Wednesday, December 10, 2025
Home Blog Page 3710

किरकोळ कारणावरून पोटच्या मुलाने धारधार शस्त्राने केला आईचा खून

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात अत्यंत हृद्यद्रावक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन पोटच्या मुलानेच धारधार शस्त्राने आईचा खून केल्याची घटना घडली आहे. सुलाबाई पवार (वय – 65 वर्षे, रा. रहिमतपूर, ता कोरेगांव) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान या खुनानंतर आरोपी मुलगा शहाजी लाला पवार हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिकचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर येथील बसस्थानक परिसरात आज पहाटेच्या सुमारास मुलाने धारधार शस्त्राच्या साहाय्याने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सुलाबाई पवार असे मृत महिलेचे नाव होते. खून केल्यानंतर संशयित आरोपी शहाजी पवार हा स्वतः रहिमतपूर पोलीस स्टेशनला हजर झाला.

किरकोळ कारणावरून भांडणे झाल्याने स्वतः खून केल्याचे शहाजी पवार यांनी पोलिसांना सांगितले. आईचा खून केला असल्याची कबुली मुलाने दिली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी दिली. तर अधिक तपास रहिमतपूर पोलीस अधिकारी गणेश कड करीत आहेत.

राजकारण होऊनही शहरातील ‘इतक्या’ नागरिकांचे लसीकरण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शहरात सुरु असून शहरातील ६ लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. मात्र अजूनही ४५ हजार नागरिक हे दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शहरातील आणखी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे, असे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद शहरात १८ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या लाखांच्या घरात गेली आहे. परिणामी ४ ऑगस्ट पर्यंत मनपाने ५ लाख ९९ हजार २०४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामधे ४ लाख २४ हजार १४४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर १ लाख ७५ हजार ६०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

महानगरपालिकेला ६ लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करायला ८०० नागरिकांच्या लसीकरणाची गरज होती. त्यातच गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसिकरणामुळे १ हजार ९१२ नागरिकांचे लसीकरण झाल्याने महानरगापलिका हद्दीतील ६ लाख १ हजार ११६ नागरिक लसवंत झाले आहेत, अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडळकर यांनी दिली आहे.

अकरावी प्रवेश सीईटीसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार अर्ज

SSC student

औरंगाबाद | राज्य सरकारने यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य मंडळामार्फत 21 ऑगस्टला राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार 168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन द्वारे निकाल जाहीर झाला. विभागाचा निकाल 99.96 टक्के जाहीर झाला. यातच राज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. नोंदणीसाठी 20 जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. मात्र संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने अर्ज प्रक्रिया 21 जुलै पासून काही दिवसासाठी बंद ठेवून सुरू करण्यात आली.पुन्हा मुदतवाढ करण्यात आली.

यातच यंदा निकालाचा टक्का वाढल्याने नामांकित महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा लागली आहे. 21 ऑगस्टला ऑफलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. परीक्षा ऐच्छिक असली तरी या परीक्षेच्या गुणवत्तेवरच पुढील प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर सिटी न दिलेल्यांना अंतर्गत मूल्यमापन यांच्या गुणांवर प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान औरंगाबाद विभागातील 1 लाख 12 हजार 39 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर 711 विद्यार्थ्यानी अपूर्ण अर्ज भरले. 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून सबमिट केले आहेत.

राज ठाकरे भाजपासोबत जातील असं वाटत नाही – बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही पक्षातील युतीबाबतही चर्चा होऊ लागली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचे विधान केले असून त्यांनी राज ठाकरे भविष्यात भाजपसोबत जातील, असे वाटत नसल्याचे थोरात यांनी म्हंटले आहे.

काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे व चंद्रकांत पाटील यांच्या भेटीबाबत माध्यमांशी संवाद साधताना मत व्यक्त केले. यावेळी थोरात म्हणाले की, मनसेचे राज ठाकरे यांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ प्रयोग आठवत असतील. त्यांनी ज्या पद्धतीने भाजपावर टीका केली आहे, त्यावरून तरी किमान राज ठाकरे भविष्यात भाजपासोबत जातील, असे सध्या तरी वाटत नाही.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबाबत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून टोलेबाजी केली जात आहे. वास्तविक पाहता लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक टीका हि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली होती.

मनसे- भाजप युती होणार का? फडणवीसांनी सांगितली नेमकी अडचण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या शक्यतेबद्दल चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यामुळे मनसे- भाजप युतीची शक्यता वाढली आहे. परंतु अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात तरी कुणी कुणाला भेटण्यावर तरी बंधनं नाहीत. राजकारणामध्ये जर आणि तरला महत्त्व नसते. राज ठाकरेंची हिंदुत्त्वाची भूमिका हा निश्चितच आमच्यातील महत्त्वाचा धागा आहे पण राज ठाकरे यांच्या पक्षात आणि भाजप मध्ये फरक हाच आहे कि परप्रांतीयांच्या त्यांच्या भूमिकेबद्दल आम्ही सहमत नाही असे फडणवीसांनी म्हंटल.

त्यामुळे या मुद्द्यांवर जिथपर्यंत निराकारण होत नाही, तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही.”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.राज ठाकरे आणि आमची भेट होणं स्वाभाविक आहे पण याचा राजकीय अर्थ काढू नये असेही फडणवीसांनी म्हंटल.

बॅंकेला गंडा : कोल्हापूरात बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर | शहरातील राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणून गंडा घालणाऱ्या राधानगरी तालुक्यातील दोघांना पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी बेड्या ठोकल्या. अनिकेत अनिल हळदकर (वय- 27, रा. चंद्रे, ता. राधानगरी), उत्तम शिवाजी पवार (वय- 23, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, ता. राधानगरी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुख्य संशयित अनिल हळदकर याने दि. 2 ऑगस्ट रोजी राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत स्वताःच्या खात्यावर दोन हजार रुपये किमतीच्या 67 नोटा जमा केल्या. चौकशीअंती 67 पैकी 17 नोटावर बॅंक कर्मचाऱ्यांना संशयास्पद आढळून आल्या. तसेच सर्व नोटावर एकच सिरीयल नंबर होता. तेव्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यास संपर्क साधून याविषयी माहिती दिली. पोलीस पथकाने अनिकेत हळदकर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता उत्तम पवार याने या बनावट नोटा खपविण्यासाठी हळदकरकडे दिल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने बुधवारी रात्री उशिरा उत्तम पवार याला ताब्यात घेतले. बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न चव्हाट्यावर आल्याने राधानगरी, खानापूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बनावट नोटा छपाईचे साहित्य हस्तगत

उत्तम पवार यांच्या शेतातील खोलीवर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, उपनिरीक्षक दीपिका जोगळे व त्यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात नोटा छपाईसाठी लागणारी यंत्रसामुग्री, कागद आणि प्रिंटर असे साहित्य यावेळी हस्तगत करण्यात आले आहे. संशयितांनी गेल्या वर्षभरापासून बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस निरीक्षकांनी पत्रकारांना सांगितले.

सुशिक्षित तरुणांना लाखोंचा गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात

Fraud

औरंगाबाद – पोस्टात नोकरी लावण्याच्या आमिषाने तीन सुशिक्षित तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बाजारसावंगी येथील आरोपीला खुलताबाद पोलिसांनी नेरळमधून अटक केली. रवी अबलुकराव नलावडे (रा. बाजारसावंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बाजारसावंगी येथील बाळू राधाकृष्ण नलावडे यांनी २१ एप्रिल रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी नलावडे हा मुंबई येथे पोस्ट खात्यात नोकरीस असून, सन २०१८ मध्ये तो बाजारसावंगी येथे आला होता. या वेळी त्याने पोस्ट खात्यात जागा भरणार असून, नोकरीसाठी एका व्यक्तीला बारा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. सुरुवातीला तीन लाख रुपये द्यावे लागतील. बाकीचे पैसे नोकरीचे काम झाल्यानंतर द्यावे. काम न झाल्यास पैसे परत मिळतील, असे त्याने बाजारसावंगी येथील बाळू नलावडे, ताजनापूर येथील दीपक काळे आणि लोहगाव (ता. कन्नड) येथील प्रमोद सपाटे यांना सांगितले होते. बाळू नलावडे व दीपक काळे यांनी आरोपीच्या खात्यात बाजारसावंगी येथून प्रत्येकी तीन असे सहा लाख रुपये आणि प्रमोद सपाटे यांनी रवी नलावडे व पल्लवी नलावडे यांच्या खात्यात वेळोवेळी चार लाख ४१ हजार रुपये जमा केले.

मात्र, पैसे घेऊनही नोकरीस लावले नाही; तसेच पैसेही परत दिले नाहीत. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी कुटुंबीयांसह फरारी झाला होता. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या पथकाने चार ऑगस्ट रोजी आरोपी रवी नलावडे याला नेरळ (ता. कर्जत) येथून अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपी रवी नलावडे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Ladakh Standoff: भारत-चीन सैन्याने पूर्व लडाखमधील गोगरा येथून घेतली माघार, चर्चेच्या 12 व्या फेरीत झाली सहमती

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील माघारी संदर्भात भारतीय लष्कराचे एक मोठे स्टेटमेंट आले आहे. भारत आणि चीनच्या सैन्याने पूर्व लडाखच्या गोगरा भागातून माघार घेतली आहे. दोन्ही बाजूंच्या चर्चेच्या 12 व्या फेरीत झालेल्या सहमतीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. गोगरा येथील तात्पुरती बांधकामेही काढण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने शुक्रवारी ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी बांधलेली इतर पायाभूत सुविधा नष्ट केल्याचे लष्कराने सांगितले आणि याचीही पुष्टी झाली आहे.

लष्करी चर्चेच्या शेवटच्या फेरीत, दोन्ही पक्षांनी हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि डेपसांग येथे सैन्य मागे घेण्यासह, या क्षेत्रातील तणाव कमी करण्याच्या व्यापक उद्देशाने चर्चा केली. तथापि, सैन्य मागे घेण्याच्या दिशेने कोणतीही प्रगती झाली नाही. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये दोन्ही बाजूंनी सैन्य आणि मुत्सद्दी चर्चेच्या मालिकेनंतर पांगोंग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून सैन्य आणि शस्त्रे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

चर्चेची 12 वी फेरी सुमारे 9 तास चालली
कोर कमांडर स्तरीय चर्चेची 12 वी फेरी 31 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता पूर्व लडाखमधील चिनी बाजूच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) मोल्दो सीमा पॉईंट वर सुरू झाली आणि संध्याकाळी 7.30 वाजता संपली. सुमारे 9 तास चाललेल्या या बैठकीचा उद्देश 14 महिन्यांहून अधिक काळातील प्रदेशातील वाद संपवणे हा होता. बैठकीदरम्यान भारताने हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि डेपसांग येथील सैन्य मागे घेण्याचा आग्रह धरला. यापूर्वी लष्करी चर्चेची 11 वी फेरी 9 एप्रिल रोजी LAC च्या भारतीय बाजूच्या चुशूल सीमा पॉईंट वर आयोजित करण्यात आली होती आणि हि चर्चा सुमारे 13 तास चालले.

गरवारे मैदानावर हजारो वाहने भंगारात पडून; क्रीडा विभाग मात्र अंधारात

aurangabad

औरंगाबाद – शहरातील गरवारे मैदानावरील खुल्या जागेवर मनपाने तीन वर्षांपूर्वी १३२ तर गेल्या तीन दिवसात फक्त २१ भंगार वाहने टाकण्यात आली आहेत. उर्वरित वाहने पोलिसांनी टाकली असल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र मैदानाच्या परिसरात हजारो वाहने भंगार वाहने पडून असताना मैदानाची जबाबदारी असलेला क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे.

मनपाच्या गरवारे मैदानावर दररोज हजारो नागरिक मॉर्निंग वॉक तसेच जॉगिंगसाठी येतात. तसेच पोलिस व सैन्य भरतीसाठी अनेक तरुण देखील याठिकाणी येऊन तयारी करतात. त्यांना गेल्या काही दिवसांपासून मैदानाच्या परिसरातील भंगार वाहने, तसेच विद्युत विभागाने टाकलेल्या जुन्या पोलचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना संसर्गामुळे नागरिक सुरक्षित अंतर पाळून मैदानाच्या मोकळ्या जागेत व्यायाम करतात. पण दिवसेंदिवस मोकळी जागाच कमी होत आहे. कारण या जागेचा वापर भंगार वाहने टाकण्यासाठी केला जातो.

तीन वर्षांपूर्वी महापालिकेसह आरटीओ, पोलिस प्रशासनाने शहरातील भंगार वाहने उचलण्याची मोहीम राबविली होती. त्यावेळी १३२ वाहने उचलून मैदानातील खुल्या जागेत टाकण्यात आली. उर्वरित वाहने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी टाकल्याचे यांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा कार्यकारी अभियंता डी. के. पंडीत यांनी सांगितले. गरवारे मैदानासंदर्भातील सर्व निर्णय क्रीडा विभागातर्फे घेतले जातात. पण भंगार वाहने याठिकाणी टाकताना क्रिडा विभागाला कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही वाहने कधी व कुणी-कुणी टाकली याविषयी क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे.

भंगार वाहनांचा लिलाव कधी होणार ?
सुमारे अडीच ते तीन वर्षांपासून हजारो भंगार वाहने या ठिकाणी पडून आहेत. यातील १३२ वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ही फाईल लेखा विभागात आहे. लवकरच याविषयी निर्णय होईल, असे कार्यकारी अभियंता पंडित यांनी सांगितले.

आता सोनू सूदच्या मदतीने तुम्ही वाढवू शकता तुमचा व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आज भारतातील पहिले ग्रामीण बी 2 बी ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ट्रॅव्हल युनियन लॉन्च केले. अभिनेता सोनू सूदच्या पुढाकाराने ट्रॅव्हल युनियन प्रत्येक जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण ग्राहकांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रॅव्हल युनियन सदस्यांना (ट्रॅव्हल एजंट) प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रवासी सेवा सुलभ करेल. म्हणजेच प्रवासाशी संबंधित सर्व कामे त्याद्वारे करता येतील. याशिवाय हॉटेल बुकिंगही करता येईल. एवढेच नव्हे तर सोनू सूदच्या या App च्या मदतीने ट्रॅव्हल व्यावसायिक विशेषत: ट्रॅव्हल एजंट आपली कमाई वाढवू शकतील.

गुंतवणूकीशिवाय सुरू करा व्यवसाय
ट्रॅव्हल युनियन ट्रॅव्हल एजंट्ससाठी उत्पन्न आणि विकासाच्या संधी वाढवतील. लहान व्यवसाय मालकांसाठी उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत बनू शकतो. इच्छुक उद्योजकाला नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देईल आणि ग्रामीण ग्राहकांना मदत करण्यासाठी विश्वासार्ह ट्रॅव्हल युनियन सदस्यांचे (ट्रॅव्हल एजंट) नेटवर्क तयार करेल. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, जर एखाद्याला ट्रॅव्हल एजंटचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्या मदतीने कोणीही शून्य गुंतवणूकीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल युनियन सदस्यांच्या ऑनबोर्डिंगसाठी त्यांच्याकडून शून्य गुंतवणूकीची आवश्यकता असेल आणि ऑनबोर्डिंगमध्ये कोणताही रिकरिंग खर्च नाही, ज्यामुळे प्रवेशाचा अडथळा कमी होईल.

सोनू सूद काय म्हणाला ते जाणून घ्या
लाँच करताना सोनू सूद म्हणाला, “लॉकडाऊन दरम्यान, मी ग्रामीण भारतीयांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा तसेच लघु उद्योजकांच्या संघर्षांचा अनुभव घेतला. भारताच्या गरजा आणि ग्रामीण नागरिकांच्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल संधींचा अभाव माझ्याकडे राहिला. खरं तर, ग्रामीण ग्राहकांकडे सध्या त्यांच्या प्रवासाची आधीच योजना करण्याचा पर्याय नाही आणि विविध प्रकारच्या प्रवासाच्या गरजांसाठी अनेक ऑपरेटरकडे धाव घ्यावी लागते. देशातील कोणालाही उद्योजकतेची संधी देणे ज्यांना ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर सुरू करायचे आहे. ट्रॅव्हल युनियन, ग्रामीण ट्रॅव्हल एजंट्ससाठी बी 2 बी ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म, हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो त्यांना त्यांच्या परिसरात सर्वोत्तम प्रवास ऑफर करण्यास सक्षम करते.