Monday, December 29, 2025
Home Blog Page 2933

बाभळीच्या झाडाला भरधाव कार धडकली; दोन ठार

बीड – परळीकडुन भरधाव वेगात येणाऱ्या कारची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन आज दुपारी झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यात गाडीचा पूर्ण चक्काचुर होऊन, मृत व जखमींना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी कारने (एमएच 13 सीके 0441) भोकर येथून तेलगावमार्गे बीडला जात असताना तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबार जवळ सदर कार आली असताना चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्णर सुटल्याने गाडी रोडच्या लगत खड्ड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाले. मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला. मृत व जखमी भोकरचे असुन, नेमके कुणाचे नाव काय आहे याची ओळख पटत नाही. तरीही त्या तरूणांच्या मोबाईलवर आलेल्या फोनच्या अंदाजावरून मृतात युनुस शेख व सचिन मोकमपल्ले यांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमोल वाघमारे हा तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्या तरूणाचे पाय मोडला. गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअरबारचे मालक कांता लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले. अपघात झाल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येथ नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंगने वेल्डिंग करून, एका मृतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मृतास जेसीबीच्या साहाय्याने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले. यानंतर मृत व जखमींना 108 रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत कारमधील मृत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढत एका जखमी तरूणाचा जीव वाचवला.

घरगुती वादातून भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार

virar crime

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी भावाने जुन्या वादातून आपल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. हि घटना 13 जानेवारी रोजी माया निवास याठिकाणी घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

राजू माया असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. तो विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरातील रहिवासी आहे. आरोपी भाऊ राजू माया याचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या बहिणीसोबत वाद सुरु होता. राहत्या घराच्या भिंतीवरून त्यांच्यात मोठा वाद झाला होता. याच वादातून आरोपी राजू याने 13 जानेवारी रोजी आपली बहिणी स्मिता शहा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर वार करत त्यांना जखमी केले. हि संपूर्ण थरारक घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये आरोपी राजू माया कोयता घेऊन आपल्या बहिणीच्या घरात शिरताना दिसत आहे. हा आरोपी घरात शिरताच पुढच्याच क्षणात स्मिता यांच्या घराच्या आसपासच्या लोकांची हालचाल पाहायला मिळत आहे. आरोपी राजू हल्ला करून बाहेर आल्यानंतर एक महिला जखमी स्मिता शहा यांना कपड्यात गुंडाळून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. जखमी स्मिता शहा यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच विरार पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी राजू माया याला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

परभणीतील बाभळगाव मध्ये बँक फोडून धाडसी चोरी ;1 लाख 78 हजार रुपयांची नगद लंपास

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणार्‍या बाभळगाव फाटा येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका शाखेत चोरट्यांनी 16 जानेवारी रोजी पहाटे धाडसी चोरी केली असून यावेळी बँकेतून तब्बल 1 लाख 78 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. पाथरी तालुक्यातील बाभळगाव फाटा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत चोरी झाल्याचा प्रकार 16 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी सायंकाळी उशिरा बँकेचे व्यवस्थापक सुरेश मगर यांनी पाथरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी मध्ये बँकेच्या तिजोरीमध्ये शनिवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बँकेचे कामकाज संपल्यानंतर ठेवलेले 1 लाख 78 हजार 462 रुपये चोरी केल्याचे म्हटले आहे .फिर्यादी मध्ये म्हटले आहे की 15 जानेवारी रोजी बँकेचे शिपाई प्रवीण गायकवाड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाथरी शाखेतून 5 लाख रुपये नगद दिवसभराच्या कामकाजासाठी बँकेत आणून जमा केले होते.

त्यानंतर उर्वरित एक लाख 78 हजार 462 रुपये सायंकाळी जमा करून बँक बंद करत घरी गेलो. यानंतर 16 जानेवारी रोजी सकाळी शिपाई प्रवीण गायकवाड हे साफसफाई करण्यासाठी बँकेकडे गेले असता त्यांना बँकेचे शटर उघडे असल्याचे दिसले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे लक्षात आले. दरम्यान संध्याकाळी 3 ते 5 च्या सुमारास अज्ञात चोरटे चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. पाथरी पोलीसांचे पथक व परभणीहून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ठस्से तज्ञांचे पथक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक दिनाचा उत्सव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

भाजप नेते माधव भांडारी यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे. मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.

 

भाजप सरकारने यापूर्वीहीअनेक तारखांना महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे.

‘या’ जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल

sangli

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली या ठिकाणी आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्यांना बहिष्कृत करण्यात आले. या प्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध सांगलीच्या पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले. इस्लामपूर येथील प्रकाश भोसले यांनी या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात समाजातील पंचाविरुद्ध तक्रार दाखल केली. विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार, शामराव देशमुख, अशोक भोसले, किसन इंगवले आणि विलास मोकाशी अशी तक्रार दाखल झालेल्या पंचाची नावे आहेत. हे सगळे नंदीवाले समाजाचे पंच आहेत.

30 दाम्पत्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव
राज्यातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले. या बहिष्कृत केलेल्यांना समाजातील सुख-दु:खाच्या प्रसंगी बोलावले जात नाही. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला जात नाही. यामुळे 150 दाम्पत्यांपैकी 30 दाम्पत्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेशी संपर्क साधून बहिष्कार उठविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.

बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय
या 30 दाम्पत्यांच्या तक्रारीवरून अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या लोकांनी काही पंचांशी संपर्क साधून हा प्रकार बेकायदा असल्याचे सांगितले. त्यावेळी पंचानी हा बहिष्कार मागे घेत असल्याचे कबुल केले. मात्र त्यानंतर पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे 9 जानेवारी रोजी झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पीडित प्रकाश भोसले यांनी त्त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

अभिनेता किरण माने ग्रेटच : “मुलगी झाली हो” महिला कलाकारांमध्ये दोन मतप्रवाह

Kiran Mane

सातारा | मुलगी झाली हो या स्टार प्रवाह मालिकेतून अभिनेता किरण माने यांना काढल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह समोर येवू लागले आहेत. किरण माने यांच्याकडून राजकीय पोस्ट केल्याने मालिकेतून काढल्याचे सांगण्यात येत होते. तर आज सकाळी महिलाच्या सोबत वर्तणूक चांगली नसल्याचे महिला कलाकारांनी सांगितले होते. मात्र सायंकाळी याच मालिकेतील काही महिला कलाकारांनी किरण माने यांची वागणूक कधीच गैर नसल्याचे म्हटले आहे.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले. मात्र त्यांनी त्याचा त्यांनी राजकीय स्टंट म्हणून उपयोग करत पोस्ट व्हायरल केल्या आहेत. राजकीय पोस्ट करून दबाव निर्माण करण्याचा किरण माने प्रयत्न करत आहेत. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यात गूळुंब या गावात शूटिंग सुरळीत चालू असून शूटिंग बंद करण्यात आल्याच्या निव्वळ अफवा असल्याचे कलाकार सांगत आहेत. किरण माने यांनी ग्रामपंचायतीचे लेटर घेऊन चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं असल्याचे लाईन प्रोड्युसर सचिन ससाणे यांनी सांगितलं होत. तर महिला कलाकार सविता मालपेकर, श्रावणी पिल्लई यांनीही किरण माने यांच्यावर महिलाच्यासोबत चुकीचे वर्तन करत असल्याचा आरोप केला होता.

किरण माने यांच्या या प्रकरणात महिला कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यामध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. तीन महिला कलाकारांनी सकाळी किरण माने याचे वर्तन चुकीचे असल्याचे म्हटले होते. तर आता जवळपास 5 ते 6 महिलांनी किरण माने यांची वर्तन कधीच चुकीची किंवा आक्षेपार्ह नव्हती. तसेच किरण माने हे यांच्याबाबत जे काही चालले आहे, ते चुकीचेही असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता सकाळी महिलाच्यामुळे किरण माने अडचणीत येतील असे वाटत होते, मात्र सायंकाळी दुसऱ्या प्रतिक्रिया समोर आल्याने किरण माने यांच्यावर अन्याय झाला आहे असेही वाटू लागले आहे.

सातारा तालुक्यात शिकारीसाठी लावलेल्या फास्यात अडकला “तरस”

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा तालुक्यातील मालगाव येथे वन्यप्राणी तरस शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फास्यामध्ये अडकला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरस प्राण्यास सोडवले. तसेच तरसास वन्यप्राणी अधिवासात सोडले आहे.

