पंतप्रधान मोदी NASSCOM च्या वार्षिक परिषदेचे करणार उद्घाटन, 17-19 फेब्रुवारी रोजी NTLF च्या 29 व्या आवृत्तीचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आयटी उद्योग संस्था नॅसकॉम (NASSCOM) यांनी शुक्रवारी सांगितले की,” यावर्षी एनटीएलएफच्या (NTLF) वार्षिक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. कोविड -१९ नंतरच्या साथीच्या आजारात डिजिटल भविष्यासाठी आणि जबाबदार तंत्रज्ञानाचे महत्त्व या परिषदेत केंद्रित केले जाईल.

परिषदेचे पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजन
एनटीएलएफ (Nasscom Technology and Leadership Forum) ची 29 वी आवृत्ती 17 ते 19 फेब्रुवारी रोजी होईल. ही परिषद पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजित केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी प्लॅटफॉर्मच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील.

व्यवसायात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे
नॅसकॉमचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य रणनीती अधिकारी संगीता गुप्ता म्हणाल्या की,” कोरोना साथीच्या रोगामुळे सन 2020 हे उद्योग व क्षेत्रांसाठी एक वाईट वर्ष होते.” त्या म्हणाल्या, “तथापि यामुळे व्यवसायात तंत्रज्ञानाचे महत्त्व अभूतपूर्व वाढले. डिजिटल तंत्रज्ञान वेगाने स्वीकारले जात आहे आणि या नवीन सामान्य परिस्थितीत तंत्रज्ञान आपण कसे कार्य करतो, कसे संवाद साधतो यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.”

गुप्ता म्हणाल्या की,” या बदलामुळे संस्था विश्वास आणि नीतिशास्त्र, गोपनीयता, संस्कृती, कामाचे भविष्य आणि जबाबदाऱ्या यासारख्या बाबींवर फेरविचार करीत आहेत.

16 हजाराहून अधिक लोकांना समाविष्ट करण्याचा अंदाज आहे
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अरविंद कृष्णा (आयबीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी), चक रॉबिन्स (सिस्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी), एरिक एस युआन (झूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी), ज्युली स्वीट (एक्सेंचरचे मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि स्टीव्ह ब्राउन (फ्यूचरिस्ट, लेखक आणि स्पीकर) हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या 50 हून अधिक सत्रांमध्ये 16 हजाराहून अधिक लोकं उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.