Monday, December 29, 2025
Home Blog Page 2936

72 जणींचा बाॅयफ्रेंड अन् 9 जणींचा नवरा; बोगस डाॅक्टरचे कारनामे एकुन हादरुन जाल..

वसई : एका बोगस डाॅक्टरने खोटं बोलून अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण डाॅक्टर असल्याचं सांगून वसई येथील एकाने तब्बल 72 जणींना प्रेमात खेचलंय तर 9 जणींसोबत विवाह केला असल्याचं बोललं जात आहे. तसेच या बोगस डाॅक्टरने अनेक चुकिच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करुन कित्तेकांना कायमचंच बेडवर बसवलं आहे.

अस्थीरोग तज्ज्ञ म्हणजेच ऑर्थोपेडिक असल्याचं भासवून खोट्या शस्त्रक्रिया करणाऱ्या 51 वर्षीय भामट्याला वसई पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपी हेमंत पाटील उर्फ ​​हेमंत सोनवणे आणि वसई-विरारचे माजी नागरी वैद्यकीय प्रमुख सुनील वाडकर यांनी एकत्र मिळून अनेक बनावट शस्त्रक्रिया केल्याचा आरोप होत आहे. वाडकरांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे हेमंत सोनवणे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मसाले विकायचा. ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचे खोटे सांगणाऱ्या हेमंत सोनवणेने अनेक महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवले होते. त्याने आपण अनाथ असल्याचाही दावा केला होता. ​​

काय आहे प्रकरण?

हेमंत सोनवणे याने सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिलांना टार्गेट केले होते. मिड-डे वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. “हेमंत सोनवणेला पॉर्नचे व्यसन आहे. त्याला मनोरुग्णालयात पाठवले पाहिजे” असं सोनवणेच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याचं मिड-डेच्या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. सोनवणे त्याच्या पहिल्या पत्नीला कटनी येथे भेटला होता. त्यांना 18 वर्षांचा एक मुलगाही आहे. या जोडप्याच्या घटस्फोटानंतर तो त्याच्या आईसोबत राहतो. सोनवणेची पहिली पत्नी सरकारी कार्यालयात इंजिनियर म्हणून कार्यरत होती.

सोनवणेचे त्याच्या हॉस्पिटलमधील परिचारिकांसह जवळपास 72 हून अधिक महिलांशी अनैतिक संबंध होते, तर काही जणींसोबत तो लिव्ह-इन रिलेशनशीपमध्येही राहत होता. काही जणींशी त्याने लग्नही केले, असा आरोप केला जात आहे. सोनवणेच्या मोबाईलमधील काँटॅक्ट्सपैकी 90 टक्क्यांहून अधिक क्रमांक महिलांचे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कोण आहे हेमंत सोनवणे?

हेमंत सोनवणे हा मूळचा जळगावचा रहिवासी आहे. त्याचे वडील मुरलीधर सोनवणे रेल्वे मेल सेवेत (RMS) काम करत होते, त्यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. तर त्याची आई मालती गृहिणी होती. त्या मार्च 2018 मध्ये कालवश झाल्या. त्याची मोठी बहीण मंदा चौहान या प्राथमिक शाळेत शिक्षिका असून चाळीसगाव येथे राहतात. त्याचा धाकटा भाऊ हितेंद्र सोनवणे याने अभियांत्रिकी पदविका पूर्ण केली असून तो डोंबिवलीत राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तो नेहमी म्हणायचा की तो अनाथ आहे आणि त्याला सांभाळायला कोणी नाही. पण खरं तर, जेव्हा तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याचे आई-वडील जिवंत होते, असं एका पीडित महिलेने सांगितलं.

डेंटिस्ट महिलेशी विवाह

2014 मध्ये सोनवणेशी लग्न करणाऱ्या एका डेंटिस्ट महिलेने सांगितलं की “त्याच्याशी एका मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे माझी भेट झाली. तो ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचे भासवत असे. एकदा तो माझ्या भावाला मुलुंडच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे तो सल्लागार होता” लग्नानंतर एका आठवड्यातच तिला कळले की त्याची शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय पदवी बनावट आहेत. तिने अमरावती येथे पोलिसात फिर्याद दिली.

