Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2954

वित्तीय तूट म्हणजे काय? त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध आहे ते समजून घ्या

Share Market

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2022 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशातील जनतेला अनेक सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला जातो. ज्यामध्ये जनतेच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. अर्थसंकल्प सादरीकरणाचा दिवस हा वर्षातील तो दिवस असतो जेव्हा लोकं वित्तीय तूट, निर्गुंतवणूक, भांडवली नफा कर, पुनर्भांडवलीकरण यासारखे शब्द ऐकतात. यातील वित्तीय तूट (Fiscal Deficit) हा असा शब्द आहे जो अर्थसंकल्प सादर करताना तुम्ही अनेकदा ऐकला असेल.

आज आपण वित्तीय तुटीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वित्तीय तूट म्हणजे सरकारचे एकूण उत्पन्न आणि खर्च यातील तफावत म्हणा किंवा खर्च भागवण्यासाठी सरकार किती पैसे कर्ज घेणार ती रक्कम म्हणजे वित्तीय तूट.

त्याबद्दल जाणून घ्या
वित्तीय तूट देशाच्या आर्थिक स्थितीचे खरे चित्र दाखवते. तज्ज्ञांच्या मते भारत पुढील आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट जीडीपीच्या 6.3 टक्के ते 6.5 टक्के ठेवू शकतो. भारतात कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. Omicron या नवीन व्हेरिएन्टमुळे ग्राहक आणि व्यावसायिक खर्चावर परिणाम होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता पुढील आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 30 ते 50 बेसिस पॉइंट्सने कमी करण्याची योजना आहे.

काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, वित्तीय तूट लक्ष्य गाठण्यापेक्षा सार्वजनिक खर्च जास्त महत्त्वाचा आहे. जास्त खर्च झाल्यामुळे वस्तूंची मागणी वाढते. यामुळे देशातील व्यवसायाला प्रोत्साहन मिळते, जे अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली दिसते तेव्हा वाढणारा व्यवसाय जास्त महत्त्वाचा बनतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2022 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

राज्य सरकारने विधिमंडळात शक्ती कायदा अर्धाच मांडला – भाजपा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढतच आहेत. महिलांचे संरक्षण करणारा शक्ती कायदाही राज्य सरकारकडून अर्धाच मांडण्यात आल्याची टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केली. पुढील अधिवेशनात हा कायदा पूर्ण करण्याची मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने केली जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर भाजपने महिलांचे बुथ सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्याची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यातही करण्यात येणार आहे. टिळक स्मारक मंदिरात सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष खापरे यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीला पश्र्चिम महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या प्रभारी सुवर्णाताई पाटील, राज्य सरचिटणीस अश्र्विनीताई जिचकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका स्वाती शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. उषाताई दशवंत, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका भारती दिगडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रदेशाध्यक्षा खापरे म्हणाल्या, राज्यात महावकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. परंतु दोन वर्षात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. शेतकरी, तरुणांचे प्रश्र्न सुटताना दिसत नाहीत.

महिलांवर अन्याय होवूनही त्यांच्या अहवालामध्ये ही गफलत केली जात आहे. अनेक घटना दडपण्याचा प्रयत्न सरकार पोलीस आणि सरकारी रुग्णालयांच्या माध्यमातून करीत आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या परंतू प्रत्यक्षात सुरक्षा मिळलेली नाही. महिला सुरक्षेबाबत राज्य सरकार अपयशी ठरले. महिलांना सुरक्षा देणारा शक्ती कायदा करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने कायदा लागू केला आहे. मात्र तोही अर्धाच मांडण्यात आल्याचे दुर्दैव आहे. महिलांच्या प्रश्र्नावर पक्षीय राजकारण तरी बाजूला ठेवले पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी राहिल. पुढील अधिवेशनात तरी राज्यसरकारने शक्ती कायदा पूर्ण मांडवा अन्यथा राज्यभर भाजप महिला मोर्चा आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही जिल्ह्यात शाळा सुरूच

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकममंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणास पालकांचा विरोध होत आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची संमती घेऊन शाळेत अद्यापन सुरू ठेवण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती आशा पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाला शिक्षण सभापतींकडून वाटयाण्याच्या अक्षता दिल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

गेल्या दोन वर्षापासून सुरु असणार्‍या कोरोनाच्या संकटाने मुलांचे शैक्षणिक मोठे नुकसान झाले आहे. चार महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षण बंद होऊन ऑफलाईन अध्यापन सुरु झाले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणास पालकांनी विरोध केला आहे. ग्रामीण भागात बहुसंख्य गावात मंगळवारीही शाळा सुरु होत्या. सभापती पाटील म्हणाल्या, ऑनलाईन शिक्षणास पालक तयार नाहीत. आक्रमणे तशी प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पूर्ण शाळा बंदला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती असणार आहे.

काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी आहे तिथे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची संमती घेऊन शाळेत शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. शाळेत मुलांना टप्प्याटप्प्याने बोलवण्यात येणार आहे. तसेच ज्या गावात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढेल तिथे ऑफलाईन शिक्षण बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात येतील. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट वाढत चालली असताना शिक्षण सभापतींनी शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला त्यांच्याकडून वाट्याण्याच्या अक्षता देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

वजनातील काटामारी तसेच ऊस तोडीसाठी पैशांच्या मागणीसाठी ‘या’ कारखान्यावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील केंपवाड येथील कारखान्यावर वजनातील काटामारी व तोडीस पैसे घेणे व कारखान्याच्या राखेमुळे द्राक्ष बाग व अन्य पिकांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून अनेक कारखान्याचे तोडकऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत.

याच लुबाडणुकीमुळे अथणी तालुक्यतील केंपवाड येथे सोमवारी स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व शेतकऱ्यांनी धडक दिली. येथील कारखान्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या असल्याने याचा जाब येथील अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. कारखान्याच्या वजनात मोठ्या प्रमाणात काटामारी सुरू असून, ऊस तोडीसाठी ही पाच ते दहा हजारांची मागणी केली जात आहे यासाठी मोर्चाचे आयोजन होते पण कोरोनाचा हवाला देत कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र हद्दीतच आंदोलकांना रोखले.

यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी बंडू जगताप राजू माने यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची भेट घेऊन पैसे मागणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच कारखान्याची बहुतांशी राख शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान पोहचवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर याचीही पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. मात्र या मागण्या मान्य न झाल्यासा श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकला आज 313 वर्षे पूर्ण : किल्ले अजिंक्यताऱ्यावर स्वाभिमान दिवस

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा येथे ‘स्वाभिमान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. आज 12 जानेवारी रोजी त्यांचा 313 वा राज्याभिषेक दिन आणि 13 वा सातारा स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर राज सन्मानात हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींनी पहिल्यांदा आकर्षक पालखीची फुलांनी सजावट करून आली होती.

सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे. सण 1708 रोजी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेतून सुटल्यानंतर शाहू महाराजांनी वसवलेली सातारा हे भारतातील एकमेव शहर आहे. हे शहर वसवल्यानंतर शाहू महाराज यांचा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मदिनी मंचकारोहन तथा राज्याभिषेक झाला. शाहू महाराज छत्रपती झाले आणि सातारा राजधानी झाली. हिंदुस्तानच्या इतिहासात हिंदवी स्वराज्याचा सर्वाधिक राज्य विस्तार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यात छत्रपती शाहू महाराजांना यश आले.

