि बँकांमधील स्पर्धा वाढल्यामुळे दर देखील कमी होत आहेत.” बँक ऑफ बडोदाचे मुख्य कार्यकारी संजीव चढ्ढा म्हणतात की,”व्याजदर कपातीचे चक्र सुरू झाल्यापासून ग्राहक सतत बँका बदलत आहेत.”

होम लोनचे ग्राहकही बँका बदलत आहेत
बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक स्वरूप दासगुप्ता सांगतात की,”होम लोन सुरक्षित असल्यामुळे ग्राहक बँकांवर व्याजदर कमी करण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणत आहेत. अनेक बँका आपले खेळते भांडवल नवीन कर्ज वाटप करण्यासाठी वापरू शकत नाहीत. SBI चे स्वतःचे खेळते भांडवल 2.06 लाख कोटी आहे, त्यापैकी 1.99 लाख कोटी वापरले जात नाहीत.”

येत्या तिमाहीत गोष्टी सुधारतील
पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) मुख्य कार्यकारी एसएस मल्लिकार्जुन राव म्हणतात की.” येत्या तिमाहीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढवू शकते. तरच कर्ज ट्रान्सफरच्या त्रासातून सुटका होईल. सध्या स्वस्त कर्जाच्या लालसेपोटी ग्राहक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करत आहेत. अशा स्थितीत काही बँकांना ग्राहकांना रोखण्यासाठी व्याजदर स्वस्त करावे लागले आहेत.”

“झुकेंगे नही… जय महाराष्ट्र”; संजय राऊतांचे ट्विटद्वारे भाजपला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून थेट सक्तवसुली संचलनालयाला आव्हान दिले आहे. दरम्यान त्यांनी सकाळी भाजपवरही निशाणा साधल्यानंतर नवे ट्विट केले आहे. ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’, असे लिहीत त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये एका डरकाळी फोडणाऱ्या वाघाचे चित्र टाकले आहे. आणि त्या ट्विटमधील फोटोवर त्यांनी ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’, असा मजकूर लिहला आहे. राऊतांनी अशा प्रकारचे ट्विट करीत आपण लवकरच काहीतरी राजकीय धमाका करणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

दरम्यान, आज जेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवाईवरून केंद्रातील भाजपवर निशाणा साधला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करणार असून ईडीच्या अधिकाऱ्यांवरच आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे आहेत. या अधिकाऱ्यांचे बाहेर वसूली एजंट आहेत. त्यांच्या माध्यमातून ईडीचे अधिकारी खंडणी गोळा करतात. मला आणि ठाकरे परिवाराला ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे.

आता हॉस्पिटलमध्येच बनवले जाणार आधार कार्ड, याविषयीची UIDAI ची योजना जाणून घ्या

aadhar card

नवी दिल्ली । आधार हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता जवळपास सर्वच कामांसाठी ते आवश्यक झाले आहे. UIDAI आता हॉस्पिटलमध्येच नवजात मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे. सध्या बालकांचे आधार कार्ड बनवण्याची सुविधा रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपद्वारे बालकांचे आधार कार्ड बनवावे लागते. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल.

आता UIDAI ने बाळाला जन्मासोबतच संपूर्ण आधार कार्ड देण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये बायोमेट्रिक्स देखील पूर्ण केले जाईल. यासाठी UIDAI, हॉस्पिटल्समध्ये ही सुविधा देण्यासाठी बर्थ रजिस्‍ट्रार सोबत काम करत आहे. रुग्णालयातच ही सुविधा सुरू झाल्याने लोकांना मोठी मदत होणार असून यामुळे बालकांचे आधार कार्डही सहजपणे बनवले जाणार आहे.

दररोज 2.5 कोटी बालके जन्माला येतात
UIDAI चे CEO सौरभ गर्ग म्हणतात की,”भारतात दररोज सुमारे 2.5 कोटी बाळांचा जन्म होतो. अशा परिस्थितीत UIDAI ची योजना आहे की, रुग्णालयात जन्मलेल्या मुलांचे फोटो काढल्यानंतर त्याच वेळी आधार कार्डही जारी केले जाईल. यामुळे मुलाच्या पालकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल आणि त्यांचा वेळही वाचेल. UIDAI या योजनेसाठी बर्थ रजिस्ट्रारशी मिळून काम करणार असून यासाठी बोलणी देखील सुरू केली आहे. लवकरच या विषयाबाबत एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकेल.” सध्या 5 वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डसाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, मात्र जेव्हा त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त होते, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स करणे अनिवार्य होते.