“सप्टेंबर 2015 मध्ये, त्याला अटक करण्यात आली आणि सुमारे नऊ महिने त्याला तुरुंगात टाकण्यात आले,” असेही डेंटिस्ट महिलेने सांगितले. काही दिवसातच तिने सोनवणेला घटस्फोट दिला. सोनवणेने मुंबईत अनेक शस्त्रक्रिया केल्या, त्या सर्व शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या, असाही दावा तिने केला.

कर्नाटकातील प्राध्यापिकेशीही लगीनगाठ

हेमंत सोनवणेने कर्नाटकातील हुबळी येथील गणिताच्या प्राध्यापक महिलेशी लग्न केले. “माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी आहे. मी ऑगस्ट 2016 मध्ये माझे वडील गमावले, आणि मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पेलू शकणार्‍या एका जबाबदार व्यक्तीच्या शोधात होते, कारण माझी भावंडे अजूनही शिकत होती” असं तिने सांगितलं. सोनवणेने तिला आवश्यक असलेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आणि ते हुबळीला गेले.

“त्याने मला सांगितले होते की तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो, पण नंतर तो मला हॉटेलची बिलं भरायला लावायचा. नंतर त्याने माझे दागिने विकले. हळूहळू, माझ्या कुटुंबाला संशय आला आणि मी त्याला सोडले. मी आता भावनिकदृष्ट्या खचले आहे.” असं प्राध्यापक महिलेने सांगितल्याचं मिड-डेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सोनवणेने हुबळी येथे ऑर्थोपेडिक क्लिनिक उघडले आणि बैलहोंगल, बेळगाव, मुंडगोड आणि नवलगुंड येथील अनेक हॉस्पिटलमध्ये काम केले. त्याने हुबळी-धारवाड महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातही काम केले आहे, असं तिने सांगितलं.

शस्त्रक्रिया चुकल्याने रुग्णांची तक्रार

चुकलेल्या शस्त्रक्रियांनंतर नीट उभेही राहू न शकणाऱ्या 59 वर्षीय रुग्णाने हेमंत सोनवणे याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 12 जानेवारी रोजी तिने केलेल्या तक्रारीच्या आधारे सोनवणेच्या विरुद्ध आयपीसीच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत असे नऊ जणांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत, असे वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.

जिल्ह्यात किशोरवयीन मुलांचे केवळ 15 टक्केच लसीकरण

औरंगाबाद – जिल्ह्यात तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण सुरु होवून 12 दिवस होवून गेल्यानंतर केवळ 15 टक्के मुलांचे लसीकरण झाले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 64 हजार 521 मुलांपैकी केवळ 40 हजार 184 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. अद्याप दोन लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील सुमारे 2 लाख 64 हजार 521 बालके असून मिळालेल्या आकडेवारीनुसार केवळ 40 हजार 184 बालकांचे लसीकरण झाले आहे. अद्याप 2 लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. या बालकांचे दोन्ही मात्रांचे लसीकरण फेब्रुवारीपर्यत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परंतु त्या तुलनेत लसीकरणाने अजूनही वेग घेतलेला दिसत नाही. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत सर्व किशोरवयीन मुलामुलींचे लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. दहावी- बारावी परीक्षेच्या अनुषंगाने मंडळाने तातडीने विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु काही शाळा आणि महाविद्यालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे आव्हान कायम आहे.

जिल्ह्यातील इयत्तानिहाय विद्यार्थी –
नववी – 76,272
दहावी – 74,314
अकरावी – 57,155
बारावी – 56,770

तालुकानिहाय लसीकरण –
औरंगाबाद – 5208
गंगापूर – 1560
कन्नड – 8250
खुलताबाद – 0
पैठण – 6072
फुलंब्री – 3357
सिल्लोड – 3001
सोयगाव – 893
युआरसी-1 – 4986
युआरसी-2 – 4158

सलग तिसऱ्या दिवशी कोरोनारुग्ण 500 च्या पार

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसाडेपाचशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 540 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 423 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 117 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 53 हजार 649 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3662 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 147 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 119 तर ग्रामीणमधील 28 रुग्णांना सुटी देण्यात आली.

क्रिकेट विश्वात खळबळ ! विराट कोहलीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे अख्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच्या या निर्णयामुळे त्याने वनडेचे कर्णधारपद गमावले. किमान कसोटी संघाच्या नेतृत्वपदी तरी आणखी काही वेळ तो संघाची धूरा सांभाळेल, असे वाटत होते. पण अखेर त्याने अचानकपणे कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामधील वाद सुरु होता. टी20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा वाद सुरु झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58.82 टक्के सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्तावात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे.

दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागले होतं. या पराभवामुळे विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडलण्यानंतर विराट कोहलीकडे धुरा सोपवण्यात आली होती. विराट कोहलीने भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विदेशात विजय मिळवले आहे. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक विजय संपादन केले आहेत.

पोटच्या मुलीसोबत नराधम बापाचे ‘हे’ दुष्कृत्य, आरोपीस मिळाली ‘ही’ शिक्षा

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी हा उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील रहिवाशी आहे. तो पुण्यातील पुण्यातील एका बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याच्या बायकोचे निधन झाल्यानंतर तो आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात राहण्यासाठी आला होता. या आरोपी नराधमाने तीन वर्षांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात राहण्यासाठी आला होता. बापाकडून वारंवार होणारे अत्याचार सहन न झाल्याने तिने अखेर पोलीस ठाण्यात गेली.

यानंतर रडत असलेल्या मुलीला पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या महिलेला बोलावून धीर दिला व तिच्याकडून माहिती घेतली. वडील माझ्यावर वारंवार बलात्कार करीत असल्याचे आणि याबाबत कोणाला माहिती दिली तर भावाला मारून टाकीन, अशी धमकी देत असल्याचे तिने यावेळी सांगितले. तसेच त्यांनी भावासमोर सुद्धा हे कृत्य केल्याचे मुलीने यावेळी सांगितले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर आरोपीवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी, मुलगी, डॉक्टर आणि तपासी अंमलदार यांची साक्ष घेण्यात आली. डॉक्टरांच्या साक्षीवरून मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. यानंतर सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे जर आरोपीला कमी शिक्षा दिली तर समाजात चुकीचा संदेश जाईल म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी या गुन्ह्याचा अधिक तपास केला आहे.

शिवसैनिकांत राडा ! बैठकीत आमदारालाच खुर्ची फेकून मारली

shivsena

औरंगाबाद – वैजापूर शहरातील वसंत क्लबमध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या ऑनलाईन बैठकीत तक्रार केल्यावरून वैजापुरातील शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. प्रकरण एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत गेले. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम यांनी थेट आमदार रमेश बोरनारे यांच्यावर खुर्ची फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बुधवारी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. वैजापुरातील वसंत क्लबमध्ये येत पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. बैठकीत विषयाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय निकम यांनी पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या. पदाधिकारी हे कार्यकर्त्यांना बैठकीला बोलावत नाहीत, विश्वासात घेत नाहीत; तालुक्यात पक्षाची परिस्थितीत बिकट झाली आहे. कोणाचाही वचक राहिलेला नाही. अंतर्गत हेवेदावे वाढले असल्याने तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. अशा प्रकारची तक्रार निकम यांनी दानवे यांच्याकडे ऑनलाईन बैठकीत केली. त्यानंतर काही क्षणांतच वादाला सुरुवात झाली.

शिवसेनेतील दोन गटांतील कार्यकर्त्यांची खदखद या निमित्ताने बाहेर पडली. हा वाद इतका विकोपाला गेला की, निकम यांनी शिवीगाळ करून आमदार रमेश बोरनारे यांच्यावर खुर्ची फेकून मारली. त्यामुळे दोन गटांतील पदाधिकारी हाणामारीला उतरले होते, तेव्हा उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. निकम यांनी यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांनाही चांगले फैलावर घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी देशात 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप डे’ (Natiopnal Start-Up Day) म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी आज स्टार्टअप उद्योजकांशी (Start up Businessman’s) संवाद साधला यावेळी त्यांनी ही घोषणा केली. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे मोदी म्हणाले

या दशकाला भारताचे टेचाडे Techade(तंत्रज्ञानाचे दशक) म्हटले जात आहे. या दशकात, सरकार नाविन्य, उद्योजकता आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. सरकारी प्रक्रियेच्या जाळ्यातून उद्योजकता, नवोपक्रम मुक्त करण्याचे आवाहन मोदींनी केले. नवोपक्रमाला चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करावी लागेल, असे ते म्हणाले.