मालगाव येथे काल सकाळी 11.30 वाजता वनविभागाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर वनरक्षक सातारा सुहास भोसले, डाॅ. चव्हाण यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी सातारासह पुण्याची रेस्क्यू टीमही तरस प्राण्यास फास्यातून सोडविण्यासाठी मालगाव येथे दाखल झाली होती. या मोहिमेत उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी सातारा व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

वन्यप्राण्यास पकडण्यासाठी कोणी फासे टाकत असेल किंवा इतर यंत्र, हत्याराचा वापर शिकारीसाठी केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गंभीर गुन्हा आहे. तेव्हा अशा प्रकारचे कृत्य कोणी करू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही – एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. यानंतर अमरावती येथील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत कुठलाही प्रकार हा खपवून घेतला जाणार नाही, असे मंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथील घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावती येथे काल एक घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत कुठलाही असा प्रकार केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. कालच्या प्रकरणाची संपूर्णपणे हि शहानिशा हि केली जाईल. पूर्ण चौकशी केल्यानंतर गृहविभाग कारवाई करेल.

नेमके काय घडले प्रकरण?
अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. त्यानंतर आज अमरावती येथे राणा दांपत्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच निषेध नोंदवत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली.

महाराष्ट्रात औरंगजेबची सत्ता आहे का?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीत राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा आज पहाटे हटवण्यात आला. या घटनेवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेत्या, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला ! कॉंग्रेसने कर्नाटकात विटंबना केली तेंव्हा भाजप कार्यालयावर मोर्चा काढणारी शिवसेना आता शांत का? महाराष्ट्रात औरंगजेबची सत्ता आहे का? असा सवाल भाजपने केला आहे.

अमरावती य याठिकाणी आज घडलेल्या घटनेनंतर भाजपने ट्विट करीत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “महाराष्ट्रात औरंगजेबची सत्ता आहे का? काँग्रेस नेत्या, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात अमरावती शहरात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला ! ज्यावेळी कॉंग्रेसने कर्नाटकात विटंबना केली तेंव्हा भाजप कार्यालयावर मोर्चा काढणारी शिवसेना आता शांत का आहे.? असा सवाल भाजपने विचारला आहे.

 

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर

दरम्यान नवनीत राणा यांनीही अमरावती येथून या घटनेबाबत मत व्यक्त केले. ज्या महाराष्ट्राला घडवून आणण्याचे काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. त्या महाराष्ट्रात जेव्हा शिवसेनेची सत्ता येते. जी शिवसेना हि भिकारी सारखे मतदारांपुढे जाऊन आमदार, खासदार याच्या निवडीसाठी भीक मागत आहेत. त्या महाराष्ट्रात शिवसेनेची छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी आम्हाला वारंवार परवानगी मागावी लागत आहे. आम्हाला परवानगी घ्यायची गरज काय? उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना आदरणीय बाळासाहेब ठाकरे याच्या विचारांचा विसर पडलेला आहे, असे वाटते, असे नवनीत राणा यांनी म्हंटले.

कामथी येथे किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण, दोघांवर गुन्हा

crime

कराड | कामथी ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पूनम विनोद सूर्यवंशी व विनोद मारूती सूर्यवंशी रा. कामथी ता. कराड असे याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कामथी ता. कराड गावच्या हद्दीत विनोद सूर्यवंशी याच्या घरासमोरील रस्त्यावरून फिर्यादी संगिता व तिचे पती आनंदा पवार गाडीवरून रानात निघाले होते. याच वाटेवर पूनम सूर्यवंशी भांडी घासत बसल्या होत्या. यावेळी भांडी बाजूला घे आम्हाला जावू देत, असे म्हणाल्याच्या कारणावरून पूनम सूर्यवंशी हिने संगिता पवार हिला शिवीगाळ केली. तसेच विनोद सूर्यवंशी याने चिडून शिवीगाळ करत बाजूला पडलेल्या दगड संगिता पवार यांच्या डोक्यात घालून जखमी केले.

याबाबत संगिता पवार यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार लावंड करीत आहेत.