काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना करण्यात आली आहे. या इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रसह देशातील अनेक प्रमुख पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यात आलेले नाही. नुकतीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे यांच्या युती झाली आहे. परंतु तरी  देखील इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राजकारणात अस्पृश्यता पाळते अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची टीका

इंडिया आघाडीसाठी निमंत्रण न आल्यामुळे प्रकाश आंबेेडकर यांनी राष्ट्रवादीला धारेवर धरल आहे. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राजकारणात अस्पृश्यता पाळतात. आम्हाला केवळ समाजातच अस्पृश्य म्हणून वागलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणून वागवलं जातं”  असा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर,  धर्म मानणारे भाजप-आरएसएसचे प्रचारक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळू लागले आहेत. तसेच, इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. मुख्य म्हणजे, लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल प्रकाश  आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये पहिल्यांदा इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी असे प्रमुख पक्ष उपस्थित होते. मात्र या बैठकीसाठी देखील प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. परंतु यापूर्वी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीमध्ये येण्याच्या मुद्द्यावरून भाष्य केले होते. ज्यामध्ये त्यांनी, प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडीमध्ये येण्याची इच्छा आहे का हे त्यांना विचारावे लागेल असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे प्रकाश आंबेडकर मुंबईतील बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसे काहीही घडले नाही.