शिवसेना खासदाराच्या मुलाची पावसात भिजत काम करणार्‍या पोलिसाला शिवीगाळ? पहा व्हिडिओ

मुंबई । देशात कोरोना महामारीच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचारी बंदोबस्त करत आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. राज्यातील अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत मात्र यातून बरे  पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. मात्र या पोलिसांनाच शिवीगाळ करण्याचा प्रकार झाला आहे. आणि  शिवसेना खासदाराच्या मुलाकडून हा प्रकार घडला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, ‘शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही सेक्शन ३५३ आणि १८५ अंतर्गत केस बनते.’

भर पावसात भिजत कर्तव्य बजावण्याऱ्या पोलिसाला अशा प्रकारे शिवीगाळ केल्यामुळे याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच शिवसेनेवरही टीका केली जात आहे. सध्या देशात रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून काही ठिकाणी पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांचे काम आणखी वाढले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.