Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2915

पाटील नाम सूनके चंपा समजे क्या?? आर आर हु मै…झुकेगा नहीं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधकांना नामोहरम करत दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र युवा नेते रोहित पाटील यांनी सत्ता काबीज केली. या विजयानंतर त्यांच्यावर राज्यभरातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता रोहित पाटील यांच्यावर काही मिम्स देखील येत आहेत.

रोहित पाटील यांनी प्रतिकुल परिस्थितीत देखील विजय मिळवत राज्यभर आपली छाप पाडली. आर आर आबांप्रमाणे रोहित पाटील यांची जनतेशी असलेली नाळ पुन्हा एकदा दिसून आली. दरम्यान, रोहित पाटील यांच्यावरील एक मेम्स सध्या जोरदार चर्चेत येत आहे. पाटील नाम सूनके चंपा समजे क्या?? आर आर हु मै…झुकेगा नहीं… अशा प्रकारचे मिम्स सध्या लक्ष्य वेधून घेत आहे. यात रोहित पाटील शोले चित्रपटातील गब्बरच्या भूमिकेत दिसत आहेत.

दरम्यान, कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीत रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 10 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच एक गट असे सर्व विरोधक एकत्र असताना रोहित पाटील यांनी विरोधकांना अस्मान दाखवले. आजच्या निकालानंतर विरोधकांना माझ्या बापाची आठवण आली असेल असा टोलाही त्यांनी लगावला.

“खच्चीकरण करून राष्ट्रवादीचे बळ वाढवायची युती सेनेच्या काही नेत्यांनी केली”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल राज्याच्या 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले. या निकालानंतर शिवसेना नेते रामदास कदम याचे पुत्र योगेश कदम यांनी नाराजी व्यक्त केली. “शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि राष्ट्रवादीचे बळ वाढवायचे,” अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती असा गंभीर आरोप कदम यांनी केला.

शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी शिवसेनेवरच गंभीर आरोप केले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या काही नेत्याची छुपी नीती आता उघड झाली आहे. एकीकडे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ वाढविण्याचे काम सेनेच्या नेत्यांकडून केले जात आहे. दापोलीच्या नगरपंचायतीत शिवसेनेची पाच वर्ष असलेली सत्ता राष्ट्रवादीकडे गेली आहे.

या निवडणुकीत जे उमेदवार शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत त्या उमेदवारांपैकी सहापैकी चार राष्ट्रवादीचे लोक आहेत. ते शिवसैनिक नाहीत. म्हणजे एबी फॉर्म भरण्याच्या दोन मिनिटे अगोदर त्यांच्या गळ्यात पट्टे घालण्यात आले. हे निर्णय शिवसैनिकांनी मान्य केले नाहीत, असे कदम यांनी यावेळी म्हंटले.

नगरपंचायत निवडणुक: मराठवाड्यात काठावर फुलले ‘कमळ’ !

BJP Flag

औरंगाबाद – मराठवाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत काठावर का होईना कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. 23 पैकी सर्वाधिक 6 नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे 5, शिवसेनाकडे 4, काँग्रेस 3 तर बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका नगरपंचायत स्थानिक आघाडीने यश मिळवले. उर्वरित ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील एकूण 391 पैकी सर्वाधिक 95 भाजपचे त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे 91 नगरसेवक निवडून आले आहेत.

बीड जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे भाजपने तर लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने यश मिळवले. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींपैकी आष्टी, पाटोदा, शिरूरकासार मध्ये भाजपने एक हाती विजय मिळवत सत्ता कायम राखली, तर वडवणी आणि केज मध्ये सत्तांतर झाले आहे. वडवणी मध्ये राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांमुळे सत्तांतर झाले. तर केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने बहुमत मिळवत सत्ताधारी काँग्रेसला ‘जोर का झटका’ दिला आहे.