ज्या स्पीड आणि स्केलने भारत आज युवा स्टार्ट अप तयार करत आहे, त्यातून वैश्विक महामारीतही भारताची प्रबळ इच्छाशक्ती आणि संकल्प अधोरेखित होत आहे. गेल्या काही वर्षात देशात 42 युनिकॉर्न तयार करण्यात आले आहेत. हजारो कोट्यवधींच्या या कंपन्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. ही आत्मविश्वासी भारताची ओळख आहे. असे मोदी यांनी म्हंटल

पाटण शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : तीन महिन्यापूर्वीचा आदेश, तीन तासात अंमलबजावणी करण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना

कराड | शासनाच्या शिक्षण विभागाने तीन महिन्यापूर्वी दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी करण्यासाठी पाटण तालुक्यातील शिक्षण विभाग तीन तास अगोदर जागा झाला आहे. शिक्षण विभागाच्या निष्कळजीपणामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या नुकसानीस बेजबाबदार असणाऱ्या आणि पालकांना त्रास देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांच्यातून होत आहे.

पाटण तालुका शिक्षण विभागाला तीन महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज देण्यासाठी शिक्षण विभागाला कळविण्यात आले होते. परंतु पाटण तालुक्यातील शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. आज शनिवारी दि. 15 रोजी सकाळी पालकांना शिष्यवृत्ती अर्ज आज दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करण्यासाठी शिक्षकांचे फोन आले. त्यानंतर पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच अर्ज न देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचेही पालकांना शिक्षकांनी सांगितले.

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे. उत्पान्नाचा दाखला हा तलाठी याच्याकडून घेवून तो तहसिलदार कार्यालयातून घ्यावा लागतो. त्यासाठी बराच कालावधी जातो. अशावेळी शिक्षण विभागाच्या या निष्ककाळजीपणचा फटाका विद्यार्थ्यांना बसणार आहे. ऐवढेच नाही तर पाटण तालुका हा डोंगर दऱ्यात वसलेला आहे. तेव्हा पाटण तालुक्यातील या बेजबाबदार शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांच्यातून केली जात आहे.

वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं अन् …

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विद्युत खांबावर चढलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंकज दरबारसिंग गिरासे असे जीव गमावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे वायर जोडण्यासाठी तो विद्युत पोलवर चढला होता. नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारामध्ये हि घटना घडली आहे. सबस्टेशनवरुन अचानक वीज पुरवठा सुरु केल्याने पंकज दरबारसिंग गिरासे यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. यानंतर महावितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे पंकजसिंग गिरासे या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीदेखील गावकऱ्यांनी केली.

काय आहे प्रकरण?
नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारात तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मुत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. अमळथे शिवारात विद्युत रोहित्र जळाल्यामुळे ते जोडण्याचे काम सुरु होते. यादरम्यान अमळथे येथील पंकज दरबारसिंग गिरासे या व्यक्तीला महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलवर चढवून वायर जोडण्यास सांगितले. या कामासाठी कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र अचानक कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा सुरु केल्याने पंकजसिंग गिरासे यांचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला.

ग्रामस्थांचा सब स्टेशनला घेराव
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पंकजसिंग गिरासे यांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप गावकऱ्यांनी केला. या घटनेनंतर सुमारे चार तासांपर्यंत कुठलाही महावितरणचा अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता. यानंतर ग्रामस्थांनी संतापून कोपार्ली येथील सब स्टेशनला घेराव घालून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ त्या ठिकाणी थांबून होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात बोलावण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

भाजपने योगींना आधीच घरी पाठवलं, त्यांनी आता तिकडेच राहावं

Yogi Akhilesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपले होम पीच असलेल्या गोरखपूर मतदारसंघातुन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले आहे. भाजपच्या या निर्णयांनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगिना टोला लगावला आहे

भाजपने योगींना आधीच घरी पाठवलं; त्यांनी आता तिकडेच राहावे. परत माघारी येऊ नये, असा टोलाअखिलेश यांनी लगावला. योगींनी उत्तर प्रदेश सोडा पण गोरखपूरमध्येही काहीच काम केलेले नाही. त्यामुळे गोरखपूरमधील सर्व जागाही समाजवादी पक्षच जिंकणार, असा विश्वास अखिलेश यांनी व्यक्त केला. राज्यातील ८० टक्के जनता समाजवादी पक्षासोबत आहे. त्यामुळे यावेळी सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचेही अखिलेश म्हणाले.

दरम्यान, योगी आदित्यनाथ याना गोरखपूर मतदारसंघात उमेदवारी देऊन भाजपने सेफ गेम खेळला आहे. गोरखपूर मतदारसंघ हा मुख्यमंत्री योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.