भाजपचा प्रचार करणारी सपना चौधरी म्हणाली, कोणाला विजयी करणार?, लोक म्हणाले, केजरीवाल ! पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. प्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरी भाजपचा प्रचार करत आहेत. भाजपचा प्रचार करत असताना सपनाची चांगलीच फजिती झाली. सपना जमलेल्या लोकांना कोणाला विजयी करणार असे विचारत आहेत. जमलेले लोक केजरीवाल असे उत्तर देत आहेत. सपना चौधरीने दोन वेळेस हा प्रश्न केला तरीही उत्तर केजरीवाल … Read more

मूळ मुद्यांवरून देशाचे लक्ष भरकटवणे ही मोदींची शैली-राहुल गांधी

आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन करताना काँग्रेससह विरोधकांवर विविध मुद्यावरून टीका केली. यावेळी मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्षरीत्या टोमणा मारत त्यांना लक्ष केलं. मोदींनी लोकसभेतील केलेल्या भाषणावर राहुल गांधी यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली.

काही ट्यूबलाईट अशा असतात …पंतप्रधान मोदींनी राहूल गांधींची उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत मोदींना काठ्यांनी मारतील’ असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे.काही ट्यूबलाईट असतात अशा… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीची … Read more

असंच चालू राहिलं तर दिल्लीत ‘मुघल राज’ येणं दूर नाही! भाजप खासदार तेजस्वी सुर्या

भाजपचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिल्लीतील शाहीनबाग घटनेवर भाष्य केलं आहे. लोकांना आवाहन करताना खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले, “दिल्लीच्या शाहीन बाग येथे हे सध्या काय सुरु आहे. याविरोधात देशातील बहुसंख्यांक अद्याप जागरुक झालेले नाहीत. जे देशभक्त नागरिक आहेत ते ही या आंदोलनासोबत नाहीत. मात्र, बहुसंख्यांक सतर्क राहिले नाहीत तर आता दिल्लीत पुन्हा मुघल राज येणं दूर नाही.

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांना सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलं आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. यांवर मुख्यमंत्री … Read more

राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारने दिलं पहिलं दान; दिली इतकी रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. यात ९ कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असून त्यात दलित सदस्यही असेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिर उभारण्याच्या … Read more

शिवसेना धर्मसंकटात! मुख्यमंत्री तारखेनुसार तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करावी असा शिवसेनेचा नेहमी आग्रह राहिला आहे. त्यानुसार शिवसेना शासकीय तारखेला फाटा देत तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. मात्र, आता राज्यात महा विकास आघाडीचं सरकार असून उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा शिवजयंती साजरी करण्यावरून … Read more

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

नागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली. या घोषनेनंतर हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडीया यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी प्रविण तोगडीयायांनी केली. “अयोध्येतील राममंदिर आंदोलनात विहिंपचे दिवंगत नेते अशोक सिंघल, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, … Read more

मुलींच्या लग्नाचे कमीतकमी वय 18 वरून 21 होणार?, केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदी सरकार मुलींच्या लग्नाचे कमीतकमी वय 18 वरून 21 करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माता मृत्यू कमी करणे या मागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते की, महिलांना आई होण्याच्या योग्य वयाविषयी सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येईल. सरकारच्या … Read more

वाईट बातमी ! भूतानला जाण्यासाठी ‘फ्री’ एंट्री बंद, आता भारतीयांना दिवसाचे १२०० रुपये फी भरावी लागेल

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : भूतानने नेहमीच आपल्या सौंदर्याने भारतीय पर्यटकांना भुरळ घातली आहे. भारतीय पर्यटकांसाठी, हे सर्वात उपयुक्त ठिकाण आहे. त्यातही सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा देश भारताच्या खूप जवळ आहे. या सर्व कारणांमुळे, भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक देखील येथे भेट देतात. या गोष्टींव्यतिरिक्त, भूटान येथे मोठ्या संख्येने पर्यटक येण्याचे कारण म्हणजे येथे जाण्यासाठी अद्याप … Read more