नांदेड जिल्ह्यात तीन पैकी अर्धापूर आणि नायगाव मध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. तर माहूर मध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानी परंतु निर्णायक अवस्थेत आहे. जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ठिकाणी यश मिळाले असून, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एका नगरपंचायती वर समाधान मानावे लागले. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन पैकी भाजपने वाशीत तर शिवसेनेने लोहार नगरपंचायतीत बहुमत मिळवले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील दोन नगरपंचायतींपैकी औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये शिवसेनेने बाजी मारली असून, सेनगावात मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सेननाव नगरपंचायत मध्ये 17 पैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी पाच उमेदवार निवडून आल्याने ही नगरपंचायत त्रिशंकू अवस्थेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव व सोयगाव नगरपंचायत मध्ये शिवसेनेने बहुमत प्राप्त केले. तर परभणी जिल्ह्यातील एकमेव पालम नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले.

लातूर जिल्ह्यातील जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि चाकूर या चार नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी आणि भाजपने प्रत्येकी 14, शिवसेना 6, प्रहार 6, आणि अपक्षांनी 5 जागांवर विजय मिळवला आहे. 4 नगरपंचायतीने पैकी देवणी नगरपंचायत भाजपच्या ताब्यातून काँग्रेसने हिसकावली, तर जळकोट वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. चाकूर नगरपंचायत त्रिशंकू असून, फक्त शिरूर आनंतपाळ नगरपंचायतीतील सत्ता राखण्यात भाजपला यश आले आहे. जिल्ह्यातील या चारही नगरपंचायतींवर भाजपची सत्ता होती.

औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट ! आज रुग्णसंख्या हजाराहून अधिक

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज आठशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 1097 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 767 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 330 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 56 हजार 703 झाली आहे. आज तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3665 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5007 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 580 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 500 तर ग्रामीणमधील 80 रुग्णांना सुटी देण्यात आली.

रस्त्यात तडफडणाऱ्या प्रेग्नंट बायकोसाठी नवऱ्याची केविलवाणी धडपड; अखेर चालत्या गाडीसमोर गेला अन्…

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही मन हेलावून टाकणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका प्रेग्नंट महिलेचा आहे. या महिलेला अचानक रस्त्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे ती रस्त्यावर तडफडत होती. सुदैवाने त्यावेळी तिचा नवरा तिच्यासोबत होता. या महिलेला मदत मिळावी म्हणून या महिलेचा नवरा केविलवाणी धडपड करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CYGqkTXqkM2/?utm_source=ig_embed&ig_rid=300afe4d-210f-4043-abbf-1529e399b6cc

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एक प्रेग्नंट महिला आणि तिचा नवरा रस्त्यावरून चालत आहेत. अचानक या महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू होतात. या प्रसूती वेदना एवढ्या जोरात आहेत कि ती उभीच राहू शकत नाही. ती तशाच अवस्थेमध्ये रस्त्यात बसते. जशा बायकोला कळा सुरू होतात, तेव्हा तिला मदत करण्यासाठी नवऱ्याची धडपड सुरू होते. यानंतर तो आपल्या खिशातील मोबाईल काढून फोन लावताना दिसत आहे. तसेच तो रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र सुरुवातीला कुणीही त्यांची मदत करण्यासाठी तयार होत नाही.

यानंतर या महिलेचा पती रस्त्याच्या मधोमध जातो आणि एका भरधाव गाडीसमोर रस्त्यावर आपले गुडघे टेकवून बसतो. हात जोडून मदतीसाठी विनवणी करतो. या व्यक्तीला अचानक समोर पाहून काळ्या रंगाची कार थांबते. त्या कारमधून एक व्यक्ती बाहेर येते. प्रेग्नंट महिलेला रस्त्यावर पाहताच ती व्यक्ती गाडीतून उतरते आणि तिच्या दिशेने धावते. यानंतर या महिलेचा नवरा आणि गाडीमधील व्यक्ती दोघंही या महिलेला उचलतात आणि कारमध्ये बसवायला नेतात. याचवेळी पलीकडच्या बाजूकडून दुचाकीवर जाणारा एक व्यक्तीही त्यांच्या मदतीसाठी धावून येते. hassbiy.ya_allah नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची कन्या आदिती पतंगे बनली ‘मिस इंडिया वॉशिंग्टन’