छत्रपती शाहू राज्याभिषेक हा महाराष्ट्र आणि हिंदुस्तानासाठी अभिमानाचा तसेच साताऱ्याच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. हाच सातारा स्वाभिमान दिवस म्हणून आज 12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर साजरा करण्यात आला. यंदाचे हे 13 वे वर्ष आहे. त्यामुळे सातारकर आणि इतिहासप्रेमी यांच्यामध्ये या दिवसाबद्दल अभिमानाची भावना आहे. यावेळी पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेऊन मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने किल्ले अजिंक्यतारा दुमदुमून गेला होता.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दहा एक्कर मधील ऊस जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

बहे येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे फारणेवाडीच्या शेतकऱ्यांचा दहा एकर ऊस जळाला. आडसाली ऊसाचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी- दुपारी 1 च्या दरम्यान बहे येथील जाधव मळी भागात शॉर्टसर्किटमुळे स्पार्फकिंगने आग निर्माण झाली. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले.

या आगीत पाच शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. संचित शिवाजी जाधव,श्रीकांत किरण जाधव,प्रकाश धोंडीराम जाधव,अरुण जनार्दन जाधव,आनंदा पांडुरंग मुळीक अशी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.घटनास्थळी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

सतत येणारा महापूर व त्यानंतर हे आगीचे संकट यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी व ऊसाचे त्वरित गाळप व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांडून होते आहे.

आता छोट्या व्यावसायिकांना फक्त 30 मिनिटांत मिळणार 50 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळणार आहे. फेडरल बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) ऑनलाइन कर्ज सुविधा देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.

फेडरल बँकेने दावा केला आहे की, federalinstaloans.com वर छोट्या व्यावसायिकांना 30 मिनिटांत 50 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. बँकेचे म्हणणे आहे की, त्यांचे प्लॅटफॉर्म अल्गोरिदम वापरून कर्ज घेण्यासाठी व्यावसायिकाने अपलोड केलेली कागदपत्रे पटकन कॅप्चर करते. यामुळे वेळेची बचत तर होतेच त्याबरोबरच कर्ज देण्यासाठी वेळ देखी; कमी लागतो.

ऑनलाइन अर्जात कमी एंट्री
कर्जासाठी अर्ज करण्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही, असे फेडरल बँकेचे म्हणणे आहे. तो कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. अर्जदाराने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ITR, बँक अकाउंट स्टेटमेंट आणि GST डिटेल्स अपलोड करणे आवश्यक आहे. कर्जासाठीच्या अर्जातही फारच कमी माहिती द्यावी लागेल. याचे कारण असे की, अपलोड केलेल्या कागदपत्रांमधून बहुतेक डिटेल्स ऑटोमॅटिकपणे भरले जातील जसे की GST, ITR आणि बँक खाते डिटेल्स. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. कर्जदाराला कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागेल.

फेडरल बँकेची उपकंपनी IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे
फेडरल बँकेच्या बोर्डाने तिच्या उपकंपनी Fedbank Financial Services (FedFina) च्या IPO प्रक्रियेस मान्यता दिली आहे. Fedfina ही रिटेल नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. IPO चा साईज, विक्रीच्या ऑफरचा भाग, किंमत आणि Fedfina ने प्रस्तावित केलेल्या IPO संदर्भात इतर डिटेल्स योग्य वेळी निश्चित केले जातील.

Cryptocurrency Prices: बिटकॉइनची वाढ थांबली तर इथेरियम 4 टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली । बुधवार, 12 जानेवारी 2022 रोजी, गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट 2.24% वाढले आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:26 वाजता ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप $2.01 ट्रिलियन पर्यंत वाढले. बिटकॉइन आणि इथेरियम ही दोन्ही मोठे कॉईन्स नफ्यासह ट्रेड करत आहेत. इथेरियम सुमारे 4 टक्क्यांनी वाढले आहे, तर बिटकॉइन खूप हळू चालत आहे.

बुधवारी, बिटकॉइन 0.90% वाढीसह $42,598 वर ट्रेड करत होता. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत $41,407.75 चा नीचांक बनवला आहे आणि नंतर $43,001.16 चा उच्चांक गाठला आहे. इथेरियम 3.65% ने $3,229 वर ट्रेड करत आहेत. इथेरियमने त्याच कालावधीत $3,091.97 चा नीचांक आणि $3,253.50 चा उच्चांक गाठला. बुधवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व 40.2 टक्के होते, त्यानंतर इथेरियमचे वर्चस्व 19.2% पर्यंत वाढले.

वाढणाऱ्या करन्सी
Coinmarketcap च्या डेटानुसार, मार्केट कॅपनुसार चौथी सर्वात मोठी करन्सी असलेली BNB $458.11 वर 6.07% वाढीसह ट्रेडिंग करत आहे. याशिवाय, कार्डानोच्या किमतीत आज गेल्या 24 तासांत 4.73% वाढ झाली आहे. ही करन्सी फक्त $1.21 वर ट्रेड करत होती. मार्केट कॅपच्या बाबतीत ही कंपनी 7 व्या क्रमांकावर आहे. याशिवाय, पोल्काडॉट या 10 क्रमांकाच्या करन्सी मध्ये 7.34% ची उडी दिसून आली.

एका दिवसात सर्वाधिक वाढणाऱ्या करन्सी
Shiba Hunter (SHUNT) मध्ये मागील 24 तासांत टॉप तीन करन्सीमध्ये 2310.36% वाढ झाली आहे, तर SpongeBob Square (SPONGS) मध्ये 598.22% वाढ झाली आहे. याशिवाय, FirstDog ​​(FSD) मध्ये 509.62% वाढ झाली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याची भीती; पोलीस यंत्रणा सतर्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा मुंबईसह महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा इशारा मिळालेला आहे. अनेकदा काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती दाखवण्यात आली आहे. मात्र, आज मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचे संभाषनाची माहिती चौकशी यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

सध्या मुंबईश महाराष्टातील जनतेला हादरवून टाकणारे नवे प्रकरण समोर आले आहे. ते म्हणजे डार्क नेटचे होय. यापूर्वी जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत चर्चा केल्या जात असत. मात्र, आता मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचे संभाषण झाल्याची माहिती संरक्षण यंत्रणेकडून देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव यांनी सांगितले आहे.

यशस्वी यादव म्हणाले की, “दहशतवादी सहानुभूती बाळगणारे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर बोलताना दिसतात. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्क नेट 99 टक्के आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. दरम्यान, मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात. आता यादव यांनी माहिती दिल्यानंतर महाराष्ट्रात असणारी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

बिनविरोध निवड : भावाची साथ… बहिणीची बाजी अन् शिवसेनेचा झेंडा फडकला

दहिवडी | नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या सुरेखा पखाले या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. सातारा जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक व शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांची साथ अन् बहिणीची नगरसेविका पदाची बाजी मारली अन् शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.

दहिवडी नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागांची निवडणूक झाली असून आता 4 जागांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. नुकत्याच दहिवडीच्या नागरिक व मतदार झालेल्या सुरेखा पखाले यांनी प्रभाग क्रमांक 1 व 17 मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूकीत रंगत आणली होती. बहिणीला निवडून आणण्याचा चंग बांधलेल्या शेखर गोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र निवडणूक टाळून बहिणीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी शेखर गोरे यांनी हालचाली गतिमान केल्या होत्या.

शेखर गोरे यांच्या पडद्याआड सुरु असलेल्या हालचालींना यश आले. अखेर भाजपच्या वंदना कटपाळे व काँग्रेसच्या कांता पोळ यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली होती. तर माघारीसाठी खळखळ करणाऱ्या राष्ट्रवादी प्रियांका पोळ यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. विरोधातील सर्वच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने सुरेखा पखाले यांना शिवसेनेच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान मिळाला. सुरेखा पखाले यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. भाऊ शेखर गोरे यांची साथ आणि बहिण सुरेखा पखाले याची बाजी अन् शिवसेना पक्षाचा झेंडा असे समीकरण जुळून आले आहे.