Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2816

Gold Price : सोने पुन्हा होऊ लागले महाग, आजची किंमत तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराईच्या मोसमाने भारतीय सराफा बाजाराची चमक पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात काहीशी नरमाई आली आहे. चांदीचे भाव आज 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

आज सोन्याचा भाव किती आहे?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.13 टक्क्यांनी वाढून 48,290 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

आज चांदीचा भाव किती आहे?
त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरातही जोरदार वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.24 टक्क्यांनी घसरून 61,884 रुपयांवर आला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,500 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,260 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,530 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,400 रुपये
पुणे – 45,350 रुपये
नागपूर – 45,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,260 रुपये
पुणे – 49,500 रुपये
नागपूर – 49,530 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4510.00 Rs 4505.00 -0.111 %⌄
8 GRAM Rs 36080 Rs 36040 -0.111 %⌄
10 GRAM Rs 45100 Rs 45050 -0.111 %⌄
100 GRAM Rs 451000 Rs 450500 -0.111 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4910.00 Rs 4906.00 -0.082 %⌄
8 GRAM Rs 39280 Rs 39248 -0.082 %⌄
10 GRAM Rs 49100 Rs 49060 -0.082 %⌄
100 GRAM Rs 491000 Rs 490600 -0.082 %⌄

Share Market : बाजाराची जोरदार सुरुवात, निफ्टी 17,200 च्या वर

Share Market

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराची मंगळवारी चांगली सुरुवात झाली. निफ्टी 50 हून अधिकच्या अंकांच्या वाढीसह उघडला आहे. निफ्टी 17,200 च्या वर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, सेन्सेक्स 250 अंकांच्या वाढीसह 57,870 च्या आसपास ट्रेड करत आहे. बँक निफ्टीमध्ये जवळपास 100 अंकांची मजबूती दिसून येत आहे.

आजपासून क्रेडिट पॉलिसीवर एमपीसीची बैठक
आजपासून क्रेडिट पॉलिसीवर एमपीसीची 3 दिवसीय बैठक होणार आहे. परवा म्हणजेच 10 फेब्रुवारीला पॉलिसी जाहीर केले जाईल. आवाज MPC मधील बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांनी रिव्हर्स रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अदानी विल्मर IPO
देशातील सर्वात मोठ्या FMCG (फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स) कंपन्यांपैकी एक असलेल्या Adani Wilmar ची इनिशिअल पब्लिक ऑफर आज 8 फेब्रुवारी रोजी BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, अदानी विल्मरचे शेअर्स त्याच्या इश्यू प्राईसच्या 15% च्या प्रीमियमने शेअर बाजारात प्रवेश करू शकतात आणि याचे श्रेय ब्रँडेड खाद्यतेल उद्योगात कंपनीचे वर्चस्व, पॅकेज्ड फूड व्यवसायातील तिची स्थिर वाढ आणि त्याचे उत्पादन. पोर्टफोलिओमधील वैविध्य, कंपनीचे चांगले आर्थिक आकडे आणि चांगली ब्रँड व्हॅल्यू यांसारखे घटक उद्धृत केले गेले.

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत दिसत आहेत. आशियाने दमदार सुरुवात केली आहे. SGX NIFTY सुमारे एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढतो आहे. मात्र, काल अमेरिकी बाजार संमिश्र बंद झाले. आज DOW FUTURES मध्ये थोडी वाढ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेले विधान अगदी हास्यास्पद आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी आहे, असे राऊत यांनी टीका केली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेवरून प्रत्युत्तर दिले. तसेच टीकाही केली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी काल कोरोना काळात मुंबई व महाराष्ट्रातून जीवाच्या धास्तीने पलायन केलेल्या परप्रांतीयांमुळेच देशभरात कोरोना पसरला, असे विधान संसदेत केले.

मोदी यांचे हे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी कोणतेही पूर्वनियोजन न करता पुरेसा वेळ न देता टाळेबंदी लागू केली. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांवर विशेषत: मजुरावर देशोधडीला लागण्याची वेळ आली. हे आपले अपयश लपविण्यासाठी मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करण्याची पळवाट शोधली असल्याचेही यावेळी राऊत यांनी सांगितले.

कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

Raut Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हणत महाराष्ट्र सरकार मधील नेत्यांनी यावर बोलावं असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक आरोग्य संघटनेनंही मांडणी केलीय. त्यामुळे मोदींनी कोरोनाचे खापर महाराष्ट्रावर खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल. महाराष्ट्र सरकार मधील नेत्यांनी मोदींच्या आरोपावर उत्तर द्यावे, प्रत्येक वेळी मीच बोलायचा ठेका घेतला नाही असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्र सरकार कसं काम करतंय याचे दाखले सुप्रीम कोर्टानं, हाय कोर्टानं इतरांना दिले आहेत.. त्यामुळे मोदींनी अशा प्रकारचा आरोप करणे म्हणजे डॉक्टर, नर्सेस यांनी काम केलं, हौतात्म्य पत्करलं त्यांचा अपमान आहे असेही राऊतांनी म्हंटल.

कृष्णा नदीकाठी शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबट्या सापडला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बंगळूर महामार्गावरील खोडशी (ता. कराड) येथे आज मंगळवारी दि. 8 रोजी पहाटे बिबट्या सापडला आहे.  शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकला. बिबट्या सापडल्याने खोडशीसह परिसरातील गोटे, वनवासमाची गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

कराडनजीक खोडशी येथे कृष्णा नदी कडेला सावकार वस्ती नजीक शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. पहाटे बाळासाहेब पाटील यांच्या गुऱ्हाळ घरावरील काही लोक मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. तेव्हा कोणत्यातरी प्राण्याचा आवाज येत असल्याचे घटनास्थळावरील लोकांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी पुढे जावून पाहिले असता बिबट्या असल्याचे दिसून आले. यानंतर आता खोडशी भागात बिबट्याचा वावर असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. आज सकाळी कृष्णा नदीकडेला म्हसोबा मंदिरावजवळ बिबट्या फासकीत अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले.

सकाळी वनविभाग पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. आज दाट धुके पसरले होते सावकर वस्ती येथे शेतकन्याला बिबट्या फासकीत अडकल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली.

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नये; प्रकाश आंबेडकर यांचा टोला

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली होती. दरम्यान, आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद रंगला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत. खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावे, त्याची स्मशानभूमी करु नये, असाही टोला आंबेडकर यांनी लगावला आहे.

प्रकाश आबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवे होते. त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाही.”

“मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक करण्यावरून केल्या जात असलेल्या राजकारणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला. शिवाजी पार्क हे मुंबईतील एक मैदान आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. त्या ठिकाणी स्मशानभूमी केली जाऊ नये,” असे आंबडेकर यांनी यावेळी म्हंटले.

गुप्तधन शोधणाऱ्या तरूणाचा खून : सातारा, सांगली जिल्ह्यातील सहा जणांवर गुन्हा

तासगाव | चार महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज घाटात एकाचा खून झाला होता. पैसे घेऊनही गुप्तधन शोधले नाही म्हणून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सातारा जिल्ह्यातील दोघांचा संशयित आरोपी म्हणून समावेश आहे. अवधूत सोपान शिंदे (वय- 29, रा. धामणी, ता. तासगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी वैभव नेताजी सकट, अमोल विठ्ठल कारंडे (दोघेही रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा), आनंदराव आत्माराम पाटील (वय- 57, रा. पाडळी, ता. तासगाव), तुषार बाळू कुंभार (वय- 28, रा. घोटी खुर्द, ता. तासगाव), लखन ठोंबरे (रा. पंचशीलनगर, विटा) व अण्णा (पूर्ण नाव समजू शकले नाही) या सहा जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदराव पाटील, तुषार कुंभार व अमोल कारंडे या तिघांना अटक करून पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवधूतचा खून करून अपघात झाल्याचा बनाव करण्यासाठी त्याचा मृतदेह व मोटारसायकल नागज घाटात टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. गुप्तधन शोधण्यासाठी संशयित आनंदराव पाटील यांच्याकडून व इतरांकडून पैसे व सोने घेतले होते. परंतु गुप्तधन न शोधले नाही आणि पैसेही देत नसल्याच्या कारणावरून त्याचा खून केला असल्याचे संशयित आरोपींनी कबूल केले आहे. दि. 17 ऑक्टोबर 2021 रोजी अवधूत शिंदे यांचा मृतदेह नागज घाटात विटा-जत रस्त्यापासून सुमारे दहा फूट खाली सडलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याच्या मृतदेहाजवळ मोटारसायकल पडलेली असल्याने हा अपघात असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात होता. नागजचे पोलिस पाटील दीपक शिंदे यांनी या घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे गतीने हलवली.

दरम्यान आनंदराव पाटील, तुषार कुंभार, लखन ठोंबरे, वैभव सकट, अमोल कारंडे व अन्य एकाने आठ ऑक्टोबरला रात्री अवधूतला खटाव तालुक्यातील आंबवडे गावाच्या माळावर नेऊन काठ्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केला. संशयितांच्या कारमधून त्याचा मृतदेह नागज घाटात आणून टाकला. अवधूतचा खून केला नसून त्याचा अपघात झाला असल्याचा बनाव करण्यासाठी संशयितांनी त्याच्या मृतदेहाजवळ मोबाईल व बुलेट मोटारसायकल टाकून दिली होती. दरम्यान कवठेमहांकाळ पोलिसांनी चार महिन्यात या खुनाचा छडा लावून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. तिघा संशयितांना अटक केली असून अन्य तीन संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

मोदींच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कोरोना काळातील मदतकार्याची यादीच जाहीर केली

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकारण तापलं आहे. मोदींच्या या गंभीर आरोपांना काँग्रेसने तात्काळ प्रत्युत्तर देत कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची यादीच आपल्या ट्विटर हँडल वरून जाहीर केले आहे.