प्रादेशिक भाषांमध्येही आधार बनवण्यात येणार 
UIDAI चे सीईओ सौरभ म्हणाले की,”आता आधार कार्ड प्रादेशिक भाषेतही बनवले जाईल.” ते म्हणाले की,”देशात आधार कार्डवर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेतच माहिती दिली जाते, मात्र आता ती इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. लवकरच, कार्डधारकाचे नाव आणि इतर डिटेल्स आधार कार्डवर पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, उडिया, मराठी अशा सर्व प्रादेशिक भाषांमध्येही दिसतील.”

तीनशे एकरावरील ऊस जळून झाला खाक, शेतकऱ्याचे एक कोटीचे नुकसान

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश परब

महापूर आणि अतिवृष्टी या संकटांनंतर दुधगाव येथील ऊसाला दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये सुमारे तीनशे एकरांवरील ऊस जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू आगीचे लोट भयानक असल्याने अपयश आले. आगीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अज्ञाताकडून आग लावण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत ऊस जळत असताना हतबल झाल्याचे दिसून आले.

वारणा नदीकाठावर असलेल्या दुधगावमध्ये ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ऊसतोड हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबर आणि जानेवारीच्या प्रारंभीच झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊसतोडीवर परिणाम झाला होता. सध्या ऊसाचा हंगाम मध्यावधीत आला आहे. फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही आडसाली लागणही शेतात उभी असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली असताना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास डिग्रज वाट, दुधगाव-कवठेपिरान रोडवरील ओढ्यापासून गणपती मंदीराजवळ कवठेपिरान हद्दीपर्यंतचा ऊसाला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले.

अचानक ऊसातून धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, परंतू ऊस आणि ऊसाचे पाचत लवकर पेट घेत होते. आगीची दाहकता जादा असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. त्यामध्ये दीड एकर परिसरातील सुमारे तीनशे एकरावरील ऊस जळून खाक झाला. त्यामध्ये अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर वर्षभर सांभाळून ठेवलेला ऊस जळून खाक झाला. या भागात ऊसाचे मुख्य पीक आहे, ऊसावरच शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन असते. या आगीत ऊसाचेच नाही, तर इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र तसेच काँग्रेसवर टीका केली. या विरोधात आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले. “महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारे राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केले, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही, असा इशारा पटोले यांनी पंतप्रधानांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणा दरम्यान केलेल्या विधाना विरोधात महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे”.

यावेळी मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. “मोदी ते तानाशाही नही चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, अशी घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

धक्कादायक !!! वृद्ध आईचा गळा आवळून खून करत मुलाची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश परब

आष्टा शहरातील दत्त वसाहत येथे मुलाने आपल्या ८० वर्षीय वृद्ध आईचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. श्रीमती रतन रामचंद्र कांबळे असे खून झालेल्या आईचे नाव आहे. शशिकांत रामचंद्र कांबळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना हि मंगळवारी रात्री घडली. या घटनेची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे.

शशिकांत कांबळे हा पत्नी, दोन मुले व आई रतन कांबळे यांच्यासह आष्ट्यातील दत्त वसाहत येथे वास्तव्यास आहेत. शशिकांतचे वडील रामचंद्र कांबळे व आई रतन कांबळे दोघेही प्राथमिक शिक्षक होते. वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे सध्या याठिकाणी श्रीमती रतन कांबळे या मुलगा शशिकांत, सून सुनीता व दोन नातवंडांसमवेत रहात होत्या. शशिकांत याचे आष्टा शहरात कापड दुकान आहे. मंगळवारी पत्नी व मुले माहेरी गेल्याने आई व शशिकांत दोघेही घरी एकत्र होते. शशिकांत यास दम्याचा आजार होता. यातून त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्याने कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला व या नैराश्यात तच त्याने दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी सुनिता ही वारंवार फोन करूनही शशिकांत फोन उचलत नसल्यामुळे ती आपल्या भावासोबत आष्टा येथे घरी आली. हाका मारुनही घराचा दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा मोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शशिकांत याने आईचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी शशिकांत याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून यात माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे असे लिहिले आहे. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.