लेह मध्ये अस्थायी वॉर्ड मधील भेटीचे पंतप्रधान मोदींचे फोटो खोटे, सोशल मीडियातून अनेकांचा सूर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र शासित प्रदेश लडाख ची राजधानी लेह येथे पोहोचले होते. आर्मी, एअर फोर्स, आणि इंडो तिबेटियन पोलीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते तिथे गेले होते. निमू बेस मध्ये सैनिकांशी चर्चा झाल्यानंतर ते मिलिटरी हॉस्पिटल मध्ये गेले होते जिथे त्यांनी गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची विचारणा केली. त्यांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो संपादित असल्याचा दावा अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे.

अनेकांनी एका कॉन्फरन्स रूमला हॉस्पिटलचे रूप देऊन फोटोसेशन केले असल्याचे म्हंटले आहे. ‘हे कुठल्या बाजूने हॉस्पिटल वाटते? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. डॉक्टरांच्या जागी फोटोग्राफर, बेड सोबत कोणतेच औषध नाही, पाण्याची बाटली नाही, हे कसले हॉस्पिटल? असे प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच जून मध्ये घेण्यात आलेले फोटो संपादित करण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. फोटोमधील दरवाजा, पाईपिंग, पॉवर बोर्ड, फोटो फ्रेम हे सर्वच लोकांच्या नजरेत आणून दिले जात आहेत.

 

वॉर्डच्या दोन्ही भागात दरवाजे दिसून येत आहेत आणि दोन्ही फोटोंमध्ये बेड देखील एकसारखाच आहे. मेजर जनरल नरवाणे यांचा फोटो उजव्या बाजूला आहे आणि मोदीजी डाव्या बाजूला आहे. जो प्रोजेक्टर आणि स्टेजचा परिसर मोदींच्या फोटोत दिसतो आहे तोच नरवाणे यांच्या फोटोत देखील दिसतो आहे. ज्या जागेची गोष्ट केली जात आहे ती १०० बेडच्या एका युनिटची जागा असून संकटसमयी याला रुग्णालयाचे रूप देण्यात आले होते. असे नरवाणे यांनी सांगितले. पण या फोटोतील रुग्ण देखील खोटे असल्याचा दावा काहींनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment