नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 32,91 लाख अपात्र लाभार्थींच्या बँक खात्यात 2,326 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी काही लोक हे टॅक्स भरणारे आहेत. याबाबत माहिती देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले की,” राज्य सरकार याची चौकशी करीत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकार लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविली जाते. या योजनेत अनेक प्रकारच्या व्हेरिफिकेशन प्रोसेसचा अवलंब करण्यात आला आहे जेणेकरून कमीतकमी चुका होऊ शकतील आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल, असेही तोमर म्हणाले.
राज्यसभेत लेखी उत्तरात कृषिमंत्र्यांच्या वतीने निवेदन करण्यात आले की, ‘तथापि, पडताळणी प्रक्रियेअंतर्गत 32,91,152 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 2,326.88 कोटी रुपये पाठविण्यात आले असल्याचे आढळून आले. त्यात काही लोकं हे टॅक्स भरणारे आहेत. काही प्रकरणांमध्ये ब्लॉक / जिल्हा अधिकाऱ्यांनी अपात्र शेतकऱ्यांना चुकीचे फायदे दिले आहेत असेही त्यांनी सांगितले.’
तामिळनाडूमध्ये 158 कोटी रुपये
कर्नाटकात अशी 2,03,819 चुकीची नोंदणी झाली असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये अशीच सुमारे 6 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि त्यापैकी 158.57 कोटी रुपये वसूल झाले आहेत. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 16 एफआयआर नोंदविण्यात आल्या असून 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील 7,000 शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.
इन्कम टॅक्स जमा करणार्या लाभार्थ्यांची माहिती कशी मिळेल?
जम्मू-काश्मीर, मेघालय, लडाख आणि आसाम वगळता इतर सर्व राज्यांसाठी पंतप्रधान-किसान पोर्टल UIDAI च्या माध्यमातून एकत्रित करण्यात आले आहे. या पोर्टलला इन्कम टॅक्स डेटाबेसशी देखील जोडले गेले आहे जेणेकरून त्या लाभार्थ्यांना ट्रॅक करता येईल आणि त्यानंतर इन्कम टॅक्स वसूल करता येईल.
8 वा हप्ता किती दिवसांत मिळेल?
लहान आणि सीमांत शेतकर्यांना या योजनेतील आठवा हप्ता होळीनंतर मिळू शकेल. एप्रिलपासून केंद्र सरकार 8 वा हप्ता सोडायला सुरूवात करेल, अशी शक्यता आहे. तथापि, सरकारकडून याबाबत अजून कुठलीच माहिती आलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्स असे अनुमान लावत आहेत. या योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै दरम्यान एक हप्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा दुसरा हप्ता आणि डिसेंबर ते मार्च दरम्यान वर्षाचा तिसरा हप्ता येईल. डिसेंबर-मार्च 2020-21 पर्यंत आतापर्यंत 9.45 कोटी शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”