काँग्रेसनं दिलेली मदतकार्याची यादी

महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं राज्यातील 1 कोटी 10 लाख नागरिकांना धान्य, प्रवास आणि आरोग्य किटचे वाटप

2 लाख 10 हजार स्थलांतरित मजूर आणि गरजू नागरिकांना नियमित भोजनाची व्यवस्था

सुमारे 36.5 लाख नागरिकांना धान्य आणि रेशन किटचे वाटप

श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून 22 हजार 702 मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. काँग्रेसनं प्रवास खर्च उचलला. काँग्रेसनं 11 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांचा पूर्ण खर्च आणि 24 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांचा अंशत: खर्च उचलला.

1 लाख 33 हजार 992 स्थलांतरित मजुरांना आणि 2 हजार 577 विद्यार्थ्यांना स्वत:च्या राज्यात जाण्यासाठीचा वाहतूक खर्च काँग्रेस पक्षानं उचलला. काँग्रेस पक्षानं खासगी वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे प्रवासाचा खर्च उचलला.

स्थलांतरित मजुरांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली होती.

हेल्पलाईन द्वारे थेट 40 लाख नागरिकांना महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं मदत करण्यात आली.

24.6 लाख नागरिकांना औषधे आणि आरोग्य संवर्धक किटचे वाटप

डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 14 हजार पीपीई किटचे वाटप

रक्ताचा तुटवडा जाणवल्यानंतर 20 हजार काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रक्तदान

सांगली, नागपूर, पुणे, मुंबई, रायगड आणि कोल्हापूर येथे स्थलांतरित मजुरांसाठी मोबाईल क्लिनिकची सुरुवात

मोदी नेमकं काय म्हणाले

महाराष्ट्र काँग्रेस मुळे कोरोना देशभर पसरला. उत्तर प्रदेश, बिहार येथील मजुरांना  मुंबई महाराष्ट्रातून पलायन करण्यास काँग्रेसने भाग पाडले. त्यांना मोफत तिकिटं देऊन महाराष्ट्राबाहेर पिटाळण्यात आले. त्यामुळेच जिथे करोना कमी होता त्या राज्यांनाही करोनाचा विळखा पडला असे म्हणत मोदींनी काँग्रेस वर टीका केली.

दररोज लाखाच्या महसुलावर मनपा सोडते ‘पाणी’

औरंगाबाद – कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने कमी होत आहे. शासन आदेशानुसार बीबी का मकबरा, पाणचक्की इत्यादी पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र शहरातील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला अद्यापही कुलूप लावलेले आहे. त्यामुळे महापालिकेला दररोज एक लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.

औरंगाबाद शहरात दरवर्षी 30 लाखांवर पर्यटक येतात. बहुतांश पर्यटक मकबरा, पानचक्की, औरंगाबाद लेण्या, दौलताबाद किल्ला पाहतात. सायंकाळी अनेक पर्यटक सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी येतात. तिकीटातून दररोज 40 हजारांचा महसूल महापालिकेला प्राप्त होतो. प्राणिसंग्रहालयात तिकीट दर जास्त असल्याने तेथूनही दररोज 50 ते 60 हजारांचा महसूल मिळतो.

तिसऱ्या लाटेमुळे सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, आता शासन आदेशानुसार सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत. मात्र, महापालिकेने सिद्धार्थ उद्यान आणि प्राणीसंग्रहालय अद्याप बंदच ठेवले आहे

“भाजपाच खरी ‘टुकडे टुकडे गँग”; शशी थरूर यांचे पंतप्रधानांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. “भाजपा हीच खरी ‘टुकडे टुकडे गँग’ आहे. त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केली आहे. भाजपा हे विभाजन करत आहे,” अशा शब्दात थरूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शशी थरूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये केवळ काँग्रेसवर टीका केली. त्यांचे हे भाषण राजकीय स्वरूपाचे होते. माझ्या मते आम्हाला आनंद झाला पाहिजे की ते आम्हाला या नजरेने पाहतात. हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केली असल्याचा आरोपही थरूर यांनी केला आहे.

काय केली होती मोदींनी टीका

काल आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकसभेत भाषण केले. यावेळी देशात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी टीका केली.