aditi patange

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुळची पुण्याची असलेल्या आदिती पतंगेने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021-22’ हा मानाचा किताब पटकावला आहे. या महाराष्ट्रच्या लेकीने भारताचा झेंडा साता समुद्रापार फडकवला आहे. देशासाठी ही कौतुकस्पद गोष्ट आहे.

आदिती पतंगे विषयी माहिती
आदिती ही मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात सियाटल या ठिकाणी हि स्पर्धा पार पडली होती. आदितीने मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यानंतर आदिती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली, तिथे आदितीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. यानंतर ती मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करू लागली.

https://www.instagram.com/p/CXcYDodlIej/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

आदितेने या स्पर्धेत ‘बेस्ट स्माईल’चा किताब पटकावला आहे. तिने तिच्या इन्स्टावर काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमधील तिची स्माईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आदितीला लहानपणापासून अभिनया व मॉडेलिंगची आवड होती. कोरोनाच्या काळात घरातून काम करून अदितीने अम्पॉवरींग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021-22’ स्पर्धेत भाग घेतला. यातील 22 स्पर्धकांमधून तिला पहिला क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेतील यशानंतर अदिती ऑगस्ट 2022 मध्ये नॅशनल लेव्हल ‘मिस इंडिया युएसए’ मध्ये वॉशिंग्टनची प्रतिनिधी म्हणून भाग घेणार आहे.

संतापजनक : गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील पळसवडे गावचे सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे‌ यामध्ये वन विभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना मारहाण केल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतः कर्मचाऱ्यांनी दिली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती आहे.

मला न विचारता वन मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी मारहाण केली आहे.

मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

डोंबिवलीतील ‘त्या’ महिलेचा जुन्या मैत्रिणीनेच केला खून

Dombiwali crime

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून खून केला आहे. मृत महिलेचे नाव विजया बावीस्कर आहे तर संशयित आरोपी महिलेचे नाव सीमा विजया असे आहे.

घटनेच्या दिवशी काय घडले ?
पाथरली येथे राहणाऱ्या सीमा खोपडे या ४० वर्षीय महिलेचे टिळक चौक येथे राहणाऱ्या विजया बावीस्कर यांच्याशी दुपारी बोलणे झाले. त्यावेळी सीमा यांनी मी घरी एकटीच आहे तर रात्री तुझ्याकडे झोपायला येते असे विजया यांना सांगितले. यानंतर विजया यांनी होकार दिल्यानंतर रात्री आरोपी सीमा विजया यांच्याकडे झोपायला आली होती. यानंतर सीमाने संधी साधून विजया यांच्या अंगावरचे दागिने चोरून त्यांचा खून केला.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस आयुक्त कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चुंबले, बाकले, धोंडे, मुंजाल यांनी केला आहे.

सलमान खान रोज रात्री मला फोन करतो; अभिनेत्रीचा मोठा खुलासा

akshay salman lara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अभिनेत्री लारा दत्ता ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. लारा दत्ताने तिच्या १९ वर्षाच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत सलमान खानपासून अक्षय कुमार गोविंदा यासह विविध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. अलीकडेच लारा दत्ताने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. यामुळे लारा दत्ता यांना या सर्व कलाकारांची गुपिते, त्यांच्या सवयी चांगल्या माहित आहेत.

https://www.instagram.com/p/CMASTsVD3v5/?utm_source=ig_embed&ig_rid=b28c927c-6c69-4745-82bd-898d35d2ddf0

