उद्धव ठाकरे तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला? ; भाजप मोर्चावेळी प्रवीण दरेकरांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुन्हेगारांशी संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिशी कसे घालू शकता? तुमचा ठाकरी बाणा कुठे आहे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. देश द्रोह्यांसाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आघाडीचे नेते आंदोलन करतात. आज जर त्या ठिकाणी महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, अशी टीका दरेकर यांनी केली.

आज भाजपच्यावतीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आयोजित केलेल्या विराट मोर्चावेळी ते बोलत होते. यावेळी दरेकर म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठीच आज लाखोंचा जनसागर लोटला आहे. देशद्र्योसाठी सरकारमधील नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही आवाहन करतो कि त्यांनी सत्तेला लाथ मारून बाळासाहेबांचा कित्ता, ठाकरी बाणा उद्धव ठाकरेंनी गिरवावा. जनतेचा एल्गार, संताप एवढा मोठा आहे की तुमचं सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी दरेकर यांनी दिला. यावेळी मुंबईतील मोर्चाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, नितेश राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment