मुंबई | देशात करोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशातच 1ते 9 वी आणि 11 च्या देखील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात उन्नती द्यावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढताना दिसत आहे. १० वी, १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यात १० वी, १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
राज्यातील शाळा बंद आहेत परंतु शाळांकडून फी आकारणी सुरूच आहे एक तर विद्यार्थ्यांचा वर्ष वाया गेला आहे आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होत आहेत मात्र या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जावा. कारण ते कोणत्या मानसिकतेचा असतील हे सांगता येत नाही ते लहान आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा. पहिल्यांदाच आपल्यावर हा प्रसंग ओढावला आहे म्हणून मी राज्य सरकारला विनंती करत आहे की खालच्या विद्यार्थ्यांना जसा प्रवेश दिला आहे त्याच प्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील यंदाच्या वर्षी पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत वेळी मंगळवारी केली होती.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group