लारा दत्ता सध्या तिच्या ‘कौन बनेगी शिखरवती’ या वेब शोमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. नुकतेच त्यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ‘कौन बनेगी शिखरवती’ हा वेब शो कशावर आधारित आहे? त्यात नवीन काय पाहायला मिळणार आहे? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांची त्याने अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. या दरम्यान लारा दत्ताला ‘तू आतापर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केले आहेस, मग त्यांच्या अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या आतापर्यंत बदललेल्या नाहीत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना लारा दत्ताने सलमान खान आणि अक्षय कुमारबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले.

https://www.instagram.com/p/CHmSUHnjmYi/?utm_source=ig_embed&ig_rid=641b805e-c2b6-47df-b424-19a9af6d5dcf

लारा दत्ताने सलमान खान बद्दल सांगितले कि, सलमान खान अजूनही मला मध्यरात्री फोन करतो. सलमानसोबत मी ‘नो एंट्री’, ‘पार्टनर’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे जेव्हा सलमान उठतो, तेव्हाच त्याचे मला फोन येतात. तसेच अक्षय कुमारबद्दल सांगताना लारा म्हणाली, ‘तो अजूनही खूप लवकर उठतो’. लारा दत्ताने अक्षय कुमार सोबत ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यानंतर आता लारा आणि अक्षय एकत्र ‘बेल बॉटम’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.

अवघ्या 2 दिवसांत सेन्सेक्स 1,000 अंकांनी का घसरला? यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण झाली आहे. BSE सेन्सेक्स 1,000 हून जास्त अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी 50 देखील याच कालावधीत 300 हून जास्त अंकांनी घसरला आहे. मध्यपूर्वेतील राजकीय तणावामुळे ऑइल मार्केटमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि आता ही भीती शेअर बाजारातील घसरणीच्या रूपात दिसून आली. इकॉनॉमिक्स टाईम्समधील एका बातमीनुसार, आयटी, एफएमसीजी आणि फायनान्सिंग सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत असताना, ऑटो आणि मेटलमध्ये खरेदी झाली आहे.

बुधवारी सेन्सेक्स 654 अंकांनी घसरून 60,098.82 वर बंद झाला. ही घट 1.08 टक्के होती. मात्र, दिवसभरात एक वेळ अशी आली की तो 920 अंकांपर्यंत घसरला. NSE निफ्टी आज 174 अंकांनी घसरला आणि तो 18 हजारांची महत्त्वाची पातळी तोडत 17,938.40 वर बंद झाला. या घसरणीत गुंतवणूकदारांचे 1.37 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

‘ही’ दोन प्रमुख कारणे आहेत
जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रिसर्च प्रमुख विनोद नायर म्हणाले की,”जागतिक स्तरावर वाढत्या महागाईच्या रूपात रिस्क सेंटिमेंट्सना फटका बसला, परिणामी सध्याचे राजकीय तणाव आणि तेलाच्या वाढत्या किमतींसह बॉण्ड यिल्ड वाढले आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला. FII च्या विक्रीमुळे देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.

ब्लूचिप शेअर्समध्ये, ओएनजीसी 3.45 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर ठरला. टाटा मोटर्स, यूपीएल, मारुती सुझुकी, कोल इंडिया, एसबीआय, हिंदाल्को इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि इंडियन ऑइल इतर वाढीसह बंद झाले.

निफ्टीमध्ये इन्फोसिस 2.90 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लुझर घसरला. श्री सिमेंट, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, एचयूएल, ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स यांचाही तोटा झाला.

ब्रॉडर मार्केट इंडेक्स संमिश्र राहिले. निफ्टी स्मॉलकॅप 0.01 टक्क्यांनी वाढला, तर निफ्टी मिडकॅप 0.06 टक्क्यांनी घसरला. निफ्टीचा ब्रॉडर इंडेक्स निफ्टी 500 देखील घसरला. तो 0.65 टक्क्यांनी घसरून बंद झाला.